Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » राष्ट्रीय पोषण पंधरवड्यात अहिल्यानगर जिल्ह्याचा देशात डंका; उपक्रम राबवण्यात पटकावला प्रथम क्रमांक
महाराष्ट्र संवाद विशेष

राष्ट्रीय पोषण पंधरवड्यात अहिल्यानगर जिल्ह्याचा देशात डंका; उपक्रम राबवण्यात पटकावला प्रथम क्रमांक

जनजागृती उपक्रमांमध्ये अहिल्यानगर जिल्ह्याने देशात अव्वल स्थान प्राप्त केले आहे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar20/04/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, अहिल्यानगर:
महिला व बाल विकास विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या आठव्या राष्ट्रीय पोषण पंधरवड्यात अहिल्यानगर जिल्ह्याने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ९ एप्रिल ते २३ एप्रिल २०२६ या कालावधीत राबवल्या जाणाऱ्या जनजागृती उपक्रमांमध्ये अहिल्यानगर जिल्ह्याने देशात अव्वल स्थान प्राप्त केले आहे. जिल्ह्याने आतापर्यंत तब्बल ३ लाख २४ हजार ७५ उपक्रमांची नोंदणी करून ही मोठी झेप घेतली असून, या यादीत पुणे जिल्हा दुसऱ्या तर बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे.
या पोषण पंधरवड्याचा मुख्य उद्देश बालकाच्या आयुष्यातील पहिल्या सहा वर्षांतील मेंदूचा विकास हा असून, याच संकल्पनेवर आधारित विविध उपक्रम सध्या जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रांमध्ये राबविले जात आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या हस्ते जिल्हास्तरावर या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला होता. पहिल्या सहा वर्षांतील पोषण आणि शिक्षण हे बालकाच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याने या काळात मुलांच्या मेंदू विकासाकरिता पूर्व उद्दीपन, खेळ आधारित पूर्व शालेय शिक्षण आणि बालकांचा स्क्रीन वेळ कमी करणे यांसारख्या विषयांवर विशेष भर दिला जात असल्याची माहिती जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय कदम यांनी दिली आहे.
गाव पातळीवर हे अभियान यशस्वी करण्यासाठी आरोग्य, शालेय शिक्षण आणि ग्रामविकास या विभागांमध्ये उत्तम समन्वय पाहायला मिळत आहे. ग्रामपंचायत आणि अंगणवाडी स्तरावर मशाल फेरी, पाककृती स्पर्धा, पोषण रॅली, माता-बालक आरोग्य मार्गदर्शन शिबिरे आणि आहार प्रात्यक्षिके अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या मोहिमेत स्थानिक नागरिक, पालक आणि महिलांचा उत्स्फूर्त सहभाग लाभत असून, बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी हे अभियान अधिक प्रभावीपणे राबवण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 344
महिला व बाल विकास विभाग राष्ट्रीय पोषण पंधरवडा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

महात्मा गांधी हे भारतीय तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब: संदीप वाकचौरे

07/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- रस्त्यावरील वाहनांच्या वादातून पिकअप चालकाला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या…

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.