Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गुरुवार ०१ आक्टोंबर २०२६ — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

01/10/2026

अंगारकी चतुर्थीनिमित्त श्री वरदविनायकाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी, आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यासह हजारो भाविकांनी घेतले दर्शन; खिचडी महाप्रसाद व सामुदायिक अथर्वशीर्ष पठणाने कोतूळ नगरी भक्तिमय

30/09/2026

संगमनेरकरांची सुरक्षा होणार अधिक भक्कम; नगरपरिषदेसाठी २ नवीन अग्निशामक वाहनांना प्रशासकीय मान्यता, आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश! साक्षी सूर्यवंशी यांची माहिती

30/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमध्ये आंतरराष्ट्रीय आकाराच्या फुटबॉल मैदानाचे थाटात उद्घाटन; रिमझिम पावसात संगमनेरकरांनी लुटला ‘फुटबॉल फिव्हर’चा आनंद
क्रिडा व कला

संगमनेरमध्ये आंतरराष्ट्रीय आकाराच्या फुटबॉल मैदानाचे थाटात उद्घाटन; रिमझिम पावसात संगमनेरकरांनी लुटला ‘फुटबॉल फिव्हर’चा आनंद

या मैदानावर आता प्रत्येक रविवारी 'संगमनेर संडे लीग' अंतर्गत फुटबॉल सामन्यांचे आयोजन केले जाणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar22/06/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
संगमनेर:
डोंगराच्या कुशीत वेल्हाळे परिसरातील अमृतवाहिनी शिक्षण संस्थेच्या भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय प्रांगणात नवनिर्मित आंतरराष्ट्रीय आकाराच्या ‘लोकनेते बाळासाहेब थोरात फुटबॉल मैदाना’चा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न झाला. राज्याचे माजी महसूल व शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे यांच्या हस्ते या मैदानाचा लोकार्पण सोहळा पार पडला. जागतिक स्तरावर कमालीची लोकप्रियता असलेला फुटबॉल खेळ संगमनेरच्या मातीत रुजावा आणि येथून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडावेत, अशी अपेक्षा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी यावेळी व्यक्त केली.
या मैदानावर आता प्रत्येक रविवारी ‘संगमनेर संडे लीग’ अंतर्गत फुटबॉल सामन्यांचे आयोजन केले जाणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी सहभागी खेळाडूंना मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. उद्घाटनाचे औचित्य साधून संगमनेर फुटबॉल क्लब विरुद्ध एवरेस्ट फुटबॉल क्लब यांच्यात एक रोमांचक प्रदर्शनीय सामना रंगला.
यासोबतच ध्रुव ग्लोबल अकॅडमी, अमृतवाहिनी निडो इंटरनॅशनल स्कूल आणि डेंटल कॉलेज या संघांचेही थरारक सामने पार पडले. संपूर्ण महाराष्ट्राला पावसाची प्रतीक्षा असताना, सामना सुरू होताच पावसाची रिमझिम सुरू झाली. या पहिल्या पावसात स्वतः बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे आणि उपस्थित मान्यवरांनी संपूर्ण वेळ भिजत सामन्यांचा मनसोक्त आनंद घेतला. पावसाच्या साक्षीने झालेला हा सोहळा उपस्थित हजारो क्रीडाप्रेमींसाठी संस्मरणीय ठरला.
सध्या जगभरात फिफा वर्ल्ड कपचा फिव्हर सुरू असल्याचे सांगत बाळासाहेब थोरात यांनी जागतिक स्तरावर फुटबॉल क्रीडा प्रकाराचे महत्त्व अधोरेखित केले. संगमनेरमधील युवकांना जागतिक दर्जाच्या सुविधा मिळाव्यात यासाठी हे मैदान तयार करण्यात आले असून, आगामी काळात या मैदानाचे आणखी आधुनिकीकरण केले जाईल, तसेच शेजारीच क्रिकेटचे भव्य मैदानही उभारले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
शेतकरी कुटुंबातून पुढे येत जागतिक पातळीवर नाव कमावणाऱ्या अजिंक्य रहाणेचे उदाहरण देत त्यांनी युवकांना खेळातून करिअर घडवण्याचे आवाहन केले. तसेच, तरुणांनी सोशल मीडियावरील ‘रील्स’मध्ये वेळ न घालवता मैदानी खेळांना प्राधान्य द्यावे आणि युट्युबवर फुटबॉल सामन्यांचा अभ्यास करावा, असा सल्लाही त्यांनी दिला. आरोग्यासाठी पाणी आणि खेळाचे अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे सांगत त्यांनी सर्वांना पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन केले.
आमदार सत्यजित तांबे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, बाळासाहेब थोरात यांच्या दूरदृष्टीमुळे तालुक्यातील युवकांना आंतरराष्ट्रीय आकाराचे दर्जेदार स्टेडियम उपलब्ध झाले आहे, ज्यामुळे निरोगी जीवनशैलीला आणि क्रीडा संस्कृतीला चालना मिळेल. या सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कृषी महाविद्यालयाच्या इमारतीवर लावण्यात आलेली ४० फुटी भव्य स्क्रीन, ज्यावर उपस्थित प्रेक्षकांना फिफा वर्ल्ड कपचे थरारक गोल आणि क्षणचित्रे पाहता आली.
या कार्यक्रमाला नगराध्यक्ष डॉ. मैथिलीताई तांबे, कार्यकारी विश्वस्त शरयूताई देशमुख, पांडुरंग घुले यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, मुख्य अधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते व क्रीडाप्रेमी उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 435
फुटबॉल मैदान बाळासाहेब थोरात मैथिली तांबे सत्यजित तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पराभूत होऊनही लोकनेते बाळासाहेब थोरातांचे राजकीय वलय संपत का नाही? वाचा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने केलेले विश्लेषण…

30/09/2026

संगमनेरमधील एका निष्ठावान शिवसैनिकाचा अनुभव व्हायरल; तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावरील शाईफेकीने चर्चेत आलेले ठाकरे गटाचे तत्कालीन पदाधिकारी भाऊसाहेब हासे यांनी केलेले वक्तव्य चर्चेत! बाळासाहेब थोरात यांना… ते तर…!

28/09/2026

वाढदिवस विशेष लेख — व्हिजनरी लीडर सत्यजित तांबे

27/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

गुरुवार ०१ आक्टोंबर २०२६ — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

By Annant Ppangarkar01/10/20260

आजचे राशिभविष्य –  मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि नवीन ऊर्जा घेऊन येणारा…

अंगारकी चतुर्थीनिमित्त श्री वरदविनायकाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी, आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यासह हजारो भाविकांनी घेतले दर्शन; खिचडी महाप्रसाद व सामुदायिक अथर्वशीर्ष पठणाने कोतूळ नगरी भक्तिमय

30/09/2026

संगमनेरकरांची सुरक्षा होणार अधिक भक्कम; नगरपरिषदेसाठी २ नवीन अग्निशामक वाहनांना प्रशासकीय मान्यता, आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश! साक्षी सूर्यवंशी यांची माहिती

30/09/2026

महात्मा गांधी जयंतीनिमित्त संगमनेरमध्ये जयहिंदच्या वतीने विविध उपक्रम; १५७ विद्यार्थ्यांची प्रभात फेरी अन् ‘जवाहरलाल हाजीर हो’ पुस्तकाचे प्रकाशन

30/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.