Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

बेकायदेशीर गॅस रिफिलींगच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश; २१.८० लाखांच्या मुद्देमालासह १३३ टाक्या जप्त

19/09/2026

सुफियाना सुरावटींनी संगमनेरकर रसिक मंत्रमुग्ध; ‘सजदा’ सोहळ्याने संगमनेर फेस्टिव्हलची रंगली तिसरी संध्याकाळ

19/09/2026

आज शनिवार 19 सप्टेंबर, जाणून घ्या आजचे सर्व राशीचे राशिभविष्य

19/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » बेकायदेशीर गॅस रिफिलींगच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश; २१.८० लाखांच्या मुद्देमालासह १३३ टाक्या जप्त
गुन्हेगारी

बेकायदेशीर गॅस रिफिलींगच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश; २१.८० लाखांच्या मुद्देमालासह १३३ टाक्या जप्त

चौघांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील विविध कलमे तसेच जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९९५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar19/09/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन –

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत धडक कारवाई करत बेकायदेशीर गॅस रिफिलींगचा काळाबाजार उघडकीस आणला आहे. तपोवन रोडवरील दक्षतानगर भागात छापा टाकून पोलिसांनी २१ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून यामध्ये भारत व एचपी कंपनीच्या तब्बल १३३ घरगुती व कमर्शियल टाक्यांचा समावेश आहे.

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन आणि अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखालील पथक जिल्ह्यात अवैध धंद्यांवर कारवाई करत होते. तोफखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीत गस्त घालत असताना, तपोवन रोड येथील दक्षतानगरमध्ये किरण संतोष गलांडे याच्या गाळ्यामागील मोकळ्या जागेत घरगुती गॅस टाक्यांमधून कमर्शियल टाक्यांमध्ये विनापरवाना गॅस भरून चोरीने विक्री केली जात असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने पंचांसमक्ष त्या ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी इलेक्ट्रिक मोटर आणि वजन काट्याचा वापर करून घरगुती गॅस टाक्यांमधून कमर्शियल टाक्यांमध्ये रिफिलींग करताना दोन जण रंगेहात आढळून आले. परवान्याबाबत विचारपूस केली असता त्यांच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी कल्ला रघुराज सिंग (वय २४, रा. बोल्हेगाव) आणि गौरव राजेंद्र आढाव (वय ३४, रा. पिंपळगाव माळवी) या दोघांना ताब्यात घेतले.

चौकशी दरम्यान आरोपींनी हा बेकायदेशीर व्यवसाय फरार आरोपी किरण संतोष गलांडे याच्या मालकीचा असून रिफिलींगसाठी लागणाऱ्या घरगुती गॅस टाक्या पाईपलाईन रोड येथील फरार आरोपी नितीन कदम याच्याकडून खरेदी केल्याची माहिती दिली.

या कारवाईत पोलिसांनी ५६ भरलेल्या व २ रिकाम्या घरगुती भारत गॅस टाक्या, ४६ कमर्शियल भारत गॅस टाक्या, २३ भरलेल्या व ३ रिकाम्या घरगुती एचपी गॅस टाक्या, ३ कमर्शियल एचपी गॅस टाक्या, २ इलेक्ट्रिक मशीन, २ वजन काटे, १ हिट गन मशीन, गॅस टोपण आणि प्लास्टिक लेबल जप्त केले. याशिवाय गॅस वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी ४ छोटा हत्ती वाहने, १ बोलेरो पिकअप आणि १ ओमिनी कार असा एकूण २१ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

ताब्यातील आरोपी आणि मुद्देमाल तोफखाना पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला आहे. चौघांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील विविध कलमे तसेच जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९९५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस उप निरीक्षक अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार गणेश धोत्रे, प्रताप देवकाते, मनोज साखरे आणि अमोल कोतकर यांच्या पथकाने केली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 116
अहिल्यानगर एलसीबी गुन्हेगारी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

18/09/2026

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

बेकायदेशीर गॅस रिफिलींगच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश; २१.८० लाखांच्या मुद्देमालासह १३३ टाक्या जप्त

By Annant Ppangarkar19/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत धडक कारवाई…

सुफियाना सुरावटींनी संगमनेरकर रसिक मंत्रमुग्ध; ‘सजदा’ सोहळ्याने संगमनेर फेस्टिव्हलची रंगली तिसरी संध्याकाळ

19/09/2026

आज शनिवार 19 सप्टेंबर, जाणून घ्या आजचे सर्व राशीचे राशिभविष्य

19/09/2026

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

18/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.