Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » खाणीत बुडून दोन सख्ख्या भावांचा अंत; मुंबईहून परतताच बाळासाहेब थोरातांनी गाठले तिगाव, सानप कुटुंबाचे केले सांत्वन
महाराष्ट्र संवाद विशेष

खाणीत बुडून दोन सख्ख्या भावांचा अंत; मुंबईहून परतताच बाळासाहेब थोरातांनी गाठले तिगाव, सानप कुटुंबाचे केले सांत्वन

आपला मुंबई दौरा आटोपून परतताच त्यांनी थेट तिगाव येथे धाव घेतली. कुटुंबप्रमुख या नात्याने त्यांनी मृत मुलांच्या मातोश्री मनीषा सानप व त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar23/05/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर:

तिगाव येथील दगडाच्या खाणीत साचलेल्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भीषण दुर्घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल व कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनी तीव्र दुःख व्यक्त केले. आपला मुंबई दौरा आटोपून परतताच त्यांनी थेट तिगाव येथे धाव घेतली. कुटुंबप्रमुख या नात्याने त्यांनी मृत मुलांच्या मातोश्री मनीषा सानप व त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

महेश गोरखनाथ सानप (वय १८) आणि ओंकार गोरखनाथ सानप (वय १४) या मृत पावलेल्या दोन तरुण मुलांचा अशा प्रकारे अचानक झालेला अंत पाहून बाळासाहेब थोरात स्वतः भावूक झाले होते. त्यांनी सानप कुटुंबाला धीर देत, या कठीण काळात संपूर्ण तालुका आणि ग्रामस्थ तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील, अशी ग्वाही दिली.

पोहताना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ही मोठी दुर्घटना घडली असून, भविष्यात अशा निष्पाप जीवांचे बळी जाऊ नयेत यासाठी सर्वांनीच आवश्यक ती काळजी घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे आवाहन थोरात यांनी यावेळी केले. तसेच, त्यांनी सानप कुटुंबाला तातडीने शासकीय मदत मिळवून देण्यासाठी घटनास्थळावरूनच महसूल आणि कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन लावला. या पीडित कुटुंबाला शासनाच्या नियमांनुसार जास्तीत जास्त आणि तातडीने आर्थिक मदत सुपूर्द करण्याचे कडक निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.

या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण संगमनेर तालुक्यात तीव्र हळहळ व्यक्त होत असून, अवघ्या एक वर्षापूर्वीच वडिलांचे छत्र हरपलेल्या या सानप कुटुंबावर आता दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या सांत्वन भेटीच्या वेळी तिगावचे सरपंच ज्ञानेश्वर सानप, शेतकी संघाचे संचालक सचिन दिघे, डॉ. संदीप गोरडे, अनिल कांदळकर, वाल्मीक सानप, छबुराव सानप, नामदेव सानप, प्रभाकर कांदळकर, प्रकाश सानप, संजय सानप, योगेश सानप, विशाल सानप यांच्यासह गावातील अनेक आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 910
बाळासाहेब थोरात सांत्वन
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- खाजगी बँकेच्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी सतत फोन करून धमकावणे, घरी येऊन…

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.