Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » बिबट्याचा थरार: शेतात घास कापणाऱ्या महिलेवर जीवघेणा हल्ला, परिसरात घबराटीचे वातावरण
महाराष्ट्र संवाद विशेष

बिबट्याचा थरार: शेतात घास कापणाऱ्या महिलेवर जीवघेणा हल्ला, परिसरात घबराटीचे वातावरण

वनविभागाचे कर्मचारी तिथे पिंजरा लावण्याची तयारी करत होते, तेव्हा दोन बिबट्यांमध्ये शिकारीवरून झालेली झुंज त्यांनी प्रत्यक्ष पाहिली होती.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar17/04/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
(संग्रह छायाचित्र)
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp
आश्वी, प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक परिसरात बिबट्याने पुन्हा एकदा आपल्या दहशतीचा प्रत्यय दिला असून, आज सकाळी शेतात काम करणाऱ्या एका ५५ वर्षीय महिलेवर बिबट्याने प्राणघातक हल्ला केला. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली असून, एकाच वस्तीवर बिबट्याने हल्ला करण्याची ही चौथी वेळ असल्याने वनविभागाच्या भूमिकेबद्दल ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आश्वी बुद्रुक येथील खेमनर वस्तीवरील गट नंबर २३१ मध्ये सुमनबाई बाळासाहेब खेमनर या आज शुक्रवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास जनावरांसाठी घास कापण्याचे काम करत होत्या. याच दरम्यान दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक झडप घातली. बिबट्याने सुमनबाई यांच्या मानेवर आणि हातावर खोलवर जखमा केल्या.
संकटाच्या प्रसंगी सुमनबाई यांनी मोठ्याने आरडाओरडा केल्याने त्यांचे पुत्र सुभाष खेमनर आणि परिसरातील शेतकऱ्यांनी तातडीने धाव घेतली. जमाव येताना पाहून बिबट्याने घटनास्थळावरून पळ काढला. ग्रामस्थांच्या या सतर्कतेमुळे सुमनबाई यांचे प्राण वाचले असून, त्यांना पुढील उपचारासाठी तातडीने लोणी येथील प्रवरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
आश्वी आणि शिबलापूर परिसरात बिबट्यांचा वावर कमालीचा वाढला असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गुरुवारीच शिबलापूर-आश्वी खुर्द रस्त्यावरील बोंद्रे वस्तीवर बिबट्याने ११ शेळ्यांचा फडशा पाडला होता. विशेष म्हणजे, वनविभागाचे कर्मचारी तिथे पिंजरा लावण्याची तयारी करत होते, तेव्हा दोन बिबट्यांमध्ये शिकारीवरून झालेली झुंज त्यांनी प्रत्यक्ष पाहिली होती. यामुळे या परिसरात एकापेक्षा जास्त बिबट्यांचे वास्तव्य असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सध्या शेतीचा हंगाम सुरू असताना दिवसाढवळ्या होणाऱ्या या हल्ल्यांमुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. एकाच वस्तीवर वारंवार होणारे हल्ले रोखण्यात वनविभाग अपयशी ठरत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. वनविभागाने या भागातील बिबट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा आणि ठिकठिकाणी पिंजरे लावून मानवी वस्तीत येणाऱ्या या हिंस्र प्राण्यांना जेरबंद करावे, अशी आग्रही मागणी आश्वी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,413
बिबट्या हल्ला
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

महात्मा गांधी हे भारतीय तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब: संदीप वाकचौरे

07/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- रस्त्यावरील वाहनांच्या वादातून पिकअप चालकाला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या…

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.