Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » थोरात कारखान्यातून १ कोटी ४० लाख लिटर इथेनॉलची विक्रमी निर्मिती; वाढत्या इंधन समस्येला इथेनॉल हाच सर्वोत्तम पर्याय – माजी मंत्री बाळासाहेब थोरात
महाराष्ट्र संवाद विशेष

थोरात कारखान्यातून १ कोटी ४० लाख लिटर इथेनॉलची विक्रमी निर्मिती; वाढत्या इंधन समस्येला इथेनॉल हाच सर्वोत्तम पर्याय – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

देशात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या टंचाईवर इथेनॉल हा प्रभावी मार्ग असल्याने, इथेनॉल निर्मिती करणाऱ्या सहकारी साखर कारखान्यांसाठी केंद्र सरकारने रास्त भाव निश्चित करून देणे आवश्यक आहे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar15/05/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर:

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने चालू हंगामात १ कोटी ४० लाख लिटर इथेनॉल निर्मितीचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण केला आहे. या विशेष कामगिरीनिमित्त आयोजित कार्यक्रमात राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात बोलत होते. जागतिक पातळीवर युद्धाच्या परिस्थितीमुळे निर्माण झालेला इंधनाचा तुटवडा पाहता, इथेनॉल हा भविष्यातील इंधनासाठी एक सक्षम आणि सर्वोत्तम पर्याय असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले की, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श शिस्तीवर आणि विचारांवर कारखान्यासह सर्व संस्थांची वाटचाल अत्यंत पारदर्शकपणे सुरू आहे. राज्यातील अनेक सहकारी कारखान्यांमध्ये अल्कोहोलपासून दारूची निर्मिती केली जाते, मात्र थोरात कारखान्याने आपली सामाजिक बांधिलकी जपत दारू निर्मितीऐवजी इंडस्ट्रियल अल्कोहोल आणि इथेनॉल निर्मितीवर भर दिला आहे.

सध्याच्या काळात वीज निर्मिती आणि इथेनॉल प्रकल्प हे साखर कारखान्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी मोठी मदत करत आहेत. कारखान्याने कायमच शेतकऱ्यांना उच्चांकी भाव देण्याची परंपरा जोपासली असून सांघिक प्रयत्नातूनच हे यश साध्य झाले आहे.

याप्रसंगी त्यांनी केंद्र सरकारकडे महत्त्वाची मागणीही केली. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या टंचाईवर इथेनॉल हा प्रभावी मार्ग असल्याने, इथेनॉल निर्मिती करणाऱ्या सहकारी साखर कारखान्यांसाठी केंद्र सरकारने रास्त भाव निश्चित करून देणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले, युवक काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. जयश्रीताई थोरात, संचालक संपतराव गोडगे, सतीश वर्पे, विलास शिंदे, रामनाथ कुटे, विजय राहणे, गुलाबराव देशमुख, अरुण वाकचौरे, अंकुश ताजणे, मदन आंबरे, लताताई गायकर, हौशीराम सोनवणे यांच्यासह कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, सेक्रेटरी किरण कानवडे आणि विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जगन्नाथ घुगरकर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार पांडुरंग पाटील घुले यांनी मानले. या सोहळ्यासाठी कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 460
इथेनॉल बाळासाहेब थोरात
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- खाजगी बँकेच्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी सतत फोन करून धमकावणे, घरी येऊन…

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.