Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

पोलिसाच्या शेतातील बाजरीच्या कणसांवर जादूटोणा; संगमनेर तालुक्यात एकावर गुन्हा दाखल

03/10/2026

आज शनिवार ३ ऑक्टोबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घेऊया

03/10/2026

पुस्तकापुरते मर्यादित न राहता ऑडिओ आणि रील्सच्या माध्यमातून विचार पोहोचवा : बाळासाहेब थोरात

02/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » डिजिटल जनगणनेचा श्रीगणेशा; नागरिकांना स्वतःची माहिती ऑनलाईन नोंदवण्याचे तहसीलदार धिरज मांजरे यांचे आवाहन
महाराष्ट्र संवाद विशेष

डिजिटल जनगणनेचा श्रीगणेशा; नागरिकांना स्वतःची माहिती ऑनलाईन नोंदवण्याचे तहसीलदार धिरज मांजरे यांचे आवाहन

संगमनेर शहरात सर्वाधिक १३५ प्रगणक कार्यरत असतील, तर घुलेवाडी ग्रामपंचायत क्षेत्रात ५७ आणि गुंजाळवाडी भागात २२ प्रगणकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar05/05/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर:

देशाच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या भारतीय जनगणनेच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून, यावेळी प्रथमच संपूर्णतः डिजिटल पद्धतीने ही गणना केली जात आहे. या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यात प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून प्रगणक आणि पर्यवेक्षकांना विशेष प्रशिक्षण दिले जात आहे. विशेष म्हणजे, यंदा नागरिकांना प्रगणकाची वाट न पाहता स्वतःहून आपली माहिती नोंदवण्याची संधी ‘स्व-जनगणना’ (सेल्फ इन्युमरेशन) माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेऊन राष्ट्रीय कार्यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन संगमनेरचे तहसीलदार तथा जनगणना अधिकारी धिरज मांजरे यांनी केले आहे.

तालुक्यातील जनगणनेच्या कामकाजासाठी महसूल विभागाने स्वतंत्र कक्ष कार्यान्वित केला असून, तहसीलदार स्वतः चार्ज अधिकारी म्हणून यावर देखरेख ठेवत आहेत. त्यांना जनगणना लिपिक धनंजय गायवळ आणि तंत्रज्ञान सहाय्यक गणेश सोनवणे तांत्रिक सहकार्य करत आहेत.

सध्या तालुक्यात तीन टप्प्यांत शिक्षकांना प्रशिक्षण दिले जात असून, त्यापैकी दोन टप्पे यशस्वीरित्या पूर्ण झाले आहेत. एकूण ६७२ प्रगणक आणि ११२ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून, आपत्कालीन स्थितीसाठी १० टक्के अतिरिक्त कर्मचाऱ्यांनाही प्रशिक्षित करून ठेवण्यात आले आहे. एका प्रगणकावर साधारणपणे १८० ते २०० कुटुंबांच्या सर्वेक्षणाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

जनगणनेचा हा पहिला टप्पा दोन भागांत विभागला गेला आहे. १ मे ते १५ मे या कालावधीत नागरिक https://se.census.gov.in या संकेतस्थळावर जाऊन स्वतःच्या घराची आणि कुटुंबाची माहिती भरू शकणार आहेत. त्यानंतर १६ मे ते १४ जून या काळात प्रगणक प्रत्यक्ष घरोघरी जाऊन माहिती संकलित करतील. या पहिल्या टप्प्यात मुख्यत्वे घरांची गणना केली जाणार असून, जनगणनेचा दुसरा टप्पा फेब्रुवारी २०२७ मध्ये पार पडणार आहे.

स्व-जनगणना करताना नागरिकांना कुटुंबातील प्रमुखाचे नाव, लिंग, घराचे बांधकाम, छताचा प्रकार, उपलब्ध स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत, वीज सुविधा, सांडपाणी व्यवस्थापन, स्वयंपाकाचे इंधन तसेच घरातील मोबाईल, रेडिओ, टीव्ही, इंटरनेट, संगणक, सायकल आणि वाहने यांसारख्या भौतिक साधनांची सविस्तर माहिती नोंदवावी लागणार आहे. ही सर्व माहिती पूर्णपणे गोपनीय राखली जाणार असून ती कोणत्याही परिस्थितीत त्रयस्त व्यक्तीला उपलब्ध करून दिली जाणार नाही, अशी ग्वाही प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे नागरिकांनी निर्भयपणे आणि अचूक माहिती नोंदवावी, असे सूचित करण्यात आले आहे.

क्षेत्रफळानुसार संगमनेर शहरात सर्वाधिक १३५ प्रगणक कार्यरत असतील, तर घुलेवाडी ग्रामपंचायत क्षेत्रात ५७ आणि गुंजाळवाडी भागात २२ प्रगणकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वेक्षणासाठी शासनाकडून नकाशे आणि डिजिटल साधने पुरवण्यात आली असून, आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे यावेळची जनगणना अधिक अचूक आणि पारदर्शक होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 554
जनगणना डिजिटल जनगणना धीरज मांजरे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पुस्तकापुरते मर्यादित न राहता ऑडिओ आणि रील्सच्या माध्यमातून विचार पोहोचवा : बाळासाहेब थोरात

02/10/2026

फडणवीसांना थेट ललकारलं! ३ महिने जेलमध्ये टाकलं तरी पुन्हा येईन; ‘कॉक्रोच जनता पार्टी’चा मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात एल्गार, दादरमध्ये उद्या ठिय्या

01/10/2026

माजी खासदारावर गुन्हा दाखल

01/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

पोलिसाच्या शेतातील बाजरीच्या कणसांवर जादूटोणा; संगमनेर तालुक्यात एकावर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar03/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील शेळकेवाडी येथे मुंबई पोलिसाच्या शेतात वाळत घातलेल्या बाजरीच्या कणसांवर…

आज शनिवार ३ ऑक्टोबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घेऊया

03/10/2026

पुस्तकापुरते मर्यादित न राहता ऑडिओ आणि रील्सच्या माध्यमातून विचार पोहोचवा : बाळासाहेब थोरात

02/10/2026

संगमनेरात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात; १५७ बालगांधींच्या प्रभात फेरीने शहर दुमदुमले, गांधीजींच्या विचारांमुळे जगात भारताची मोठी ओळख: मा. आमदार डॉ. सुधीर तांबे

02/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.