Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

वीज प्रश्नावर संगमनेर काँग्रेसचा ‘जनआक्रोश मोर्चा’; बाळासाहेब थोरातांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात जोरदार तयारी

19/09/2026

राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा; माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी, रेल्वेप्रश्नी लोकप्रतिनिधीच्या बालिश वक्तव्यावरही केले भाष्य

19/09/2026

थोरात कारखान्याचे ११ लाख मेट्रिक टनाचे गाळप उद्दिष्ट; बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभात बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

19/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमध्ये कोयत्याचा धाक दाखवून दहशत माजविणाऱ्या दोघांना पोलिसांनी सांगलीत पकडले
गुन्हेगारी

संगमनेरमध्ये कोयत्याचा धाक दाखवून दहशत माजविणाऱ्या दोघांना पोलिसांनी सांगलीत पकडले

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar10/03/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp
संगमनेर, प्रतिनिधी –
संगमनेर शहरात गेल्या काही दिवसांपासून कोयत्याचा धाक दाखवून सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या दोघांना जेरबंद करण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. संगमनेर शहर पोलिसांच्या पथकाने तपास करत या दोघा सराईतांना सांगली जिल्ह्यातून ताब्यात घेतले आहे. साहिल विजय देवरे आणि अनिल काथे (दोघेही राहणार नवघर गल्ली, संगमनेर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी गेल्या अनेक दिवसांपासून विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये सामील होते. संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्यांनी दहशत माजवली होती, मात्र पोलीस त्यांच्या मागावर असतानाही ते सातत्याने गुंगारा देत होते. या आरोपींचा बंदोबस्त करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते.
शहर पोलिसांच्या पथकाला तपासादरम्यान हे आरोपी अहिल्यानगर जिल्हा सोडून सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील बुरंगवाडी येथे लपून बसल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.
या माहितीची गांभीर्याने दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे आणि डीवायएसपी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईचे नियोजन करण्यात आले. शहर पोलिसांच्या एका पथकाने तातडीने सांगली गाठले. संगमनेरपासून शेकडो किलोमीटर दूर असलेल्या ठिकाणी दबा धरून बसलेल्या या दोन्ही गुन्हेगारांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
सध्या भिलवडी पोलीस ठाण्यात या अटकेबाबतची आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, पोलीस पथक आरोपींना घेऊन संगमनेरच्या दिशेने रवाना झाले आहे. संगमनेर शहरात गुन्हेगारी टोळ्यांचे वाढते वर्चस्व मोडीत काढण्यासाठी ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,098
कोयता शहर पोलीस
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

बेकायदेशीर गॅस रिफिलींगच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश; २१.८० लाखांच्या मुद्देमालासह १३३ टाक्या जप्त

19/09/2026

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

18/09/2026

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आंदोलन

वीज प्रश्नावर संगमनेर काँग्रेसचा ‘जनआक्रोश मोर्चा’; बाळासाहेब थोरातांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात जोरदार तयारी

By Annant Ppangarkar19/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सुरू असलेला…

राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा; माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी, रेल्वेप्रश्नी लोकप्रतिनिधीच्या बालिश वक्तव्यावरही केले भाष्य

19/09/2026

थोरात कारखान्याचे ११ लाख मेट्रिक टनाचे गाळप उद्दिष्ट; बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभात बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

19/09/2026

बेकायदेशीर गॅस रिफिलींगच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश; २१.८० लाखांच्या मुद्देमालासह १३३ टाक्या जप्त

19/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.