Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अपहरण झालेल्या बालिकेची अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेकडून सुटका; दोन्ही आरोपींना अटक

22/08/2026

कुंभेफळ परिसरात बिबट्याची दहशत: ३ वर्षीय चिमुकल्यावर हल्ला, नागरिकांच्या प्रसंगावधानाने बालकाचे प्राण वाचले

22/08/2026

घारगाव पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड: २ लाख ५ हजार रुपयांच्या मुद्देमालासह ५ आरोपी ताब्यात

22/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अपहरण झालेल्या बालिकेची अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेकडून सुटका; दोन्ही आरोपींना अटक
गुन्हेगारी

अपहरण झालेल्या बालिकेची अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेकडून सुटका; दोन्ही आरोपींना अटक

माहितीच्या आधारे तपास पथकाने लागलीच दरेवाडी येथे छापा टाकून पीडित मुलीची सुटका केली आणि संशयित नूर पठाण यास ताब्यात घेतले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar22/08/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन

अहिल्यानगर:

अहिल्यानगर येथील स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धडक कारवाई करत कोपरगावातून पळवून आणलेल्या एका १२ वर्षीय अल्पवयीन मुलीची दरेवाडी येथून सुखरूप सुटका केली आहे. या कारवाईदरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांना पुढील तपासासाठी कोपरगाव शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १८ ऑगस्ट २०२६ रोजी कोपरगाव येथील १२ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात इसमाने पळवून नेले होते. याप्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १३७(२) अन्वये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनेचे गांभीर्य ओळखून अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी तात्काळ विशेष तपास पथक स्थापन करून आरोपी व पीडितेचा शोध सुरू केला.

तपास सुरू असतानाच शुक्रवारी (२१ ऑगस्ट) पोलीस पथकाला गोपनीय बातमीदाराद्वारे महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. संशयित आरोपी नूर राजू पठाण (वय १९, रा. आंबेडकरनगर, राहाता) याने पीडित मुलीस पळवून आणले असून, ते अहिल्यानगर-सोलापूर रस्त्यावरील दरेवाडी येथील हरीमळा परिसरात लपले असल्याचे कळाले. या माहितीच्या आधारे तपास पथकाने लागलीच दरेवाडी येथे छापा टाकून पीडित मुलीची सुटका केली आणि संशयित नूर पठाण यास ताब्यात घेतले.

ताब्यात घेतलेल्या आरोपीकडे आणि पीडित मुलीकडे अधिक चौकशी केली असता, त्यांना कोपरगावातून पळून येण्यास समीर मनोज सोनगत (वय २२, रा. हरीमळा, दरेवाडी) याने मदत केल्याचे आणि ते गेल्या दोन दिवसांपासून त्याच्याकडेच आश्रयाला असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पोलिसांनी समीर सोनगत यालाही तात्काळ ताब्यात घेतले.

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, पोलीस अंमलदार अरूण गांगुर्डे, फुरकान शेख, अशोक लिपणे, आजिनाथ पाखरे, रणजीत जाधव, अमृत आढाव, अभिजीत आरकल तसेच महिला पोलीस अंमलदार चिमा काळे व किरण ठुबे यांच्या पथकाने केली आहे. सुटका करण्यात आलेली मुलगी आणि दोन्ही आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी कोपरगाव शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 199
अपहरण अल्पवयीन मुलीची सुटका अहिल्यानगर एलसीबी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

घारगाव पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड: २ लाख ५ हजार रुपयांच्या मुद्देमालासह ५ आरोपी ताब्यात

22/08/2026

आश्वी परिसरात चोरट्यांचा हैदोस; पोलिसांच्या ढिम्म कारभाराविरोधात नागरिकांचा तीव्र संताप, तक्रारीसाठी ‘उद्या या’ म्हटल्याचा पीडित कुटुंबाचा आरोप

21/08/2026

दरोड्याचा मोठा कट उधळला: स्थानिक गुन्हे शाखेकडून लक्झरी कार, २ गावठी कट्टे आणि जिवंत काडतुसांसह ५ सराईत गुन्हेगार जेरबंद

21/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अपहरण झालेल्या बालिकेची अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेकडून सुटका; दोन्ही आरोपींना अटक

By Annant Ppangarkar22/08/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर: अहिल्यानगर येथील स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धडक कारवाई करत कोपरगावातून…

कुंभेफळ परिसरात बिबट्याची दहशत: ३ वर्षीय चिमुकल्यावर हल्ला, नागरिकांच्या प्रसंगावधानाने बालकाचे प्राण वाचले

22/08/2026

घारगाव पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड: २ लाख ५ हजार रुपयांच्या मुद्देमालासह ५ आरोपी ताब्यात

22/08/2026

आज शनिवार, ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

22/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.