Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज सोमवार, २२ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 22, 2026

राजकीय गद्दारीच्या विरोधात माकप राज्यभर तीव्र निदर्शने करणार: डॉ. अजित नवले

June 21, 2026

रविवार विशेष लेख — महाराष्ट्राला शाप फाटाफुटीचा

June 21, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शिंदेसेनेची अहिल्यानगर जिल्हा कार्यकारिणी तडकाफडकी बरखास्त; उदय सामंत यांचा मोठा निर्णय
राजकारण

शिंदेसेनेची अहिल्यानगर जिल्हा कार्यकारिणी तडकाफडकी बरखास्त; उदय सामंत यांचा मोठा निर्णय

शिर्डी येथे झालेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीत संगमनेर, शिर्डी, राहुरी, नेवासा आणि श्रीरामपूर या तालुक्यांमधील संघटनात्मक कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरMay 8, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शिर्डी:
शिंदेसेनेच्या अहिल्यानगर जिल्हा कार्यकारिणीमध्ये वाढत्या तक्रारी आणि संघटनात्मक त्रुटींची दखल घेत, जिल्हा संपर्क मंत्री उदय सामंत यांनी संपूर्ण कार्यकारिणी तडकाफडकी बरखास्त करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. शिर्डी येथे आयोजित आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, लवकरच नव्या जोमाने काम करणारी नवीन कार्यकारिणी जाहीर केली जाणार असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमधील वाढते मतभेद, संघटनात्मक कामातील मरगळ आणि तक्रारींचा ओघ पाहता हा टोकाचा निर्णय घेण्यात आला आहे. शिर्डी येथे झालेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीत संगमनेर, शिर्डी, राहुरी, नेवासा आणि श्रीरामपूर या तालुक्यांमधील संघटनात्मक कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
यावेळी सामंत यांनी जिल्हा संघटनेची दक्षिण व उत्तर अशा दोन्ही विभागांतील कार्यकारिणी विसर्जित केली. मात्र, नवीन निवडी होईपर्यंत प्रभारी जिल्हाप्रमुख म्हणून नितीनराव औताडे, कमलाकर कोते, बाबुशेठ टायरवाले आणि अनिल शिंदे यांच्यावर दिलेली जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आणि कामात वेग आणण्यासाठी युवासेना, महिला आघाडी, शहर व ग्रामीण अशा सर्वच आघाड्यांची नव्याने फेररचना करण्याचे निर्देश उदय सामंत यांनी दिले आहेत.
सामंत यांनी शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेऊन या दौऱ्याची सुरुवात केली असून, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्याची जबाबदारी त्यांच्याकडे असल्याने आगामी काळात त्यांचे हे दौरे पक्षासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत.
या बैठकीला आमदार अमोल खताळ, माजी खासदार सदाशिव लोखंडे, माजी आमदार भानुदास मुरकुटे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, शिवसेना नेते सागर बेग, जिल्हाध्यक्ष नितीन औताडे आणि प्रवक्ते संजीव भोर यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 416
अहिल्यानगर दक्षिण उत्तर कार्यकारिणी बरखास्त शिंदे सेना शिवसेना शिंदे गट
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

‘रेल्वेमंत्र्यांना नफा-तोट्यापलीकडचे गणित समजत नाही!’ नाशिक-पुणे रेल्वे रद्द केल्याने आमदार सत्यजीत तांबे यांचा संताप; जनआंदोलनाचा इशारा

June 19, 2026

ऑपरेशन टायगर हा महाराष्ट्रातील राजकारणाच्या इतिहासातला काळा दिवस – माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा संताप

June 18, 2026

ठाकरे गटाच्या ६ गद्दार खासदारांचे दिल्लीत लोटांगण; अखेर शिंदेशाहीत विलीन होणार! गद्दारांच्या यादीत शिर्डीचे खासदार!

June 17, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज सोमवार, २२ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

By अनंत पांगारकरJune 22, 20260

आजचे राशिभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि धावपळीचा राहील. कामाच्या ठिकाणी तुम्ही घेतलेल्या…

राजकीय गद्दारीच्या विरोधात माकप राज्यभर तीव्र निदर्शने करणार: डॉ. अजित नवले

June 21, 2026

रविवार विशेष लेख — महाराष्ट्राला शाप फाटाफुटीचा

June 21, 2026

आज रविवार, २१ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 21, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.