Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

वाळू तस्करांवर कारवाई, ट्रॅक्टरसह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक तर तिघे फरार

30/08/2026

रविवार विशेष — पुणे–नाशिक रेल्वे : २५ दिवस संपले, आता प्रश्न फक्त कमिटीचा नाही… सरकारच्या इच्छाशक्तीचा आहे! एक संगमनेरकर म्हणून काही थेट प्रश्न…

30/08/2026

रविवार विशेष लेख: बेसुमार कर्जमाफीची बेशर्मी

30/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » NEET नंतर महाराष्ट्रात TET पेपरफुटीचा धक्का; परीक्षा रद्द झाल्याने ४ लाख उमेदवारांचे भविष्य टांगणीला, आमदार सत्यजीत तांबे संताप व्यक्त करताना म्हणाले…
शिक्षण

NEET नंतर महाराष्ट्रात TET पेपरफुटीचा धक्का; परीक्षा रद्द झाल्याने ४ लाख उमेदवारांचे भविष्य टांगणीला, आमदार सत्यजीत तांबे संताप व्यक्त करताना म्हणाले…

या निर्णयामुळे परीक्षा देणाऱ्या तब्बल ४ लाख २८ हजार उमेदवारांवर मोठा अन्याय झाला
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar27/06/2026Updated:27/06/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
मुंबई:
NEET परीक्षांमधील गोंधळानंतर आता महाराष्ट्रातील शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटीचे गंभीर प्रकरण समोर आले आहे. ठाण्यात TET परीक्षेचा पेपर फुटल्याचे उघडकीस आल्यानंतर उद्या होणारी परीक्षा तातडीने रद्द करण्यात आली आहे. या निर्णयामुळे परीक्षा देणाऱ्या तब्बल ४ लाख २८ हजार उमेदवारांवर मोठा अन्याय झाला असून, राज्यातील ढासळलेल्या परीक्षा व्यवस्थेचे अपयश यातून पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले असल्याची घणाघाती टीका विधान परिषद आमदार सत्यजीत तांबे यांनी केली आहे.
महाराष्ट्रात आता ‘पेपरफुटी’ हीच नवी ‘परीक्षा पद्धत’ झाली आहे का, असा संतप्त सवाल उपस्थित करत आमदार तांबे यांनी सरकारवर निशाणा साधला. सातत्याने होणाऱ्या अशा गैरप्रकारांमुळे विद्यार्थ्यांची मेहनत, वेळ आणि पैसा तर वाया जात आहेच, पण त्यांच्यात मानसिक नैराश्य आणि असुरक्षिततेची भावनाही वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.
हे TET प्रकरण इतर परीक्षांपेक्षा अधिक संवेदनशील आहे कारण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अनेक शिक्षकांना आपली नोकरी वाचवण्यासाठी ही परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. यामध्ये २० ते ३० वर्षे सेवा केलेले आणि निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेले शिक्षकही सामील आहेत. अशा वेळी पेपर फुटल्याने त्यांच्या कुटुंबाच्या भवितव्यावरच मोठी कुऱ्हाड कोसळली आहे.
स्वातंत्र्याच्या ८० वर्षांनंतर जग AI आणि सायबर सुरक्षेच्या युगात पोहोचले असताना, आपण अजूनही एक परीक्षा सुरक्षितपणे घेऊ शकत नाही, ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचे तांबे यांनी नमूद केले. या संपूर्ण व्यवस्थेच्या मुळाशी भ्रष्टाचार असून, व्यवस्था पारदर्शक झाल्यास काहींचे हितसंबंध धोक्यात येतील म्हणूनच ही व्यवस्था सुधारू दिली जात नसल्याचा ठाम आरोप त्यांनी केला.
केवळ काही आरोपींना अटक करून हा प्रश्न सुटणार नसून परीक्षा प्रणालीची संपूर्ण पुनर्रचना करणे गरजेचे आहे. सरकारने हा अन्याय तातडीने थांबवून परीक्षा व्यवस्थेवरील जनतेचा विश्वास पुन्हा प्रस्थापित करावा, अशी मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी केली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 407
Neet Tet परीक्षा रद्द संताप सत्यजित तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

रेल्वेमंत्र्यांच्या ‘वडापाव’च्या पोस्टवर आमदार सत्यजीत तांबे यांची थेट प्रतिक्रिया… पुणे-नाशिक रेल्वेची मागणी मांडत म्हणाले, ‘आम्ही अनेक वर्षांपासून उपाशी आहोत!’

24/08/2026

अमृतवाहिनी विद्यापीठाचे नाव गुणवत्तेमुळे देशात मोठे राहील: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

18/08/2026

नाशिक–पुणे सेमी हायस्पीड रेल्वेसाठी आमदार सत्यजीत तांबे यांच्या आवाहनाला युवकांचा वाढता प्रतिसाद, फ्रेंडशिप डेच्या संदेशातून ९ ऑगस्टच्या चक्काजाम आंदोलनाचे आवाहन

02/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

वाळू तस्करांवर कारवाई, ट्रॅक्टरसह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक तर तिघे फरार

By Annant Ppangarkar30/08/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  कोपरगाव- अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी आपला बडगा उगारला…

रविवार विशेष — पुणे–नाशिक रेल्वे : २५ दिवस संपले, आता प्रश्न फक्त कमिटीचा नाही… सरकारच्या इच्छाशक्तीचा आहे! एक संगमनेरकर म्हणून काही थेट प्रश्न…

30/08/2026

रविवार विशेष लेख: बेसुमार कर्जमाफीची बेशर्मी

30/08/2026

आज रविवार, ३० ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

30/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.