Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आधी ऑनलाईन पैसे उकळले, मग कोर्ट मॅरेजला नकार देऊन मागितली खंडणी; अहिल्यानगर जिल्ह्यात विवाह फसवणुकीचे मोठे रॅकेट उघड!

June 20, 2026

आज शनिवार, २० जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 20, 2026

संगमनेरमध्ये उबाठा गटाच्या पदाधिकारी, शिवसैनिकांकडून गद्दारी करणाऱ्या खासदार वाकचौरे विरोधात आंदोलन; ७ जणांसह इतर आंदोलकांवर गुन्हा

June 19, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » वणव्यांमुळे पर्यावरणाचे नुकसान; उपाययोजना होत नसतील तर झाडे लावायची कशाला? – डॉ. सुधीर तांबे
महाराष्ट्र संवाद विशेष

वणव्यांमुळे पर्यावरणाचे नुकसान; उपाययोजना होत नसतील तर झाडे लावायची कशाला? – डॉ. सुधीर तांबे

मालदाड येथील डोंगराला लागलेल्या आगीवेळी स्थानिक सरपंच आणि नागरिकांनी ती विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र प्रशासकीय मदतीअभावी ते हतबल झाल्याचे चित्र पाहायला मिळाले
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरApril 27, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर:

संगमनेर तालुक्यासह राज्यभरात सध्या जंगलांना लागणाऱ्या आगींचे सत्र सुरू असून, यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. या गंभीर घटना रोखण्यासाठी प्रशासनाकडून कोणत्याही ठोस किंवा समाधानकारक उपाययोजना केल्या जात नसल्याचा थेट आरोप माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केला आहे.

मालदाड परिसरात नुकत्याच लागलेल्या भीषण आगीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपली तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. वारंवार लागणाऱ्या वणव्यांमुळे केवळ झाडेच जळून खाक होत नसून वन्यजीवांचेही अतोनात नुकसान होत आहे. या परिस्थितीमुळे पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर नैराश्य पसरले आहे. आपण ‘दंडकारण्य अभियाना’च्या माध्यमातून वृक्षलागवड आणि पर्यावरण संवर्धनासाठी रात्रंदिवस कष्ट घेत आहोत. मात्र, जर अशाच प्रकारे मानवनिर्मित किंवा नैसर्गिक आगींमुळे ही झाडे जळून जाणार असतील, तर ‘झाडे लावायची तरी कशाला?’ असा उद्विग्न सवाल डॉ. तांबे यांनी प्रशासनाला विचारला आहे.

जंगलांना लागणाऱ्या आगीची ही समस्या केवळ संगमनेर तालुक्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. नाशिक जिल्ह्यातील पेठ आणि कळवण यांसारख्या दुर्गम तालुक्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर वणवे लागत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. मालदाड येथील डोंगराला लागलेल्या आगीवेळी स्थानिक सरपंच आणि नागरिकांनी ती विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र प्रशासकीय मदतीअभावी ते हतबल झाल्याचे चित्र पाहायला मिळाले, असेही त्यांनी नमूद केले.

वनविभागाने केवळ वृक्षलागवडीचे उद्दिष्ट न ठेवता, लावलेली झाडे जगवण्यासाठी आणि वणव्यांपासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी प्रभावी यंत्रणा कार्यान्वित करणे आवश्यक आहे. आगी लागण्यामागची नेमकी कारणे शोधून त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज असल्याचे डॉ. तांबे यांनी स्पष्ट केले. या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी ते लवकरच राज्याच्या वनमंत्र्यांना सविस्तर निवेदन सादर करणार असून, राज्यभरातील जंगलांचे संरक्षण करण्यासाठी शासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी केली आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 347
जंगल वणवा सुधीर तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

संगमनेर येथे ‘सत्यशोधक विचारमंच’तर्फे हनुमंत पवार यांच्या व्याख्यानाचे आयोजन

June 16, 2026

संगमनेर नजीकच्या आढा ओढ्यात अज्ञात व्यक्तीचा जळालेला मृतदेह आढळल्याने खळबळ; पोलिसांकडून ओळख पटविण्याचे काम सुरू!

June 11, 2026

अकोले तालुक्यात भीषण स्फोट; मासेमारीसाठी नेण्यात येणाऱ्या स्फोटकांचा दुचाकीवरच स्फोट, एक जण गंभीर जखमी

June 10, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

आधी ऑनलाईन पैसे उकळले, मग कोर्ट मॅरेजला नकार देऊन मागितली खंडणी; अहिल्यानगर जिल्ह्यात विवाह फसवणुकीचे मोठे रॅकेट उघड!

By अनंत पांगारकरJune 20, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन राहाता पोलिसांनी विवाह जुळवण्याच्या बहाण्याने तरुणांची फसवणूक व खंडणी मागणाऱ्या तीन…

आज शनिवार, २० जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 20, 2026

संगमनेरमध्ये उबाठा गटाच्या पदाधिकारी, शिवसैनिकांकडून गद्दारी करणाऱ्या खासदार वाकचौरे विरोधात आंदोलन; ७ जणांसह इतर आंदोलकांवर गुन्हा

June 19, 2026

‘रेल्वेमंत्र्यांना नफा-तोट्यापलीकडचे गणित समजत नाही!’ नाशिक-पुणे रेल्वे रद्द केल्याने आमदार सत्यजीत तांबे यांचा संताप; जनआंदोलनाचा इशारा

June 19, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.