Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज शनिवार 19 सप्टेंबर, जाणून घ्या आजचे सर्व राशीचे राशिभविष्य

19/09/2026

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

18/09/2026

निष्क्रिय लोकांनी विकासावर बोलू नये; मुरूम-वाळूच्या पुढे न जाणाऱ्या लोकप्रतिनिधींवर बाळासाहेब थोरातांचा घणाघात

18/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » प्रेमप्रकरणातून तरुणीवर ब्लेडने प्राणघातक हल्ला
गुन्हेगारी

प्रेमप्रकरणातून तरुणीवर ब्लेडने प्राणघातक हल्ला

तिने कागद आणि पेन मागवून घेत त्यावर आरोपीचे नाव लिहून पोलिसांना माहिती दिली.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar01/05/2026No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, पुणे:

पुण्यातील चंदननगर भागात एका तरुणाने प्रेमप्रकरणातील वादातून २२ वर्षीय तरुणीचा ब्लेडने गळा चिरून खून करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. उजालादेवी जसवंतसिंग दोहरे असे जखमी तरुणीचे नाव असून, तिची प्रकृती सध्या अत्यंत चिंताजनक आहे. 

याप्रकरणी तरुणीचा भाऊ भगतसिंग दोहरे याने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी हे दोघेही नगर रस्त्यावरील एका मॉलमध्ये एकत्र काम करत होते. त्यांच्यात गेल्या काही काळापासून प्रेमसंबंध होते, मात्र अलीकडे त्यांच्यात खटके उडत होते. बुधवारी, २९ एप्रिल रोजी तरुणी घरात एकटी असल्याचे पाहून आरोपीने पठारे वस्ती येथील तिच्या घरात प्रवेश केला. तेथे झालेल्या वादानंतर आरोपीने तिच्या गळ्यावर ब्लेडने वार केले आणि तो घटनास्थळावरून पसार झाला.

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या उजालादेवीने तातडीने आपल्या भावाला फोन करून घरी बोलावले. सुरुवातीला तिला ससून रुग्णालयात नेण्यात आले, मात्र प्रकृती अधिक बिघडल्याने तिला खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात हलवण्यात आले आहे. गळ्याला गंभीर जखम झाल्यामुळे तिला बोलता येत नव्हते, मात्र तिने कागद आणि पेन मागवून घेत त्यावर आरोपीचे नाव लिहून पोलिसांना माहिती दिली. 

पोलीस उपायुक्त सोमय मुंडे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश बडाख यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून, फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 523
गुन्हेगारी प्राणघातक हल्ला
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

18/09/2026

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज शनिवार 19 सप्टेंबर, जाणून घ्या आजचे सर्व राशीचे राशिभविष्य

By Annant Ppangarkar19/09/20260

आजचे राशिभविष्य  मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत सकारात्मक आणि उत्साहवर्धक राहील. कार्यक्षेत्रात नवीन संधी…

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

18/09/2026

निष्क्रिय लोकांनी विकासावर बोलू नये; मुरूम-वाळूच्या पुढे न जाणाऱ्या लोकप्रतिनिधींवर बाळासाहेब थोरातांचा घणाघात

18/09/2026

गाजलेल्या गीतांचा नजराणा संगमनेरकरांना ‘दिल से’ आवडला! ‘संगमनेर फेस्टिव्हल’चा दुसरा दिवस; रहेमान म्युझिकने गाजवला

18/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.