Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » युरियाचा काळाबाजार: संगमनेरमध्ये कृषी विभागाची धडक कारवाई; विनाबिल खतविक्री अन् अनधिकृत साठा जप्त
गुन्हेगारी

युरियाचा काळाबाजार: संगमनेरमध्ये कृषी विभागाची धडक कारवाई; विनाबिल खतविक्री अन् अनधिकृत साठा जप्त

काळाबाजार करणाऱ्या या दुकानाचा खतविक्रीचा परवाना कायमचा निलंबित करण्यासाठी वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठवण्यात आल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी रेजा बोडके यांनी दिली आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar19/08/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन

संगमनेर:

रासायनिक खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी कृषी विभागाने आक्रमक पावले उचलली असून, संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी येथे शिवकृपा कृषी सेवा केंद्रावर धडक कारवाई करण्यात आली आहे. अनधिकृत ठिकाणी खतसाठा करून शेतकऱ्यांना बिल न देता युरियाची विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार या कारवाईत उघडकीस आला. या कारवाईदरम्यान ३ हजार ७२४ रुपये किमतीच्या युरियाच्या १४ गोण्या जप्त करण्यात आल्या असून, संबंधित दुकानदारावर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चंदनापुरी येथील शिवकृपा कृषी सेवा केंद्रात युरियाची गाडी उतरवून त्याची छुप्या मार्गाने विक्री सुरू असल्याची पक्की माहिती कृषी विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे उपविभागीय कृषी अधिकारी अक्षय गोसावी, तंत्र अधिकारी किरण विरकर आणि गुण नियंत्रण अधिकारी ओमकार यन्नम यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी छापा टाकला. त्यावेळी काही शेतकरी युरियाच्या बॅगा घेऊन जात असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. दुकानासमोर उभ्या असलेल्या एका शेतकऱ्याकडे आर.सी.एफ. कंपनीच्या युरियाच्या दोन बॅगा मिळून आल्या. कृषी अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता, त्याने हे खत याच दुकानातून खरेदी केल्याचे सांगत दुकानदाराने बिल दिले नसल्याची माहिती दिली.

या प्रकारानंतर पथकाने दुकानमालक मंगेश रहाणे यास बोलावून दुकाची झाडाझडती घेतली. तपासादरम्यान रासायनिक खतांच्या विक्रीची अधिकृत बिले न देणे, बिलांच्या नोंदींमध्ये फेरफार असणे आणि पॉस (POS) मशीनवर युरियाच्या साठ्याची नोंद न ठेवणे अशा गंभीर त्रुटी आढळून आल्या. एवढेच नव्हे तर दुकानाशेजारील परवान्यात समाविष्ट नसलेल्या अनधिकृत गाळ्याची तपासणी केली असता, त्यात लपवून ठेवलेला युरियाचा साठा सापडला. दुकानदाराने हा साठा आपलाच असल्याचे मान्य केले.

याप्रकरणी कृषी अधिकारी दत्तात्रय साळुंखे यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलिसांनी मंगेश रहाणे याच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. नियमांचे उल्लंघन करून काळाबाजार करणाऱ्या या दुकानाचा खतविक्रीचा परवाना कायमचा निलंबित करण्यासाठी वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठवण्यात आल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी रेजा बोडके यांनी दिली आहे. कृषी विभागाच्या या कडक कारवाईमुळे तालुक्यातील खतविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,244
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- खाजगी बँकेच्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी सतत फोन करून धमकावणे, घरी येऊन…

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.