Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » समरवीर देशमुखची राज्यस्तरीय कौशल्य चाचणीत चमकदार कामगिरी; बालेवाडीच्या क्रीडा प्रबोधिनीत मिळवला प्रवेश
यश / निवड / पुरस्कार

समरवीर देशमुखची राज्यस्तरीय कौशल्य चाचणीत चमकदार कामगिरी; बालेवाडीच्या क्रीडा प्रबोधिनीत मिळवला प्रवेश

समरवीर मागील पाच वर्षांपासून मालपाणी हेल्थ क्लबमध्ये राष्ट्रीय जलतरणपटू व प्रशिक्षक अ‍ॅड. सदाशिवराव थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली जलतरणाचा खडतर सराव करत आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar16/07/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन 

संगमनेर:

मालपाणी हेल्थ क्लबचा युवा जलतरणपटू समरवीर देशमुख याने जलतरणातील राज्यस्तरीय कौशल्य चाचणीत चमकदार कामगिरी करत संगमनेरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या घवघवीत यशामुळे त्याला पुण्यातील बालेवाडी येथील ‘श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल क्रीडा प्रबोधिनी’मध्ये थेट इयत्ता आठवीच्या वर्गात सन्मानपूर्वक प्रवेश मिळाला आहे. समरवीरने आपल्या गुणवत्तेच्या बळावर मिळविलेल्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून त्याचे कौतुक होत आहे.

समरवीरच्या मातोश्री रेश्मा देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, समरवीर मागील पाच वर्षांपासून मालपाणी हेल्थ क्लबमध्ये राष्ट्रीय जलतरणपटू व प्रशिक्षक अ‍ॅड. सदाशिवराव थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली जलतरणाचा खडतर सराव करत आहे. तसेच त्याच्या शारीरिक तंदुरुस्तीसाठी हेल्थ क्लबचे प्रशिक्षक सचिन क्षीरसागर यांनीही त्याला विशेष परिश्रमपूर्वक तयार केले आहे.

१४ वर्षांखालील जिल्हा व राज्यस्तरीय कौशल्य चाचणीत समरवीरने उत्तम गुणांसह यश संपादन केल्याने त्याची या शासकीय प्रबोधिनीत निवड झाली. महाराष्ट्रातून आंतरराष्ट्रीय व ऑलिंपिक दर्जाचे खेळाडू घडवण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या या प्रबोधिनीत समरवीरला आता इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण, शास्त्रोक्त क्रीडा प्रशिक्षण, संतुलित आहार आणि अद्ययावत सुविधा मोफत मिळणार आहेत.

अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील विरगाव येथील स्वर्गीय मेजर शंकरराव थोरात यांचा पणतू असलेल्या समरवीरच्या या अभिमानास्पद कामगिरीवर मालपाणी उद्योग समूहाचे चेअरमन राजेश मालपाणी यांनी आनंद व्यक्त केला आहे. संगमनेर तालुका आणि अहिल्यानगर जिल्ह्यासाठी भूषणावह ठरलेल्या या यशात मालपाणी हेल्थ क्लबचे योगदान असल्याचा सार्थ अभिमान त्यांनी व्यक्त केला. राजेश मालपाणी यांच्यासह हेल्थ क्लबचे सभासद, व्यवस्थापक, प्रशिक्षक आणि संगमनेरमधील क्रीडाप्रेमींनी समरवीरचे हार्दिक अभिनंदन करून त्याच्या भावी ऑलिंपिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 429
जलतरण बालेवाडी समरवीर देशमुख
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

प्रवीण बागडे यांना ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न’ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

18/08/2026

संगमनेर तालुका व शहर काँग्रेसच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर; अजय फटांगरे, सोमेश्वर दिवटे आणि अमोल शेलकर यांच्यावर मोठी जबाबदारी

18/07/2026

रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३२ च्या असिस्टंट गव्हर्नरपदी आनंद हासे

16/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- खाजगी बँकेच्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी सतत फोन करून धमकावणे, घरी येऊन…

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.