Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

वीज प्रश्नावर संगमनेर काँग्रेसचा ‘जनआक्रोश मोर्चा’; बाळासाहेब थोरातांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात जोरदार तयारी

19/09/2026

राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा; माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी, रेल्वेप्रश्नी लोकप्रतिनिधीच्या बालिश वक्तव्यावरही केले भाष्य

19/09/2026

थोरात कारखान्याचे ११ लाख मेट्रिक टनाचे गाळप उद्दिष्ट; बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभात बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

19/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शेत जमिनीतून अनधिकृत रस्ते आणि गटार बांधकाम; संगमनेरमध्ये दोन ठेकेदारांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
गुन्हेगारी

शेत जमिनीतून अनधिकृत रस्ते आणि गटार बांधकाम; संगमनेरमध्ये दोन ठेकेदारांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar10/03/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी-
संगमनेर तालुक्यातील चिखली गावच्या शिवारात महार वतन इनाम जमिनीवर कोणत्याही सक्षम अधिकाऱ्याची परवानगी न घेता अनधिकृतपणे सिमेंट रस्ता आणि भूमिगत गटाराचे बांधकाम केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सिन्नर तालुक्यातील महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दोन ठेकेदारांविरुद्ध ॲट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीच्या आईच्या पश्चात चिखली येथील महार वतन जमीन वारसा हक्काने त्यांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या नावे असून, ती त्यांच्या सामायिक ताब्यात आहे. दरम्यानच्या काळात, चिखली ग्रामपंचायतीने अनुसूचित जाती वस्ती विकास योजनेअंतर्गत सन २०२२-२३ आणि २०२३-२४ या आर्थिक वर्षांसाठी रस्ता काँक्रिटीकरण व भूमिगत गटार बांधकामाचा निधी मंजूर करून घेतला होता. या कामाचा ठेका चिखली येथील अरविंद सोमनाथ हासे आणि मंगळापूर येथील प्रतीक भाऊसाहेब भोकनळ या दोन ठेकेदारांना देण्यात आला होता.
नियमानुसार, वर्ग-२ च्या जमिनीचा ताबा घेताना किंवा तिचा शेतीव्यतिरिक्त वापर करताना जिल्हाधिकाऱ्यांची रीतसर परवानगी घेणे कायदेशीररीत्या अनिवार्य असते. मात्र, संबंधित ठेकेदारांनी या नियमांचे उल्लंघन करत आणि स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी नियोजित जागी काम न करता, फिर्यादीच्या मालकीच्या खाजगी शेतजमिनीत कायमस्वरूपी बांधकाम करून मोठे नुकसान केले. या अनधिकृत अतिक्रमणाबाबत फिर्यादीने २८ ऑक्टोबर २०२५ रोजी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. प्रशासकीय स्तरावर सातत्याने पत्रव्यवहार करूनही न्याय मिळत नसल्याचे पाहून अखेर पीडितेने पोलिसांत धाव घेतली.
या तक्रारीची गंभीर दखल घेत संगमनेर शहर पोलिसांनी गेल्या शनिवारी (२८ फेब्रुवारी) रात्री आरोपींविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर ०१७८/२०२६ नुसार गुन्हा नोंदवला आहे. यामध्ये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३२४(४), ३२९(३) आणि अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम (ॲट्रॉसिटी) १९८९ चे कलम ३(१)(f) यांचा समावेश करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.

📌 ग्रामपंचायत हद्दीत खासगी क्षेत्रावर दलित वस्ती दाखवून ग्रामपंचायत आणि ठेकेदारांनी लाखो रुपयांचा शासन निधी पाण्यात घातला आहे. खासगी शेत जमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले. या संदर्भात वारंवार पंचायत समिती प्रशासन तहसीलदार शहर पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपाधीक्षक यांची भेट घेतली. मात्र दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची भेट घेतल्यानंतर शहर पोलिसांनी दोन ठेकेदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला. मात्र 10-11 दिवसांचा कालावधी उलटून देखील गुन्हेगार अद्यापही मोकाट आहे. आरोपींना तात्काळ ताब्यात घेण्याची मागणी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. – तक्रारदार महिला.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,746
ॲट्रॉसिटी चिखली संगमनेर शहर पोलीस
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

बेकायदेशीर गॅस रिफिलींगच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश; २१.८० लाखांच्या मुद्देमालासह १३३ टाक्या जप्त

19/09/2026

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

18/09/2026

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आंदोलन

वीज प्रश्नावर संगमनेर काँग्रेसचा ‘जनआक्रोश मोर्चा’; बाळासाहेब थोरातांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात जोरदार तयारी

By Annant Ppangarkar19/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सुरू असलेला…

राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा; माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी, रेल्वेप्रश्नी लोकप्रतिनिधीच्या बालिश वक्तव्यावरही केले भाष्य

19/09/2026

थोरात कारखान्याचे ११ लाख मेट्रिक टनाचे गाळप उद्दिष्ट; बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभात बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

19/09/2026

बेकायदेशीर गॅस रिफिलींगच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश; २१.८० लाखांच्या मुद्देमालासह १३३ टाक्या जप्त

19/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.