Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

वीज प्रश्नावर संगमनेर काँग्रेसचा ‘जनआक्रोश मोर्चा’; बाळासाहेब थोरातांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात जोरदार तयारी

19/09/2026

राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा; माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी, रेल्वेप्रश्नी लोकप्रतिनिधीच्या बालिश वक्तव्यावरही केले भाष्य

19/09/2026

थोरात कारखान्याचे ११ लाख मेट्रिक टनाचे गाळप उद्दिष्ट; बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभात बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

19/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पिंपरी-चिंचवडमधील व्यापाऱ्याचे अपहरण करणाऱ्या टोळीला संगमनेर पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पकडले; दोन गावठी कट्टे व जिवंत काडतुसे जप्त
गुन्हेगारी

पिंपरी-चिंचवडमधील व्यापाऱ्याचे अपहरण करणाऱ्या टोळीला संगमनेर पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पकडले; दोन गावठी कट्टे व जिवंत काडतुसे जप्त

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar10/03/2026Updated:10/03/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी-
पिंपरी-चिंचवड येथील एका व्यापाऱ्याचे खंडणीसाठी अपहरण करून पसार होणाऱ्या उत्तर प्रदेशातील पाच अट्टल गुन्हेगारांच्या मुसक्या संगमनेर पोलिसांनी हिवरगाव पावसा टोलनाका येथे मोठ्या शिताफीने आवळल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी व्यापाऱ्याची सुटका करत आरोपींकडून दोन गावठी बनावटीचे कट्टे, सहा जिवंत काडतुसे आणि गुन्ह्यात वापरलेली कार असा एकूण ११ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अधिक माहिती अशी की, पिंपरी-चिंचवड येथील एका व्यापाऱ्याचे अपहरण करून आरोपी काळ्या रंगाच्या स्विफ्ट कारने (क्रमांक UP-70-HR-9272) आळेफाटा मार्गे संगमनेरच्या दिशेने येत असल्याची माहिती श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाला दिली होती. या माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने हिवरगाव पावसा टोलनाका येथे सापळा रचला. त्याचवेळी संगमनेर तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षक प्रवीण साळुंके यांनी खांडगाव फाटा येथे नाकाबंदी करून आरोपींची नाकेबंदी केली होती.
सोमवारी (९ मार्च) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास संशयित कार टोलनाक्यावर येताच पोलिसांनी तिला चहुबाजूंनी वेढले. कारची झडती घेतली असता त्यामध्ये चंद्रशेखर दीपकचंद्र गौड (वय ३४), दिलीप मोहनलाल सरोज (वय २८), रिंकू अलगुराम सरोज (वय १७), अनिल गिरीधारीलाल सरोज (वय २६) आणि मुकेशकुमार राममुदर चव्हाण (वय २४) हे पाच आरोपी आढळून आले. हे सर्व आरोपी उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांच्या ताब्यातून घातक शस्त्रांसह मोबाईल आणि कार हस्तगत करण्यात आली आहे.
या टोळीविरुद्ध पिंपरी-चिंचवड येथील काळेवाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १४०(१), १४०(२) आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, सर्व आरोपींना पुढील तपासासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली बापूसाहेब हांडे, राहुल सारबंदे, सुनील ढाकणे, संतोष फड, शांताराम मालुजकर तसेच संगमनेर तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाने केली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,370
अपहरण संगमनेर पोलीस सुटका
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

बेकायदेशीर गॅस रिफिलींगच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश; २१.८० लाखांच्या मुद्देमालासह १३३ टाक्या जप्त

19/09/2026

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

18/09/2026

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आंदोलन

वीज प्रश्नावर संगमनेर काँग्रेसचा ‘जनआक्रोश मोर्चा’; बाळासाहेब थोरातांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात जोरदार तयारी

By Annant Ppangarkar19/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सुरू असलेला…

राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा; माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी, रेल्वेप्रश्नी लोकप्रतिनिधीच्या बालिश वक्तव्यावरही केले भाष्य

19/09/2026

थोरात कारखान्याचे ११ लाख मेट्रिक टनाचे गाळप उद्दिष्ट; बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभात बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

19/09/2026

बेकायदेशीर गॅस रिफिलींगच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश; २१.८० लाखांच्या मुद्देमालासह १३३ टाक्या जप्त

19/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.