Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

खेडकर दांपत्यावर गुन्हा दाखल; १३.३० कोटींची बेहिशेबी मालमत्ता उघड, ACB ची मोठी कारवाई!

30/09/2026

बुधवार ३० सप्टेंबर २०२६ — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

30/09/2026

‘पैशाचा पाऊस’ पडणारच होता, पण…; अहिल्यानगरमध्ये ९२ लाखांच्या बनावट नोटांसह टोळी गजाआड!

29/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शिक्षकांच्या समर्पित योगदानामुळे शिंदेवाडी शाळा समृद्ध : विस्तार अधिकारी अनिल गायकवाड
शिक्षण

शिक्षकांच्या समर्पित योगदानामुळे शिंदेवाडी शाळा समृद्ध : विस्तार अधिकारी अनिल गायकवाड

यानंतर उपस्थितांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय स्कूल बॅग आणि शूजचे वितरण करण्यात आले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar28/06/2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अकोले:
चांगले शिक्षण हा विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा मुख्य पाया असून, शिक्षकांचे समर्पित योगदान आणि त्याला लाभलेली ग्रामस्थांची भक्कम साथ यांमुळेच शिंदेवाडी शाळा खऱ्या अर्थाने समृद्ध झाली आहे, असे गौरवोद्गार विस्तार अधिकारी अनिल गायकवाड यांनी काढले.
तालुक्यातील गणोरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदेवाडी येथे श्री व श्रीमती रामनारायणजी बुब ट्रस्टच्या वतीने शाळेसाठी अत्याधुनिक इंटरऍक्टिव्ह डिजिटल बोर्ड व ३५ विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले. तसेच अनिकेत बॅटरी हाऊसकडून शाळेला इन्व्हर्टर बॅटरी देणगी म्हणून देण्यात आली. या शैक्षणिक साहित्याच्या लोकार्पण व वाटप सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून अनिल गायकवाड बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावाचे सरपंच संतोष आंबरे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून राजेंद्र आंबरे, रोटरी क्लबचे संचालक सुनील कडलग, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिगंबर दातीर, जगन्नाथ आहेर, तंटामुक्ती समितीचे अशोक आहेर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याध्यापिका वृषाली कडलग यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून कार्यक्रमाचा मुख्य उद्देश स्पष्ट केला आणि मान्यवरांचे स्वागत केले.
यानंतर उपस्थितांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय स्कूल बॅग आणि शूजचे वितरण करण्यात आले. नवीन शैक्षणिक साहित्य मिळाल्याने चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आणि उत्साह ओसंडून वाहत होता.
याप्रसंगी रोटरी क्लबचे संचालक सुनील कडलग यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, ग्रामीण भागातील प्रत्येक प्राथमिक शाळा ही ज्ञान देणारे जीवन शिक्षण मंदिर आहे. ही मंदिरे जर भौतिक आणि डिजिटल साधनांनी खऱ्या अर्थाने समृद्ध झाली, तर आपला भारत देश भविष्यात अधिक सामर्थ्यसंपन्न होईल. मात्र यासाठी केवळ शासन स्तरावर अवलंबून न राहता समाजातील प्रत्येक घटकाने आणि दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन आपले योगदान देण्याची नितांत आवश्यकता आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदेवाडी, गणोरे या शाळेला सेंट्रल बँक ऑफ इंडिया व उमंग फाउंडेशन, मुंबई यांचे तर्फे स्वच्छतागृह व संरक्षण भिंत सीएसआर फंडा मधून बांधून देण्यात आली. रोटरी क्लब ऑफ संगमनेरचे माजी अध्यक्ष ऋषिकेश
मोंढे यांनी स्टील कपाट, प्रा. मंगल गोडगे यांच्याकडून विद्यार्थ्यांना शालेय वह्या, मुख्याध्यापिका वृषाली कडलग यांच्या मातोश्री स्व. रोहिणी राधाकृष्ण आरोटे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शाळेला पेवर ब्लॉक बसविण्यात आले व शाळेला रंग देऊन आणि बोलक्या भिंती बनविण्यात आल्या. दिगंबर दातीर यांनी शाळेसाठी स्टील ग्रील, कल्पना पाटील यांनी काच फलक, रविंद्र व गणेश आंबरे यांनी विद्यार्थ्यांच्या पोषण आहारासाठी जेवणाची ताटे, जिजाऊ बिग्रेड संगमनेर यांच्यातर्फे ३५ विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, अनिता कोदे यांच्याकडून
विद्यार्थ्यांना शूज आणि सॉक्स अशा देणग्या शाळेला प्राप्त झाल्या.
याप्रसंगी शाळा समितीच्या उपाध्यक्ष प्रियंका हांडे, अशोकराव आहेर, दत्तात्रय हांडे, रविंद्र काळे, विजय दातीर, प्रकाश आहेर, संतोष भालेराव, योगेश आंबरे, गणेश आंबरे, विशाल आंबरे, शीतल आंबरे, जयराम आंबरे, गोरख आहेर, गणेश दातीर, विनोद खतोडे, श्रीकांत खतोडे, डॉ. अतुल दातीर, अक्षदा आंबरे, निशा खतोडे, ज्योती आंबरे, गणेश आंबरे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी शाळेला मदत करणाऱ्या सर्व दानशूर संस्थांचे आणि व्यक्तींचे आभार मानण्यात आले. या उपक्रमामुळे शिंदेवाडी शाळेच्या डिजिटल शिक्षणाला मोठी गती मिळणार असून, ग्रामस्थांनी या स्तुत्य उपक्रमाचे विशेष कौतुक केले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय हांडे यांनी तर आभार प्रदर्शन कल्पना पाटील यांनी केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 551
शिक्षण
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नियमांचे उल्लंघन; राजापूर जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांवर कारवाई होणार का? पालकांचा सवाल

17/09/2026

संगमनेर तालुक्यातील तीन जिल्हा परिषद शाळांसाठी ६२ लाखांचा निधी मंजूर; नवीन वर्गखोल्यांचे होणार बांधकाम

12/09/2026

मुलींचे शिक्षण ही समाजाची ताकद; पालिका शाळेच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध – नगरसेविका साक्षी सूर्यवंशी

12/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

खेडकर दांपत्यावर गुन्हा दाखल; १३.३० कोटींची बेहिशेबी मालमत्ता उघड, ACB ची मोठी कारवाई!

By Annant Ppangarkar30/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – वादग्रस्त ठरलेल्या माजी प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणीत…

बुधवार ३० सप्टेंबर २०२६ — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

30/09/2026

‘पैशाचा पाऊस’ पडणारच होता, पण…; अहिल्यानगरमध्ये ९२ लाखांच्या बनावट नोटांसह टोळी गजाआड!

29/09/2026

दुष्काळ, जिल्हा बँक आणि राजकारण : नाण्याच्या दोन बाजू एकत्र आल्या! पुढे काय…

29/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.