Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

16/10/2026

शुक्रवार १६ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

16/10/2026

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अहिल्यानगर जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेमुळे शाळांच्या वेळेत बदल; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
शिक्षण

अहिल्यानगर जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेमुळे शाळांच्या वेळेत बदल; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

चालू शैक्षणिक वर्षातील परीक्षेचे कामकाज आणि निकाल तयार करण्याची प्रक्रिया वेळेत पूर्ण व्हावी, यासाठी शिक्षकांनी सकाळी ७ ते दुपारी १२ या वेळेत शाळेत उपस्थित राहणे अनिवार्य असणार आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar17/04/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, अहिल्यानगर: 

जिल्ह्यात वाढत्या तापमानाचा पारा आणि भारतीय हवामान खात्याने दिलेला उष्णतेच्या लाटेचा ‘यलो अलर्ट’ लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. पंकज आशिया यांनी १८ एप्रिल २०२६ पासून जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळांच्या वेळेत बदल करण्याचे आदेश जारी केले आहेत. या नव्या निर्णयानुसार, आता जिल्ह्यातील शाळा उन्हाळी सुट्टी लागेपर्यंत सकाळी ७ ते ११ या वेळेतच भरवल्या जाणार आहेत.

जिल्ह्यात सध्या उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणावर वाढली असून, उष्माघाताचा धोका निर्माण झाला आहे. विशेषतः दुपारी शाळा सुटल्यानंतर घरी परतणाऱ्या विद्यार्थ्यांना या उष्णतेचा त्रास होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून हा बदल करण्यात आला आहे.

आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अंतर्गत हे आदेश लागू करण्यात आले असून, शाळा व्यवस्थापन समित्यांनी या बदलाला मंजुरी देऊन तात्काळ अंमलबजावणी करावी, असे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. या निर्णयाची माहिती सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांपर्यंत पोहोचवण्याच्या सूचनाही शिक्षण विभागाला देण्यात आल्या आहेत.

विद्यार्थ्यांच्या वेळेत कपात करण्यात आली असली तरी, शिक्षकांसाठी मात्र स्वतंत्र सूचना जारी केल्या आहेत. चालू शैक्षणिक वर्षातील परीक्षेचे कामकाज आणि निकाल तयार करण्याची प्रक्रिया वेळेत पूर्ण व्हावी, यासाठी शिक्षकांनी सकाळी ७ ते दुपारी १२ या वेळेत शाळेत उपस्थित राहणे अनिवार्य असणार आहे. कडक उन्हाळ्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण होते, मात्र प्रशासनाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 841
उष्णतेची लाट पंकज आशिया येलो अलर्ट वेळेत बदल
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026

नियमांचे उल्लंघन; राजापूर जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांवर कारवाई होणार का? पालकांचा सवाल

17/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

By Annant Ppangarkar16/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरातील बहुचर्चित खून प्रकरणात मुख्य आरोपी प्रकाश जाधव…

शुक्रवार १६ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

16/10/2026

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.