Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अवैध धंद्यांवर एलसीबीचा दणका; एकाच दिवसात ११ छापे, गुन्हे दाखल
गुन्हेगारी

अवैध धंद्यांवर एलसीबीचा दणका; एकाच दिवसात ११ छापे, गुन्हे दाखल

संगमनेर, नेवासा आणि श्रीरामपूर परिसरात मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अचानक छापे मारले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar19/08/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन

अहिल्यानगर:

अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर आणि अवैध व्यवसायांचे कंबरडे मोडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) धडक मोहीम हाती घेतली आहे. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या थेट आदेशानंतर एलसीबीच्या पथकांनी मंगळवारी एकाच दिवशी संगमनेर शहर, नेवासा आणि श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत तब्बल ११ वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकल्या. या धडक कारवाईत जुगार आणि अवैध दारू विक्री करणाऱ्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले असून, एकूण ४४ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करत ११ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांची पाळेमुळे खणून काढून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिले होते. या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम आखण्यात आली. यासाठी पोलीस उपनिरीक्षक संदीप दरवडे यांच्यासह निळकंठ कारखेले, सोमनाथ झांबरे, राहुल डोके, बाळासाहेब गुंजाळ, रणजीत जाधव, सुनील मालणकर, भगवान धुळे, बाळासाहेब नागरगोजे, भगवान सानप, आजिनाथ पाखरे, किशोर शिरसाठ, महादेव भांड, राहुल द्वारके, शाहीद शेख, अभिजीत अरकल, अरुण गांगुर्डे, अशोक लिपणे आणि योगेश कर्डीले या कर्मचाऱ्यांची तीन स्वतंत्र पथके तयार करून जिल्ह्यात रवाना करण्यात आली होती.

या तीनही पथकांनी काल मंगळवारी (१८ ऑगस्ट) दिवसभर संगमनेर, नेवासा आणि श्रीरामपूर परिसरात मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अचानक छापे मारले. संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुगाराच्या एका कारवाईत ९ हजार ९४० रुपयांचा तर दारूच्या तीन कारवायांमध्ये ८ हजार १३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नेवासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दारूच्या एका कारवाईत ५ हजार ८९० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सर्वाधिक कारवाया श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाल्या असून, तेथे जुगाराच्या चार कारवायांत १२ हजार १६० रुपये आणि दारूच्या दोन कारवायांत ८ हजार ५३० रुपयांचा माल जप्त करण्यात आला. एलसीबीच्या या अचानक झालेल्या थेट कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 761
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- खाजगी बँकेच्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी सतत फोन करून धमकावणे, घरी येऊन…

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.