Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

बालविवाह रोखण्यासाठी लग्नपत्रिकेवर जन्मतारीख? आमदार सत्यजीत तांबे यांचा शासनाच्या संभाव्य निर्णयावर तीव्र आक्षेप

June 24, 2026

दुसऱ्याच्या चेकवर केस करणे पडले महागात, आरोपीची निर्दोष मुक्तता

June 24, 2026

ग्रामीण भागातील सायंकाळचे लोडशेडिंग तात्काळ बंद करा; आमदार अमोल खताळ यांची विधानसभेत आक्रमक मागणी

June 24, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » बालविवाह रोखण्यासाठी लग्नपत्रिकेवर जन्मतारीख? आमदार सत्यजीत तांबे यांचा शासनाच्या संभाव्य निर्णयावर तीव्र आक्षेप
राजकारण

बालविवाह रोखण्यासाठी लग्नपत्रिकेवर जन्मतारीख? आमदार सत्यजीत तांबे यांचा शासनाच्या संभाव्य निर्णयावर तीव्र आक्षेप

अनेक प्रभावी मार्ग उपलब्ध असताना अशा प्रतीकात्मक उपायांवर भर देणे योग्य नाही.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJune 24, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

https://x.com/i/status/2069734732120612878

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
मुंबई:
बालविवाह रोखण्यासाठी लग्नपत्रिकेवर नवरा-नवरीच्या नावापुढे जन्मतारीख छापणे बंधनकारक करण्याच्या राज्य शासनाच्या संभाव्य विचारावर आमदार सत्यजीत तांबे यांनी तीव्र शब्दांत आक्षेप घेतला असून, असा निर्णय घेणे पुरोगामी महाराष्ट्रासाठी हास्यास्पद ठरेल, असे त्यांनी म्हटले आहे.
आमदार सत्यजीत तांबे यांनी यासंदर्भात एक ट्विट करत सरकारवर निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, एका बाजूला बालविवाह रोखण्यासाठी कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करणे, सक्षम यंत्रणा उभारणे आणि व्यापक स्तरावर जनजागृती करणे यांसारखे अनेक ठोस आणि प्रभावी मार्ग उपलब्ध आहेत. असे असताना शासन अशा केवळ प्रतीकात्मक आणि वरवरच्या उपायांवर भर देत आहे, जे अजिबात योग्य नाही.
इतर काही राज्यांच्या पद्धतीचा अवलंब करून महाराष्ट्रातही असा नियम लागू करण्याचा विचार सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार तांबे यांनी राज्याच्या स्वाभिमानाची जाणीव करून दिली आहे. महाराष्ट्र कधीही इतर राज्यांच्या मागे चालत नाही, तर उलट देशाला नवी दिशा देण्याचे काम या राज्याने नेहमीच केले आहे, असे स्पष्ट करत त्यांनी या संभाव्य निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 35
टीका विवाह पत्रिका जन्मतारीख सत्यजित तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

ग्रामीण भागातील सायंकाळचे लोडशेडिंग तात्काळ बंद करा; आमदार अमोल खताळ यांची विधानसभेत आक्रमक मागणी

June 24, 2026

राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात उभारणार ‘अमली पदार्थविरोधी स्वतंत्र युनिट’, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्याला यश

June 24, 2026

संगमनेरमध्ये आंतरराष्ट्रीय आकाराच्या फुटबॉल मैदानाचे थाटात उद्घाटन; रिमझिम पावसात संगमनेरकरांनी लुटला ‘फुटबॉल फिव्हर’चा आनंद

June 22, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

बालविवाह रोखण्यासाठी लग्नपत्रिकेवर जन्मतारीख? आमदार सत्यजीत तांबे यांचा शासनाच्या संभाव्य निर्णयावर तीव्र आक्षेप

By अनंत पांगारकरJune 24, 20260

https://x.com/i/status/2069734732120612878 महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मुंबई: बालविवाह रोखण्यासाठी लग्नपत्रिकेवर नवरा-नवरीच्या नावापुढे जन्मतारीख छापणे बंधनकारक करण्याच्या…

दुसऱ्याच्या चेकवर केस करणे पडले महागात, आरोपीची निर्दोष मुक्तता

June 24, 2026

ग्रामीण भागातील सायंकाळचे लोडशेडिंग तात्काळ बंद करा; आमदार अमोल खताळ यांची विधानसभेत आक्रमक मागणी

June 24, 2026

राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात उभारणार ‘अमली पदार्थविरोधी स्वतंत्र युनिट’, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्याला यश

June 24, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.