Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

धुळ्यात ४० हजार रुपयांची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक साईनाथ तळेकर आणि पोलीस शिपाई रंगेहात जाळ्यात; तळेकर काही काळ संगमनेर शहर पोलीस ठाण्यात होते कार्यरत

August 4, 2026

रोटरी क्लबच्या निवडी जाहीर, यांचा झाला पदग्रहण समारंभ

August 4, 2026

सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट करून जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करणारा सराईत गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं

August 4, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आधी ऑनलाईन पैसे उकळले, मग कोर्ट मॅरेजला नकार देऊन मागितली खंडणी; अहिल्यानगर जिल्ह्यात विवाह फसवणुकीचे मोठे रॅकेट उघड!
गुन्हेगारी

आधी ऑनलाईन पैसे उकळले, मग कोर्ट मॅरेजला नकार देऊन मागितली खंडणी; अहिल्यानगर जिल्ह्यात विवाह फसवणुकीचे मोठे रॅकेट उघड!

नागरिकांनी कोणत्याही मध्यस्थावर आंधळा विश्वास न ठेवता समोरच्या कुटुंबाची पूर्ण पडताळणी करावी आणि असे संशयास्पद प्रकार आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे जाहीर आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJune 20, 2026Updated:June 20, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
राहाता पोलिसांनी विवाह जुळवण्याच्या बहाण्याने तरुणांची फसवणूक व खंडणी मागणाऱ्या तीन महिलांच्या टोळीला अटक केली असून, त्यांच्याकडून एका तरुण शेतकऱ्याला डांबून ठेवून २ लाख ३० हजार रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या कारवाईमुळे विवाह जुळवणाऱ्या अशा बोगस टोळ्यांचे मोठे रॅकेट समोर आले असल्याची अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी माहिती दिली.
राहाता पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती येथील एका ३० वर्षीय शेतकरी तरुणाला विवाहासाठी मुलगी हवी होती. मध्यस्थांमार्फत त्याचा संपर्क पुणे येथील रेश्मा केशव काटे नावाच्या महिलेशी झाला. रेश्मा हिने त्याला राहाता तालुक्यातील साकुरी शिवार येथील मंगल अंकुश पठारे हिच्याकडे विवाहासाठी मुलगी असल्याचे सांगितले.
सुरुवातीला मुली दाखवण्याच्या बहाण्याने ऑनलाईन पद्धतीने १२ हजार ५०० रुपये घेण्यात आले. त्यानंतर १९ जून २०२६ रोजी तक्रारदार तरुण, त्याचा भाऊ व मित्रांना साकुरी शिवार येथील मंगल पठारे हिच्या घरी बोलावण्यात आले. तिथे त्यांना सुगंधा कैलास गायकवाड नावाची मुलगी दाखवण्यात आली. मुलीच्या कुटुंबाबाबत विचारणा केली असता, ‘तिला आई नाही, वडील दारू पितात आणि तिचे सर्व कार्य आम्हीच करणार’ असे भासवून आरोपी महिलांनी या तरुणाचा विश्वास संपादन केला.
यानंतर आरोपींनी कोर्ट मॅरेजच्या मागणीला नकार देत घरातच तातडीने लग्न लावून देण्याचा तगादा लावला आणि तब्बल २ लाख ३० हजार रुपयांची मागणी केली. या अचानक झालेल्या पैशांच्या मागणीमुळे तरुणाला संशय आला. त्याचे मित्र पैसे आणण्याच्या बहाण्याने घराबाहेर पडताच, संतापलेल्या आरोपी महिलांनी फिर्यादी तरुण आणि त्याच्या मित्राला घरात डांबून ठेवले.
इतकेच नव्हे तर बाहेर गेलेल्या नातेवाइकांना फोन करून २ लाख ३० हजार रुपयांची खंडणी दिली तरच सुटका करण्याची धमकी दिली. या कठीण प्रसंगात बाहेर पडलेल्या मित्रांनी तातडीने राहाता पोलीस स्टेशन गाठून मदत मागितली. पोलिसांनी वेळ न घालवता साकुरी शिवार येथील गोदावरी वसाहतीमधील मंगल पठारे हिच्या घरावर छापा टाकला आणि डांबून ठेवलेल्या तरुणांची सुटका केली.
याप्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात रेश्मा केशव काटे (रा. नऱ्हे, पुणे), मंगल अंकुश पठारे (रा. साकुरी शिवार, राहाता) आणि सुगंधा कैलास गायकवाड (रा. साकुरी शिवार, राहाता) या तिन्ही महिलांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, आरोपी मंगल पठारे हिच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा शोध घेतला असता, तिच्याविरुद्ध राहाता पोलीस ठाण्यात २०२२ आणि २०२५ मध्येही अशाच स्वरूपाचे फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे.
दरम्यान, नागरिकांनी कोणत्याही मध्यस्थावर आंधळा विश्वास न ठेवता समोरच्या कुटुंबाची पूर्ण पडताळणी करावी आणि असे संशयास्पद प्रकार आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे जाहीर आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे. ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दीपक सरोदे व त्यांच्या पथकाने केली आहे.

अवैध पैशांच्या मोहापायी या महिला टोळीने विवाहाच्या बहाण्याने अनेक पुरुषांची फसवणूक केल्याची दाट शक्यता आहे. सुनंदा गायकवाड या मुलीचे बोगस आधार कार्ड आणि खोटा शाळा सोडल्याचा दाखला (TC) बनवून हा संघटित गुन्हा केला गेल्याचा पोलिसांना संशय असून, त्या दृष्टीने कसून तपास सुरू आहे. जर या टोळीकडून कोणाची अशी फसवणूक झाली असेल, तर त्या तक्रारदारांनी न घाबरता पुढे यावे आणि राहाता पोलीस ठाण्यात त्वरित संपर्क साधून तक्रार नोंदवावी.”

— सोमनाथ वाघचौरे (अप्पर पोलीस अधीक्षक)

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,260
गुन्हेगारी बनावट लग्न महिलांची टोळी सोमनाथ वाघचौरे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

धुळ्यात ४० हजार रुपयांची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक साईनाथ तळेकर आणि पोलीस शिपाई रंगेहात जाळ्यात; तळेकर काही काळ संगमनेर शहर पोलीस ठाण्यात होते कार्यरत

August 4, 2026

सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट करून जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करणारा सराईत गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं

August 4, 2026

२ लाखांच्या बदल्यात ८ लाखांचे आमिष! खेळण्यातील नोटांचा वापर; ४ भामट्यांवर गुन्हा दाखल, ‘चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया’च्या नोटांच्या जोरावर नोटा बदलणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड

August 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

धुळ्यात ४० हजार रुपयांची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक साईनाथ तळेकर आणि पोलीस शिपाई रंगेहात जाळ्यात; तळेकर काही काळ संगमनेर शहर पोलीस ठाण्यात होते कार्यरत

By अनंत पांगारकरAugust 4, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  धुळे: पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक साईनाथ तळेकर यांच्यावर धुळे…

रोटरी क्लबच्या निवडी जाहीर, यांचा झाला पदग्रहण समारंभ

August 4, 2026

सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट करून जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करणारा सराईत गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं

August 4, 2026

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन; माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले…

August 4, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.