Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

५२ हजार रुपयांच्या अवैध अग्निशस्त्रासह युवक जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

21/08/2026

संगमनेरच्या डॉक्टरवर राहता पोलिसात गुन्हा दाखल! एकाचा मृत्यू, एक गंभीर

21/08/2026

अवैध गुटखा माफियांचे कंबरडे मोडले; स्थानिक गुन्हे शाखेची तब्बल ९४ लाख ६८ हजारांच्या मुद्देमालासह ५८ आरोपींवर धडक कारवाई

21/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ‘विश्वास नांगरे पाटील यांनी पोलीस सेवेचा राजीनामा देऊन संघात किंवा भाजपमध्ये सामील व्हावे’ – राज ठाकरे यांचा घणाघात
राजकारण

‘विश्वास नांगरे पाटील यांनी पोलीस सेवेचा राजीनामा देऊन संघात किंवा भाजपमध्ये सामील व्हावे’ – राज ठाकरे यांचा घणाघात

पोलीस कॉन्स्टेबलला निष्पक्षतेचा भंग केला म्हणून सक्तीच्या रजेवर पाठवले गेले होते. मग तोच न्याय आणि तीच कडक भूमिका वर्तमान सरकार नांगरे पाटील यांच्याबाबत घेणार का
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar27/06/2026Updated:27/06/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्यावर ‘दुहेरी निष्ठा’ दाखवल्याचा आरोप करत, त्यांना पोलीस सेवेचा राजीनामा देऊन संघात किंवा भाजपमध्ये सामील होण्याचा सल्ला दिला आहे. एका हिंदू संमेलनात उपस्थित राहून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आणि त्यांच्या संस्थापकांची स्तुती करणाऱ्या नांगरे पाटील यांच्या भूमिकेवर ठाकरे यांनी अत्यंत तीव्र शब्दांत आक्षेप घेतला आहे. पोलीस अधिकाऱ्याची निष्ठा ही केवळ आणि केवळ पोलीस दलाच्या कर्तव्याशी आणि निष्पक्षतेशीच असायला हवी, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
राज ठाकरे यांनी म्हटले आहे की, सध्या राज्यात भरवली जाणारी हिंदू संमेलने ही वरकरणी अराजकीय दाखवली जात असली तरी त्यामागे निश्चितपणे राजकीय हेतू दडलेले आहेत. अशा व्यासपीठावर जाऊन एका जबाबदार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने संघाची तोंडभरून स्तुती करणे हे प्रशासकीय नियमांच्या बाह्य आहे. जर नांगरे पाटील यांना संघाबद्दल एवढीच आपुलकी असेल, तर त्यांनी शासकीय पदाचा राजीनामा देऊन उघडपणे राजकारणात उतरावे. सध्याच्या काळात मर्जीतील अधिकाऱ्यांसाठी पुनर्वसन योजना सुरूच असल्याने त्यांचेही पुनर्वसन होईल, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. नांगरे पाटील यांच्या वर्दीचा खाकी रंग हा पोलीस दलाचा नसून संघाच्या आधीच्या खाकी हाफ पँटचा आहे की काय, अशी शंका आता येऊ लागली आहे, अशी टीका त्यांनी केली.
राज ठाकरे नेमकं काय म्हणाले वाचा लिंकमध्ये… https://x.com/i/status/2070738964156383710

या संपूर्ण प्रकरणावरून राज ठाकरे यांनी राज्य सरकारला, पर्यायाने मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनाही धारेवर धरले आहे. अधिकाऱ्यांची अशी दुहेरी निष्ठा सरकारला कशी चालते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
या संदर्भात २०१२ मधील एका घटनेची आठवण करून देत ठाकरे म्हणाले की, तत्कालीन मनसेच्या मोर्चात पोलिसांची बाजू घेणाऱ्या एका पोलीस कॉन्स्टेबलला निष्पक्षतेचा भंग केला म्हणून सक्तीच्या रजेवर पाठवले गेले होते. मग तोच न्याय आणि तीच कडक भूमिका वर्तमान सरकार नांगरे पाटील यांच्याबाबत घेणार का, की सरकारचा त्यांना मूक पाठिंबा आहे, अशी विचारणा त्यांनी केली आहे. सत्ताधाऱ्यांनी अशा चुकीच्या गोष्टींना खतपाणी घालून भविष्यातील पिढ्यांसमोर चुकीचे पायंडे पाडू नयेत, असा इशाराही त्यांनी दिला.
लोकप्रतिनिधींना दबावाखाली आणून पळत जावे लागते अशी परिस्थिती असताना, आता जर सरकारी अधिकारीही निष्पक्ष राहिले नाहीत तर जनतेने कोणाकडे पाहायचे, असा उद्विग्न सवाल त्यांनी केला. विश्वास नांगरे पाटील हे एक चांगले आणि कार्यक्षम अधिकारी आहेत, त्यामुळे त्यांनी आपली सद्सद्विवेकबुद्धी कोणत्याही राजकीय पक्ष किंवा संघटनेसमोर गहाण टाकू नये, अशी विनंती राज ठाकरे यांनी शेवटी केली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 760
आरएसएस राज ठाकरे विश्वास नांगरे पाटील
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

निझर्णेश्वर मंदिराच्या विकासाचा मार्ग मोकळा करणार: आमदार अमोल खताळ

17/08/2026

नाशिक-पुणे रेल्वे: पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या वक्तव्याचा नाशिक-पुणे रेल्वे कृती समितीकडून तीव्र निषेध

08/08/2026

संगमनेर तालुक्यासाठी ३५७ मेट्रिक टन युरियाचा बफर स्टॉक खुला; आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर कृषी विभागाची कारवाई

07/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

५२ हजार रुपयांच्या अवैध अग्निशस्त्रासह युवक जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

By Annant Ppangarkar21/08/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर: अहिल्यानगर पोलीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिशिंगणापूर परिसरातील हॉटेल ब्लू…

संगमनेरच्या डॉक्टरवर राहता पोलिसात गुन्हा दाखल! एकाचा मृत्यू, एक गंभीर

21/08/2026

अवैध गुटखा माफियांचे कंबरडे मोडले; स्थानिक गुन्हे शाखेची तब्बल ९४ लाख ६८ हजारांच्या मुद्देमालासह ५८ आरोपींवर धडक कारवाई

21/08/2026

आज शुक्रवार, २१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

21/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.