Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज बुधवार, २ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

02/09/2026

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » नाशिक पदवीधरचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांना मानाचा ‘साने गुरुजी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर; उद्या पुण्यात होणार गौरव
यश / निवड / पुरस्कार

नाशिक पदवीधरचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांना मानाचा ‘साने गुरुजी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर; उद्या पुण्यात होणार गौरव

आमदार म्हणून कार्यरत असताना त्यांनी शिक्षण, कृषी, सहकार, वकील, डॉक्टर आणि बेरोजगार पदवीधरांच्या प्रश्नांवर सभागृहात सातत्याने आवाज उठवला आणि ते तडीस नेले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar03/06/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर:

पुरोगामी विचारांचे खंदे पाईक, जयहिंद लोक चळवळीचे संस्थापक आणि नाशिक पदवीधर मतदार संघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांना राष्ट्रसेवा दलाच्या वतीने दिला जाणारा अत्यंत मानाचा ‘साने गुरुजी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय आणि दीर्घ योगदानाची दखल घेऊन हा बहुमान त्यांना प्रदान करण्यात येत आहे.

येत्या ४ जून २०२६ रोजी पुणे येथे आयोजित एका दिमाखदार सोहळ्यात डॉ. तांबे यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. पेशाने एम. एस. सर्जन असलेले डॉ. सुधीर तांबे यांनी केवळ वैद्यकीय सेवाच केली नाही, तर संगमनेरचे नगराध्यक्ष पद सांभाळताना पालिकेच्या कारभाराला एक नवी आणि लोकाभिमुख दिशा दिली. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श विचारांचा वारसा जपत आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संगमनेरच्या सहकार, समाजकारण, शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले. तरुणांना संघटित करून निरोगी समाज घडवण्यासाठी त्यांनी ‘जयहिंद युवा मंच’ची स्थापना केली, तर समाजातील वंचित, मतिमंद व मूकबधिर मुलांच्या शिक्षणासाठी ‘संग्राम मतिमंद विद्यालय’ उभे करून संवेदनशील सामाजिक जाणिवांचा परिचय दिला.

डॉ. तांबे यांच्या याच अष्टपैलू सामाजिक कार्याची दखल घेत उत्तर महाराष्ट्रातील जनतेने त्यांना नाशिक पदवीधर मतदार संघातून सलग तीन वेळा विक्रमी मताधिक्याने विधान परिषदेवर पाठवले. आमदार म्हणून कार्यरत असताना त्यांनी शिक्षण, कृषी, सहकार, वकील, डॉक्टर आणि बेरोजगार पदवीधरांच्या प्रश्नांवर सभागृहात सातत्याने आवाज उठवला आणि ते तडीस नेले.

अहिल्यानगर, नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार अशा पाच जिल्ह्यांतील ५४ तालुक्यांमध्ये डॉ. तांबे यांनी दांडगा जनसंपर्क निर्माण केला आहे. ‘सहज उपलब्धता आणि थेट संवाद’ ही त्यांची ओळख असून, लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी जनतेचे प्रश्न सोडवले आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात ‘नेता नव्हे मित्र’ अशी ख्याती मिळवलेले डॉ. तांबे हे आपल्या आदिवासी आणि गोरगरीब बांधवांबद्दलची तळमळ, विज्ञानवादी दृष्टिकोन आणि साहित्याची आवड यासाठी ओळखले जातात.

डॉ. सुधीर तांबे यांना हा मानाचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल राज्याचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे यांच्यासह अनेक राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे भरभरून अभिनंदन केले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 432
पुरस्कार साने गुरुजी जीवनगौरव पुरस्कार सुधीर तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर येथे ३० ऑगस्टला ‘लोकनेते बाळासाहेब थोरात गुणगौरव पुरस्कार’ सोहळा; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह २० शिक्षकांचा होणार सन्मान

23/08/2026

प्रवीण बागडे यांना ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न’ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

18/08/2026

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे संगमनेर शहरात अद्यावत स्मारक उभारणार : माजी आमदार डॉ. सुधीर तांबे

01/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज बुधवार, २ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar02/09/20260

Annant Ppangarkar आजचे राशीभविष्य- मेष – आजचा दिवस आपल्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. कामाच्या…

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.