Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात उभारणार ‘अमली पदार्थविरोधी स्वतंत्र युनिट’, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्याला यश
राजकारण

राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात उभारणार ‘अमली पदार्थविरोधी स्वतंत्र युनिट’, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्याला यश

या नवीन स्वतंत्र युनिटच्या माध्यमातून अमली पदार्थांच्या संपूर्ण साखळीचा शोध घेतला जाईल
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar24/06/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
संगमनेर:
अमली पदार्थांचा समूळ उच्चाटन करण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात ‘अमली पदार्थविरोधी स्वतंत्र युनिट’ उभारण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशनात केली.
संगमनेर शहर आणि ग्रामीण भागासह राज्यभरात अमली पदार्थांच्या वाढत्या विळख्याविरोधात आता प्रशासनाकडून अत्यंत कठोर पावले उचलली जाणार आहेत. संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात वेळोवेळी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर मोठे यश आले आहे.
संगमनेर तालुक्यात अमली पदार्थांचा पुरवठा, तस्करी आणि विक्रीचे प्रमाण वाढत असल्याने स्थानिक नागरिकांकडून तीव्र चिंता व्यक्त केली जात होती. युवकांचे भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्या या घातक प्रवृत्तीला तातडीने आळा घालण्याची आग्रही मागणी आमदार अमोल खताळ यांनी गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे लावून धरली होती. अमली पदार्थांच्या सखोल तपासासाठी स्थानिक पोलिसांचे विशेष पथक नेमावे, या अवैध धंद्यांना राजाश्रय देणाऱ्यांची सखोल चौकशी व्हावी आणि दोषींवर कायद्यानुसार कठोरात कठोर कारवाई केली जावी, याकडे त्यांनी विधिमंडळात सातत्याने लक्ष वेधले होते.
या महत्त्वाच्या मागणीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत राज्य शासनाची भूमिका स्पष्ट केली. राज्यातील अमली पदार्थांची विक्री, तस्करी आणि सेवन रोखण्यासाठी सरकार व्यापक मोहीम राबवत असून, या नवीन स्वतंत्र युनिटच्या माध्यमातून अमली पदार्थांच्या संपूर्ण साखळीचा शोध घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. पुरवठादार आणि तस्करांचे जाळे उद्ध्वस्त करून त्यांच्यावर प्रभावी कारवाई करण्यासाठी पोलीस यंत्रणेला याद्वारे अधिक बळ मिळणार आहे.
राज्य शासनाच्या या महत्त्वपूर्ण निर्णयाचे आमदार अमोल खताळ यांनी स्वागत केले आहे. अमली पदार्थांच्या विक्री, तस्करी व सेवनाविरोधात ‘शून्य सहनशीलता’ (झिरो टॉलरन्स) धोरण राबवून प्रशासनाने अधिक गतिमानतेने पावले उचलावीत, जेणेकरून आपल्या तरुण पिढीचे भविष्य सुरक्षित राहील, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 354
अमली पदार्थ अमोल खताळ पावसाळी अधिवेशन स्वतंत्र पोलीस युनिट
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पुरस्कार

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालय आणि गुजरात सरकारच्या संयुक्त विद्यमाने…

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.