Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सजग नागरिक हीच देशाची सर्वात मोठी शक्ती : अविनाश धर्माधिकारी
महाराष्ट्र संवाद विशेष

सजग नागरिक हीच देशाची सर्वात मोठी शक्ती : अविनाश धर्माधिकारी

माधवलाल मालपाणी स्मृती ‘मंथन’ व्याख्यानमालेचा संगमनेरमध्ये शानदार समारोप
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar22/03/2026Updated:22/03/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी-
कायदे, नियम आणि नीतिमत्ता यांचे पालन करणारा प्रत्येक जागरूक नागरिक हीच देशाची खरी ताकद असून, अशा नागरिकांच्या संघशक्तीच्या बळावरच भारत आज जागतिक महाशक्ती म्हणून उदयाला येत आहे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते आणि चाणक्य मंडल परिवाराचे संस्थापक माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी केले.
संगमनेर येथील राजस्थान युवक मंडळाच्या वतीने, मालपाणी उद्योग समूहाचे अध्वर्यु स्वर्गीय माधवलालजी मालपाणी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित ‘मंथन’ व्याख्यानमालेचा समारोप ‘विकसित भारत आणि आपण सगळेच’ या विषयाने झाला, त्याप्रसंगी ते बोलत होते.
धर्माधिकारी यांनी आपल्या व्याख्यानात राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेवर प्रकाश टाकताना सांगितले की, देशालाच दैवत मानून प्रामाणिकपणे कार्य करणारे शेतकरी, कामगार, शिक्षक, डॉक्टर आणि अभियंते हे घटक राष्ट्राची खरी संपत्ती आहेत. भारतीय जीवनपद्धतीचा पाया अध्यात्म असून समर्थ रामदास स्वामी आणि श्रीमद्भगवद्गीतेतील कर्मयोगाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रत्येकाने स्वतःपासून सकारात्मक कार्याची सुरुवात करणे आवश्यक आहे. प्रगतीच्या वाटेत भ्रष्टाचार हा मोठा अडथळा असून, ही कीड नष्ट करण्याचा निर्धार प्रत्येकाने करायला हवा.
तसेच, वैयक्तिक आरोग्याची जपणूक करणे हे देखील राष्ट्रहिताचेच कार्य असून त्यातूनच एक तंदुरुस्त आणि बलाढ्य भारत घडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी धर्माधिकारी यांनी संगमनेरमधील ध्रुव ग्लोबल स्कूलच्या शिक्षण पद्धतीचा विशेष गौरव केला. भगवद्गीता आणि योगसाधनेच्या पायावर उभी असलेली ही शिक्षण प्रणाली आदर्श राष्ट्रभक्त पिढी घडवत असल्याचे सांगून, मालपाणी उद्योग समूह आणि डॉ. संजय मालपाणी यांच्या या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना राजस्थान युवक मंडळाचे अध्यक्ष मनीष मालपाणी म्हणाले की, व्याख्यानमालांच्या परंपरेमुळे संगमनेरची पिढी वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ झाली असून शहराची ओळख एक ‘सांस्कृतिक शहर’ म्हणून निर्माण झाली आहे. अशा उपक्रमांमुळे समाजात सलोखा टिकून राहतो आणि दिग्गज व्यक्तींच्या अनुभवातून नागरिकांना ज्ञानाची शिदोरी मिळते.
या कार्यक्रमाला मंडळाचे कार्याध्यक्ष सुमित अट्टल, मालपाणी परिवारातील सदस्य आणि संगमनेरमधील श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुमित अट्टल यांनी केले, तर मुरारी देशपांडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 336
अविनाश धर्माधिकारी माधवलाल मालपाणी स्मृती ‘मंथन’ व्याख्यानमाला
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

महात्मा गांधी हे भारतीय तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब: संदीप वाकचौरे

07/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पुरस्कार

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालय आणि गुजरात सरकारच्या संयुक्त विद्यमाने…

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.