Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आश्वी परिसरात चोरट्यांचा हैदोस; पोलिसांच्या ढिम्म कारभाराविरोधात नागरिकांचा तीव्र संताप, तक्रारीसाठी ‘उद्या या’ म्हटल्याचा पीडित कुटुंबाचा आरोप
गुन्हेगारी

आश्वी परिसरात चोरट्यांचा हैदोस; पोलिसांच्या ढिम्म कारभाराविरोधात नागरिकांचा तीव्र संताप, तक्रारीसाठी ‘उद्या या’ म्हटल्याचा पीडित कुटुंबाचा आरोप

अहिल्यानगरच्या जिल्हा पोलिस प्रमुखांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालावे, तपासाची सखोल समीक्षा करावी आणि तक्रारदारांना ताटकळत ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करत आरोपींना तात्काळ जेरबंद करावे, अशी जोरदार मागणी संपूर्ण परिसरातून केली जात आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar21/08/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन 

संगमनेर:

संगमनेर तालुक्यातील आश्वी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून अवघ्या पाच दिवसांत चोरीच्या तीन धाडसी घटना घडल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवारी पानोडी येथील जाधव वस्तीवर भरदिवसा ‘गुरु माऊली’ किराणा दुकानात पाणी मागण्याच्या आणि ५०० रुपयांच्या नोटेचे सुट्टे मागण्याच्या बहाण्याने आलेल्या दोन भामट्यांनी महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र जबरीने ओरबाडून नेले. 

पीडित कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी चोरट्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र चोरटे पिंपरी लौकीच्या दिशेने दुचाकीवरून पसार होण्यात यशस्वी ठरले.

या संपूर्ण प्रकारात चोरट्यांच्या हिमतीपेक्षाही आश्वी पोलिसांच्या निष्काळजी आणि ढिम्म कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. भरदिवसा घडलेल्या या जबरी चोरीनंतर पीडित कुटुंब जेव्हा तत्परतेने तक्रार देण्यासाठी आश्वी पोलिस ठाण्यात पोहोचले, तेव्हा त्यांना थेट ‘उद्या या’ असे सांगून माघारी धाडल्याचा अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक आरोप पीडितांनी केला आहे.

गुन्ह्याचा तपास करण्यासाठी सुरुवातीचे काही तास अत्यंत महत्त्वाचे असतात, हे माहीत असतानाही पोलिसांनी दाखवलेल्या या उदासीनतेमुळे सर्वसामान्यांचा पोलिसांवरील विश्वास पूर्णपणे उडाला आहे. श्रीमंत किंवा वजनदार व्यक्तीच्या बाबतीत घडलेल्या घटनेवर अशीच भूमिका घेतली असती का, असा थेट सवाल आता ग्रामस्थ विचारत आहेत.

विशेष म्हणजे, आश्वी बुद्रुक-दाढ बुद्रुक रस्त्यावरील ५ ऑगस्टची घटना असो वा १० ऑगस्ट रोजी निमगाव जाळी येथे झालेली तीन घरांची घरफोडी असो; चोरट्यांची गुन्हे करण्याची आणि दुचाकीवरून पसार होण्याची पद्धत एकच असल्याने या घटनांमागे एकाच टोळीचा हात असण्याची दाट शक्यता आहे. तरीही पोलिसांकडून ठोस तपास, सीसीटीव्ही फुटेजची वेळेत पाहणी किंवा आरोपींचा माग काढण्याचे प्रभावी प्रयत्न होताना दिसत नाहीत.

त्यामुळे आश्वी पोलिसांच्या या सुस्त कारभाराची दखल घेऊन अहिल्यानगरच्या जिल्हा पोलिस प्रमुखांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालावे, तपासाची सखोल समीक्षा करावी आणि तक्रारदारांना ताटकळत ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करत आरोपींना तात्काळ जेरबंद करावे, अशी जोरदार मागणी संपूर्ण परिसरातून केली जात आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 982
आश्वी पोलीस गुन्हेगारी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- खाजगी बँकेच्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी सतत फोन करून धमकावणे, घरी येऊन…

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.