Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

वीज प्रश्नावर संगमनेर काँग्रेसचा ‘जनआक्रोश मोर्चा’; बाळासाहेब थोरातांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात जोरदार तयारी

19/09/2026

राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा; माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी, रेल्वेप्रश्नी लोकप्रतिनिधीच्या बालिश वक्तव्यावरही केले भाष्य

19/09/2026

थोरात कारखान्याचे ११ लाख मेट्रिक टनाचे गाळप उद्दिष्ट; बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभात बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

19/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » धुळ्यात ४० हजार रुपयांची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक साईनाथ तळेकर आणि पोलीस शिपाई रंगेहात जाळ्यात; तळेकर काही काळ संगमनेर शहर पोलीस ठाण्यात होते कार्यरत
गुन्हेगारी

धुळ्यात ४० हजार रुपयांची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक साईनाथ तळेकर आणि पोलीस शिपाई रंगेहात जाळ्यात; तळेकर काही काळ संगमनेर शहर पोलीस ठाण्यात होते कार्यरत

तक्रारदाराच्या बाजूने सकारात्मक अहवाल न्यायालयात सादर करण्यासाठी मागितली होती लाज
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar04/08/2026Updated:05/08/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन 

धुळे:

पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक साईनाथ तळेकर यांच्यावर धुळे येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई केली आहे. न्यायालयाने दिलेल्या एका तक्रारीच्या अर्जात सकारात्मक अहवाल पाठवण्यासाठी ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती ४० हजार रुपये लाच स्वीकारताना पीएसआय साईनाथ तळेकर आणि पोलीस शिपाई अविनाश सादरे यांना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले असून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या सासऱ्यांच्या नावावर असलेल्या मौजे वलवाडी येथील घराच्या कागदपत्रांचा गैरवापर करून एका फायनान्स कंपनीकडून सुमारे ३६ लाख १० हजार रुपयांचे गृहकर्ज काढून फसवणूक करण्यात आली होती. या प्रकरणी तक्रारदाराच्या सासऱ्यांनी धुळे न्यायालयात फौजदारी अर्ज दाखल केला होता.

या अर्जावर तक्रारदाराच्या बाजूने सकारात्मक अहवाल न्यायालयात सादर करण्यासाठी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक साईनाथ तळेकर (वय ३६) यांनी ५० हजार रुपयांची लाच मागितली होती.

याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे ३ ऑगस्टला तक्रार नोंदवली होती. एसीबीने त्याच दिवशी केलेल्या पडताळणी दरम्यान तडजोडीअंती ४० हजार रुपये लाच घेण्याचे निश्चित झाले. त्यानंतर धुळे येथील पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याच्या आवारात सापळा रचण्यात आला. या दरम्यान पीएसआय साईनाथ तळेकर यांच्या सांगण्यावरून पोलीस शिपाई अविनाश सादरे (वय ३१) याने तक्रारदाराकडून ४० हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वतः स्वीकारली. लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने दोघांना रंगेहात पकडले.

या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मेढे आणि अपर पोलीस अधीक्षक कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे, पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे व तपास अधिकारी पद्मावती कलाल यांच्या पथकाने केली आहे.

पूर्वी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात कार्यरत राहिलेल्या तळेकर यांच्यावर धुळ्यात ही कारवाई झाल्याने पोलीस वर्तुळात आणि नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 898
पोलीस लाचखोरी लाचलुचपत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग साईनाथ तळेकर
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

बेकायदेशीर गॅस रिफिलींगच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश; २१.८० लाखांच्या मुद्देमालासह १३३ टाक्या जप्त

19/09/2026

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

18/09/2026

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आंदोलन

वीज प्रश्नावर संगमनेर काँग्रेसचा ‘जनआक्रोश मोर्चा’; बाळासाहेब थोरातांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात जोरदार तयारी

By Annant Ppangarkar19/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सुरू असलेला…

राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा; माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी, रेल्वेप्रश्नी लोकप्रतिनिधीच्या बालिश वक्तव्यावरही केले भाष्य

19/09/2026

थोरात कारखान्याचे ११ लाख मेट्रिक टनाचे गाळप उद्दिष्ट; बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभात बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

19/09/2026

बेकायदेशीर गॅस रिफिलींगच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश; २१.८० लाखांच्या मुद्देमालासह १३३ टाक्या जप्त

19/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.