Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पाच वर्षीय कारवी साळीची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद; खडतर मार्गाने सर केले कळसुबाई शिखर
महाराष्ट्र संवाद विशेष

पाच वर्षीय कारवी साळीची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद; खडतर मार्गाने सर केले कळसुबाई शिखर

एवढ्या लहान वयात दाखवलेले हे धाडस आणि शारीरिक क्षमतेच्या जोरावर कारवीने साळी समाजाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar04/03/2026No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

पिंपरी-चिंचवड:
कौतुक आणि जिद्दीच्या जोरावर अशक्य गोष्टीही साध्य करता येतात, याचाच प्रत्यय साळी समाजातील चिमुकल्या कारवी सारंग साळी हिने आणून दिला आहे. वयाच्या अवघ्या ५ व्या वर्षी महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर ‘कळसुबाई’ सर करण्याची ऐतिहासिक कामगिरी कारवीने डिसेंबर २०२५ मध्ये फत्ते केली आहे. तिच्या या अफाट ध्येयधोरणाची दखल थेट ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ने घेतली असून, तिला ‘आयबीआर अचिव्हर’ (IBR Achiever) या मानांकनाने सन्मानित करण्यात आले आहे.
कळसुबाई शिखरावर आजवर अनेक बाल गिर्यारोहकांनी चढाई केली असली, तरी कारवीची ही मोहीम अत्यंत विशेष ठरली. तिने शिखरावर पोहोचण्यासाठी निवडलेला मार्ग हा अत्यंत कमी वापरातील, अनवट आणि खडतर असा ‘ऑफबीट’ मार्ग होता. ज्या मार्गावर गिर्यारोहकांच्या सुविधेसाठी कुठेही शिड्या किंवा रेलिंग्ज उपलब्ध नाहीत, अशा आव्हानात्मक वाटेवरून कारवीने स्वतःची वाट काढत हे शिखर गाठले. तिचे वडील सारंग साळी आणि आजोबा बाळकृष्ण साळी (गरूड) यांचे तिला या मोहिमेत मार्गदर्शन लाभले.
एवढ्या लहान वयात दाखवलेले हे धाडस आणि शारीरिक क्षमतेच्या जोरावर कारवीने साळी समाजाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. तिच्या या यशाबद्दल साळी समाज पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष विष्णू निचळ, ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’चे संपादक अनंत पांगारकर यांच्यासह सर्व समाजबांधवांकडून तिचे भरभरून कौतुक होत आहे. कारवीच्या या कामगिरीने बाल गिर्यारोहकांसाठी एक नवा आदर्श निर्माण केला असून, तिच्या भविष्यातील वाटचालीस समाजाकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 556
इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड कळसुबाई शिखर कारवी साळी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

महात्मा गांधी हे भारतीय तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब: संदीप वाकचौरे

07/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
बैठक

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुका विस्ताराने मोठा असून यंदा पावसात झालेल्या मोठ्या घटीमुळे तालुक्यात…

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.