Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मंदिरांप्रमाणेच ‘ज्ञानमंदिरांना’ दान द्या, तरच सामर्थ्यशाली देश उभा राहील: डॉ. दत्तात्रय आहेर
शिक्षण

मंदिरांप्रमाणेच ‘ज्ञानमंदिरांना’ दान द्या, तरच सामर्थ्यशाली देश उभा राहील: डॉ. दत्तात्रय आहेर

शिंदेवाडी शाळेच्या विकासासाठी ५१ हजार रुपयांची देणगी; मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपण व देणगी प्रदान
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar16/07/2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर:
“अध्यात्मिक श्रद्धेपोटी आपण ज्याप्रमाणे पवित्र मंदिरांना दान देतो, त्याच धर्तीवर उद्याचा सुजाण भारतीय नागरिक घडवणाऱ्या जीवन शिक्षण मंदिरांना म्हणजेच शाळांनाही सढळ हस्ते दान दिले पाहिजे. जर ही ज्ञानमंदिरे भक्कमपणे उभी राहिली, तरच आपला देश खऱ्या अर्थाने सामर्थ्यसंपन्न बनेल,” असे प्रतिपादन संगमनेर येथील प्रसिद्ध अंबिका मुळव्याध व भगंदर क्लिनिकचे संचालक डॉ. दत्तात्रय आहेर यांनी केले.
तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदेवाडी (गणोरे) येथे आयोजित वृक्षारोपण व देणगी प्रदान समारंभात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण विस्तार अधिकारी अनिल गायकवाड होते. तर प्रमुख अतिथी म्हणून संगमनेर रोटरी क्लबचे संचालक सुनील कडलग, डॉ. रेखा आहेर, सरपंच संतोष आंबरे, मारुती आहेर, अशोक आहेर, राजेंद्र आंबरे, दिगंबर दातीर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिक्षण विस्तार अधिकारी अनिल गायकवाड यांच्या हस्ते डॉ. दत्तात्रय आहेर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
आपल्या उत्पन्नातील काही वाटा समाजासाठी खर्च करून सामाजिक भान जपणे आणि माजी विद्यार्थी म्हणून शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले कर्तव्य आहे, याच भावनेतून डॉ. दत्तात्रय आहेर यांनी शिंदेवाडी शाळेच्या विकासकामांसाठी ५१ हजार रुपयांची भरीव देणगी जाहीर केली व सुपूर्द केली. माजी विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ आणि शिक्षक एकत्र आले, तर कोणत्याही शाळेचा कायापालट होऊ शकतो, हे शिंदेवाडी शाळेने संपूर्ण तालुक्याला दाखवून दिले असल्याचे कौतुकही त्यांनी यावेळी केले.
या सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मालपाणी नर्सरी यांच्याकडून देणगी स्वरूपात मिळालेल्या वृक्षांचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. केवळ वृक्षारोपण न करता, प्रत्येक विद्यार्थी आणि पालकाने एका झाडाचे पालकत्व स्वीकारून त्याच्या संगोपनाची कायदेशीर जबाबदारी घेतली आणि तशी शपथही घेतली.
या उपक्रमाचे कौतुक करताना शिक्षण विस्तार अधिकारी अनिल गायकवाड म्हणाले की, पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण काळाची गरज आहे. भविष्यात जर आपल्याला सुखी आणि निरोगी आयुष्य जगायचे असेल, तर ‘झाडे लावा, झाडे जगवा’ हा संदेश प्रत्येकाने अंगीकारायला हवा.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात शाळेच्या उपक्रमशील मुख्याध्यापिका वृषाली कडलग यांनी शिंदेवाडी शाळेच्या आतापर्यंतच्या प्रगतीचा आणि कायापालटाचा सविस्तर आढावा घेतला.
या सोहळ्यात शाळेला वस्तू स्वरूपात, रोख देणगी आणि विशेष निधीच्या माध्यमातून मदत करणाऱ्या सर्व दानशूर दात्यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी अरविंद आहेर , राजाराम आहेर, शिक्षण तज्ञ दत्तात्रय हांडे, संतोष भालेराव, गणेश भालेराव, श्रीकांत खतोडे, विशाल आंबरे, रावसाहेब दातीर, आकाश आंबरे, योगेश दातीर, अशोक दातीर, दत्तात्रय आंबरे, सागर चव्हाण, गोरख आहेर, प्रवीण मालुंजकर, संजय आंबरे, विवेक दातीर, वाळीबा खतोडे, प्रियंका हांडे, सुवर्णा खतोडे, शितल आंबरे, अक्षदा आंबरे , प्रियंका आहेर, ज्योती आंबरे ,माया आंबरे,अनिता हांडे, मीनाक्षी हांडे, अश्विनी दातीर, उज्वला हांडे, संजीवनी दातीर, मोहिनी शिंदे आदींसह पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेच्या शिक्षिका कल्पना पाटील मॅडम यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.
त्यानंतर हरितक्रांती उपक्रमांतर्गत वृक्ष लागवड कार्यक्रम, व उपस्थित सर्व विद्यार्थी आणि पालकांना अनेक प्रकारच्या वृक्षांची रोपांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी आपल्या शाळेच्या शालेय पोषण आहाराचे काम करणाऱ्या अनिता हांडे यांच्याकडून त्यांच्या उपस्थित सर्वांना अल्पोपहार व खाऊचे वाटप करण्यात आले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 817
वृक्षारोपण वृषाली कडलग शिंदेवाडी शाळा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026

नियमांचे उल्लंघन; राजापूर जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांवर कारवाई होणार का? पालकांचा सवाल

17/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- खाजगी बँकेच्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी सतत फोन करून धमकावणे, घरी येऊन…

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.