Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

थोरात कारखान्याचे ११ लाख मेट्रिक टनाचे गाळप उद्दिष्ट; बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभात बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

19/09/2026

बेकायदेशीर गॅस रिफिलींगच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश; २१.८० लाखांच्या मुद्देमालासह १३३ टाक्या जप्त

19/09/2026

सुफियाना सुरावटींनी संगमनेरकर रसिक मंत्रमुग्ध; ‘सजदा’ सोहळ्याने संगमनेर फेस्टिव्हलची रंगली तिसरी संध्याकाळ

19/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » थोरात कारखान्याचे ११ लाख मेट्रिक टनाचे गाळप उद्दिष्ट; बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभात बाळासाहेब थोरात यांचे आवाहन
शेती व सहकार

थोरात कारखान्याचे ११ लाख मेट्रिक टनाचे गाळप उद्दिष्ट; बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभात बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी सरकारवर जोरदार टीका केली. धरणामध्ये २० टीएमसी पाणी उपलब्ध असतानाही योग्य नियोजनाभावी शेतकरी अडचणीत आला आहे. सरकार शेतकऱ्यांबाबत पूर्णपणे उदासीन असल्याची टीका त्यांनी केली.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar19/09/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन –

पारदर्शक कामकाज आणि गुणवत्तेच्या जोरावर सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने सभासद व शेतकऱ्यांचा मोठा विश्वास संपादन केला आहे. आगामी २०२६-२७ च्या गळीत हंगामात कमी कालावधीत जास्त गाळप करण्याचे आव्हान असून, ११ लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवून सर्वांनी पूर्ण क्षमतेने काम करावे, असे आवाहन काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या २०२६-२७ या वर्षाच्या गळीत हंगामाच्या बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभात ते बोलत होते. व्यासपीठावर माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, कांचनताई थोरात, माधवराव कानवडे, व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले, बाबा ओहोळ, डॉ. जयश्रीताई थोरात, अजय फटांगरे आदीसह विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते व कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर उपस्थित होते.

याप्रसंगी शोभाताई व दिलीप नागरे, दिपाली व योगेश भालेराव, अरुणा व विजय राहणे, कमलताई व मदन आंबरे, तसेच नंदाताई व बंडू नाना भाबड या हक्कदार दांपत्यांच्या हस्ते विधिवत पूजा पार पडली.

यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, कारखान्याची वाटचाल सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श विचारांवर यशस्वीपणे सुरू आहे. कारखान्याची दररोज ९ हजार मेट्रिक टन गाळप क्षमता करण्यासाठी विस्तारीकरणाचे काम हाती घेतले जाणार आहे. उत्तम गाळप झाल्यास मोलासिस, अल्कोहोल व वीज निर्मितीमधून कारखान्याला मोठी मदत मिळते. त्यामुळे कार्यक्षेत्रात ऊस क्षेत्र वाढवण्याबरोबरच एकरी टनेज वाढवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत.

यावेळी त्यांनी वीज आणि पाण्याच्या प्रश्नावर चिंता व्यक्त केली. तालुक्यात ११ तास हक्काची वीज मिळणे आवश्यक असताना विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. डॉ. जयश्रीताई थोरात यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर कालपासून वीज पुरवठा सुरळीत झाला, यावरून वीज जाणूनबुजून खंडित केली जात असल्याचे स्पष्ट होते. या हक्काच्या पाणी आणि विजेसाठी आपल्याला संघर्ष करावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला.

तसेच सध्या जागतिक पातळीवर आणि राज्यात दुष्काळाची परिस्थिती असताना तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. आपल्या कार्यकाळात कायम शेतकऱ्यांना मोठा पीक विमा मिळाला असून, यावर्षीही शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून देण्यासाठी स्वतः लक्ष घालणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

विरोधकांवर निशाणा साधताना थोरात म्हणाले की, आपले राजकारण फ्लेक्सबाजीचे नसून मेहनतीचे आहे. आपण सातत्याने काम करून सर्वसामान्यांच्या जीवनात आनंद निर्माण केला आहे, मात्र सध्या काम न करता केवळ फ्लेक्स लावण्याचे राजकारण सुरू आहे.

माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी सरकारवर जोरदार टीका केली. धरणामध्ये २० टीएमसी पाणी उपलब्ध असतानाही योग्य नियोजनाभावी शेतकरी अडचणीत आला आहे. सरकार शेतकऱ्यांबाबत पूर्णपणे उदासीन असल्याची टीका त्यांनी केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले यांनी मानले. या समारंभास विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सभासद आणि कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 145
थोरात कारखाना बाळासाहेब थोरात बॉयलर अग्नी प्रदीपन सुधीर तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

निष्क्रिय लोकांनी विकासावर बोलू नये; मुरूम-वाळूच्या पुढे न जाणाऱ्या लोकप्रतिनिधींवर बाळासाहेब थोरातांचा घणाघात

18/09/2026

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

17/09/2026

काळाची गरज ओळखून धाडसी दूरदृष्टीचे आणि शेतकरी हिताचे निर्णय घेणे आपली सामूहिक जबाबदारी; बाळासाहेब थोरात यांचे प्रतिपादन

17/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

थोरात कारखान्याचे ११ लाख मेट्रिक टनाचे गाळप उद्दिष्ट; बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभात बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

By Annant Ppangarkar19/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – पारदर्शक कामकाज आणि गुणवत्तेच्या जोरावर सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी…

बेकायदेशीर गॅस रिफिलींगच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश; २१.८० लाखांच्या मुद्देमालासह १३३ टाक्या जप्त

19/09/2026

सुफियाना सुरावटींनी संगमनेरकर रसिक मंत्रमुग्ध; ‘सजदा’ सोहळ्याने संगमनेर फेस्टिव्हलची रंगली तिसरी संध्याकाळ

19/09/2026

आज शनिवार 19 सप्टेंबर, जाणून घ्या आजचे सर्व राशीचे राशिभविष्य

19/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.