Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

जेष्ठ पत्रकार विनोद बूब यांचे पुणे येथे निधन; उद्या संगमनेर येथे अंत्यसंस्कार

20/09/2026

रविवार विशेष लेख — नाकर्त्या राज्यकर्त्यांचा बहुभाषिक महाराष्ट्र

20/09/2026

आज रविवार, २० सप्टेंबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

20/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट करून जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करणारा सराईत गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं
गुन्हेगारी

सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट करून जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करणारा सराईत गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं

सोशल मीडियाचा गैरवापर करून शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar04/08/2026Updated:04/08/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन

श्रीरामपूर:

सोशल मीडियावरून आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट करून सार्वजनिक शांतता भंग करणे आणि जातीय व धार्मिक तेढ निर्माण करणे श्रीरामपूरमधील एका सराईत गुन्हेगाराला चांगलेच महागात पडले आहे. श्रीरामपूर पोलिसांनी तातडीने कारवाई करत संबंधित आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या संदर्भात मंगळवारी (४ ऑगस्ट) श्रीरामपूर विभागाचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना गुप्त बातमीदाराकडून गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. श्रीरामपूरच्या प्रभाग क्रमांक २ मधील रहिवासी आणि सराईत गुन्हेगार अज्जू उर्फ अजिम अन्वर पठाण याने आपल्या ‘ajjupathan998’ या इंस्टाग्राम आयडीवरून सार्वजनिक शांतता धोक्यात येईल असा आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट केल्याचे समोर आले.

या माहितीच्या आधारे अपर पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी विशाल खैरे, पोलीस उपनिरीक्षक उमेश चव्हाण, पोलीस हेड कॉन्स्टेबल दादासाहेब लोंढे, पोलीस नाईक संदीप दरंदले, पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र बिरदवडे आणि अशोक गाडे यांच्या पथकाने शोध घेऊन आरोपीला ताब्यात घेतले.

पोलिसांनी कारवाईदरम्यान त्याच्याजवळील व्हिव्हो कंपनीचा मोबाईल जप्त करून पंचांसमक्ष तपासणी केली असता त्याने सदर आक्षेपार्ह व्हिडिओ स्वतः बनवून इंस्टाग्रामवर अपलोड केल्याची कबुली दिली.

याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे आरोपीविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर ७६४/२०२६, बी.एन.एस. कलम १९२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

विशेष म्हणजे, पकडण्यात आलेला आरोपी अज्जू उर्फ अजिम पठाण हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी श्रीरामपूर शहर आणि राहुरी पोलीस ठाण्यात चोरी, आर्म ॲक्ट, दरोड्याची तयारी, पोक्सो आणि ३०९ यांसारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक एम सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने पार पाडली.

दरम्यान, नागरिकांनी सोशल मीडियावर येणाऱ्या कोणत्याही अफवांवर, वादग्रस्त किंवा आक्षेपार्ह मेसेज, फोटो आणि व्हिडिओवर विश्वास ठेवू नये तसेच ते पुढे फॉरवर्ड करू नयेत, असे आवाहन श्रीरामपूर पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. सोशल मीडियाचा गैरवापर करून शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 682
आक्षेपार्ह व्हिडिओ सोमनाथ वाघचौरे सोशल मीडिया
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

बेकायदेशीर गॅस रिफिलींगच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश; २१.८० लाखांच्या मुद्देमालासह १३३ टाक्या जप्त

19/09/2026

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

18/09/2026

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
श्रद्धांजली

जेष्ठ पत्रकार विनोद बूब यांचे पुणे येथे निधन; उद्या संगमनेर येथे अंत्यसंस्कार

By Annant Ppangarkar20/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर येथील जेष्ठ पत्रकार विनोद बूब (वय ७८) यांचे रविवारी…

रविवार विशेष लेख — नाकर्त्या राज्यकर्त्यांचा बहुभाषिक महाराष्ट्र

20/09/2026

आज रविवार, २० सप्टेंबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

20/09/2026

वीज प्रश्नावर संगमनेर काँग्रेसचा ‘जनआक्रोश मोर्चा’; बाळासाहेब थोरातांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात जोरदार तयारी

19/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.