Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » भाजपची मोठी खेळी! प्रवेश करताच प्राजक्त तनपुरेंना अहिल्यानगरमधून विधानपरिषदेची उमेदवारी, भाजपच्या ११ उमेदवारांची घोषणा
राजकारण

भाजपची मोठी खेळी! प्रवेश करताच प्राजक्त तनपुरेंना अहिल्यानगरमधून विधानपरिषदेची उमेदवारी, भाजपच्या ११ उमेदवारांची घोषणा

प्राजक्त तनपुरे यांच्यासोबतच भाजपाने राज्यातील इतर महत्त्वाच्या मतदारसंघांतूनही मातब्बर नेत्यांना उमेदवारी दिली आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar01/06/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मुंबई:

राज्याच्या राजकीय वर्तुळात सध्या विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कमालीची लगबग पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून महायुतीच्या नेत्यांमध्ये जागावाटपाबाबत सुरू असलेल्या मॅरेथॉन बैठकांचे सत्र अखेर संपले असून, महायुतीमधील जागावाटपाचा तिढा पूर्णपणे सुटला आहे. विधानपरिषदेच्या एकूण १७ जागांपैकी तब्बल ११ जागांवर भारतीय जनता पक्ष निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महायुतीचा तिढा सुटून उमेदवारांची घोषणा झाल्यामुळे आता राज्यातील विधानपरिषदेचा हा रणसंग्राम अधिकच चुरशीचा आणि रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.

उर्वरित जागांपैकी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना ४ जागांवर आणि अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष २ जागांवर आपले उमेदवार रिंगणात उतरवणार आहे.

जागावाटपाचा हा फॉर्म्युला निश्चित होताच भारतीय जनता पक्षाने अत्यंत वेगाने पावले टाकत आपल्या वाट्याला आलेल्या सर्व ११ उमेदवारांची अधिकृत घोषणाही केली आहे. यामध्ये सर्वात मोठी आणि राजकीयदृष्ट्या लक्षवेधी घडामोड अहिल्यानगरमध्ये घडली आहे.

नुकताच भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केलेले माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांना पक्षाने तात्काळ अहिल्यानगरमधून विधानपरिषदेची उमेदवारी बहाल केली आहे. तनपुरे यांच्या पक्षप्रवेशामुळे आणि उमेदवारीमुळे या भागातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली असून भाजपच्या जुन्या-जाणत्या निष्ठावंतांमध्ये मात्र नाराजीची भावना पसरली आहे.

प्राजक्त तनपुरे यांच्यासोबतच भाजपाने राज्यातील इतर महत्त्वाच्या मतदारसंघांतूनही मातब्बर नेत्यांना उमेदवारी दिली आहे. 

यामध्ये भंडारा-गोंदिया मतदारसंघातून अविनाश ब्राह्मणकर, अमरावतीतून प्रविण पोटे पाटील, सांगली-सातारा मतदारसंघातून धैर्यशील कदम आणि सोलापूरमधून राजेंद्र राऊत यांना पक्षाने मैदानात उतरवले आहे. तसेच नांदेडमधून अमर राजूरकर, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून अरुण लखानी, तर धाराशिव-लातूर-बीडमधून बसवराज पाटील भाजपाचे नेतृत्व करतील. याशिवाय नागपूरमधून डॉ. राजीव पोतदार, जळगावमधून नंदकिशोर महाजन आणि छत्रपती संभाजीनगर-जालना मतदारसंघातून सुहास शिरसाट यांच्या नावावर पक्षाने शिक्कामोर्तब केले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 424
प्राजक्त तनपुरे भाजप महायुती विधान परिषद निवडणूक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- खाजगी बँकेच्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी सतत फोन करून धमकावणे, घरी येऊन…

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.