Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये बुधवारी रंगणार ७५० कलावंतांचे भव्य महावादन; ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीचा उपक्रम

15/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमध्ये एकतर्फी प्रेमातून तरुणीवर प्राणघातक हल्ला; आरोपीचा स्वतःला संपवण्याचा प्रयत्न
गुन्हेगारी

संगमनेरमध्ये एकतर्फी प्रेमातून तरुणीवर प्राणघातक हल्ला; आरोपीचा स्वतःला संपवण्याचा प्रयत्न

सध्या घटनास्थळी फॉरेन्सिक टीम दाखल झाली असून पुराव्यांची तपासणी सुरू आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar16/03/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी- 
तालुक्यातील रणखांब येथे एकतर्फी प्रेमातून एका २१ वर्षीय तरुणीवर चाकूने सपासप वार करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून, आरोपी तरुणाने स्वतःवरही हल्ला करत शेततळ्यात उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.
जनार्दन गोरक्ष साळवे (वय २८, रा. पिंपरणे) असे या माथेफिरू आरोपीचे नाव असून, घारगाव पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी जनार्दन हा पीडित तरुणीचा नात्याने चुलत मेहुणा लागतो. त्याचे या तरुणीवर गेल्या काही दिवसांपासून एकतर्फी प्रेम होते. पीडित मुलगी पिंपरणे येथे आपल्या बहिणीला भेटण्यासाठी गेली असताना आरोपीची तिच्यावर वाकडी नजर पडली होती. गेल्या आठ दिवसांपासून तो तिच्यावर प्रेमविवाह करण्यासाठी सतत दबाव टाकत होता. मात्र तरुणीने त्यास नकार दिल्याने तो वैफल्यग्रस्त झाला होता. रविवारी सायंकाळी ही तरुणी पिंपरणे येथून आपल्या मूळ गावी रणखांब येथे परतली होती.
सोमवारी सकाळी ही तरुणी आपल्या घरी जेवण करत असताना, आरोपी जनार्दन साळवे तिथे पोहचला. त्याने रागाच्या भरात चाकूने तरुणीवर सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात तरुणी रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. घरातील नातेवाईकांनी आरडाओरड केल्यावर पकडले जाण्याच्या भीतीने आरोपीने स्वतःवरही चाकूने वार करून घेतले आणि तो तिथून पळू लागला. ग्रामस्थांनी त्याचा पाठलाग सुरू केल्याचे पाहून त्याने शेजारच्या एका शेततळ्यात उडी घेतली.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस पाटील साहेबराव बारवे, सरपंच बाबाजी गुळवे यांच्यासह नाना गुळवे, किरण गुळवे, राहुल शेजवळ आणि इतर ग्रामस्थांनी तातडीने घारगाव पोलिसांना माहिती दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांनी तात्काळ पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेत जखमी तरुणी आणि आरोपीला उपचारासाठी संगमनेर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले.
सध्या घटनास्थळी फॉरेन्सिक टीम दाखल झाली असून पुराव्यांची तपासणी सुरू आहे. या क्रूर हल्ल्यामुळे रणखांब ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,017
जीवे मारण्याचा प्रयत्न प्राणघातक हल्ला
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

संगमनेरमध्ये बुधवारी रंगणार ७५० कलावंतांचे भव्य महावादन; ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीचा उपक्रम

By Annant Ppangarkar15/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य हे सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत वैभवशाली असून पारंपारिक…

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026

दिल्ली नाक्यावर कंटेनरखाली चिरडून महिलेचा मृत्यू, संगमनेर शहरातील जड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; नागरिकांचा संताप

15/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.