Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आमदार सत्यजीत तांबे यांच्या पाठपुराव्याला यश; संगमनेरमध्ये सार्वजनिक शौचालयांसाठी १.५० कोटींचा निधी मंजूर
राजकारण

आमदार सत्यजीत तांबे यांच्या पाठपुराव्याला यश; संगमनेरमध्ये सार्वजनिक शौचालयांसाठी १.५० कोटींचा निधी मंजूर

प्रकल्पामुळे शहरातील सार्वजनिक आरोग्याचा दर्जा उंचावण्यास मदत होणार असून पर्यावरणाचे रक्षण आणि नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी हे पाऊल मैलाचा दगड ठरणार आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar16/03/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी-
संगमनेर शहरातील स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. स्वच्छ भारत मिशन (शहरी) २.० अंतर्गत संगमनेर नगरपालिका हद्दीत सार्वजनिक शौचालयांच्या बांधकामासाठी सुमारे १ कोटी ५० लाख रुपयांच्या निधीला शासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे. अशी माहिती नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांनी दिली.
तांबे यांनी दिलेल्या माहितीनुसार यासंदर्भातील शासन निर्णय नुकताच निर्गमित करण्यात आला असून, आमदार सत्यजीत तांबे यांनी शासनाकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला या निमित्ताने मोठे यश मिळाले आहे.
आमदार तांबे यांनी २ फेब्रुवारी रोजी या निधीसाठी विशेष मागणी केली होती. शहरातील वाढती लोकसंख्या आणि प्रवाशांची वर्दळ लक्षात घेता स्वच्छतेच्या सुविधा वाढवणे आवश्यक असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले होते.
त्याचबरोबर संगमनेर नगरपरिषदेच्या माध्यमातून नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांनी शहरातील सहा अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी सुसज्ज सार्वजनिक शौचालये उभारण्याचा सविस्तर प्रस्ताव स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सादर केला होता.
या प्रस्तावाचा सकारात्मक विचार करून राज्यस्तरीय तांत्रिक समितीने या आराखड्यास मान्यता दिली. मंजूर निधीपैकी केंद्र व राज्य शासनाच्या हिस्स्याचा ४० टक्के निधी पहिल्या हप्त्याच्या स्वरूपात त्वरित वितरित करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
संगमनेर शहराची स्थानिक लोकसंख्या ८५ हजारांच्या आसपास असली, तरी व्यवसायानिमित्त आणि कामानिमित्त शहरात दररोज २० ते २५ हजार नागरिक बाहेरून येत असतात. या फ्लोटिंग लोकसंख्येमुळे शहरात रोज सव्वा लाखांहून अधिक लोकांचा वावर असतो, परिणामी सार्वजनिक स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनत चालला होता. प्रस्तावित नवीन शौचालयांमध्ये पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र, सुरक्षित आणि आधुनिक सुविधांची व्यवस्था केली जाणार आहे. या प्रकल्पामुळे शहरातील सार्वजनिक आरोग्याचा दर्जा उंचावण्यास मदत होणार असून पर्यावरणाचे रक्षण आणि नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी हे पाऊल मैलाचा दगड ठरणार आहे.

📌 संगमनेर शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. दररोज शहरात येणाऱ्या हजारो नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आधुनिक स्वच्छता सुविधांची नितांत गरज होती. आमदार सत्यजीत तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा प्रस्ताव सादर केला होता, याला आता मंजुरी मिळाली आहे. या निधीतून उभारली जाणारी शौचालये महिला आणि पुरुषांच्या सुरक्षिततेचा विचार करून अत्याधुनिक पद्धतीने बांधली जातील, यामुळे शहराच्या सार्वजनिक आरोग्यात मोठी सुधारणा होईल. — डॉ. मैथिली तांबे, नगराध्यक्ष.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 399
निधी मैथिली तांबे संगमनेर नगर परिषद सत्यजित तांबे सार्वजनिक शौचालय
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पुरस्कार

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालय आणि गुजरात सरकारच्या संयुक्त विद्यमाने…

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.