Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अवैध धंद्यांवर ‘मोक्का’, ‘एमपीडीए’नुसार कठोर कारवाई करा: अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशियांचे संगमनेरात निर्देश

05/09/2026

आज शनिवार, ०५ सप्टेंबर! जाणून घ्या आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल

05/09/2026

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

04/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अवैध धंद्यांवर ‘मोक्का’, ‘एमपीडीए’नुसार कठोर कारवाई करा: अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशियांचे संगमनेरात निर्देश
बैठक

अवैध धंद्यांवर ‘मोक्का’, ‘एमपीडीए’नुसार कठोर कारवाई करा: अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशियांचे संगमनेरात निर्देश

शहरातील अनधिकृत अतिक्रमणे तातडीने हटवणे, मोकाट जनावरांचा बंदोबस्त करणे, नागरिकांची कामे वेळेत पूर्ण करणे आणि घनकचरा व्यवस्थापन प्रभावीपणे राबवण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar05/09/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

Annant Ppangarkar

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन

संगमनेर तालुक्यातील अवैध धंदे, वाळू व मुरुमाचे बेकायदेशीर उत्खनन आणि तस्करी करणाऱ्यांविरोधात ‘मोक्का’, ‘तडीपारी’ व ‘एमपीडीए’ कायद्यांतर्गत कठोर पावले उचलावीत, असे स्पष्ट निर्देश अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले आहेत. 

शुक्रवारी जिल्हाधिकारी आशिया संगमनेर तालुक्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांच्या उपस्थितीत सर्व विभागांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गुन्हेगारांवर व्यापक प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले.

या दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते कंजारभाट समाजातील विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. भटक्या व विमुक्त जमाती प्रवर्गातील या समाजाची कागदपत्रांअभावी गेल्या ४० वर्षांपासून प्रलंबित असलेली अडचण महसूल प्रशासनाच्या संवेदनशील भूमिकेमुळे दूर झाली आहे. घुलेवाडी, गुंजाळवाडी व धांदरफळ बुद्रुक येथील नागरिकांची स्थानिक पातळीवर चौकशी करून ही प्रमाणपत्रे निर्गमित करण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाचा मार्ग आता सुकर झाला आहे.

कंजारभाट समाजातील विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.
कंजारभाट समाजातील विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.

जिल्हाधिकाऱ्यांनी संगमनेर नगरपालिकेला प्रत्यक्ष भेट देऊन तेथील वॉर रूमची पाहणी केली. शहरातील अनधिकृत अतिक्रमणे तातडीने हटवणे, मोकाट जनावरांचा बंदोबस्त करणे, नागरिकांची कामे वेळेत पूर्ण करणे आणि घनकचरा व्यवस्थापन प्रभावीपणे राबवण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. याशिवाय डिजिटल क्रॉप सर्व्हेअंतर्गत पुढील ७ दिवसांत ३३ टक्के ई-पीक पाहणी पूर्ण करणे, शेतकऱ्यांच्या फेरफार नोंदी विहित मुदतीत निर्गत करणे, प्रलंबित जमीन मोजणीची प्रकरणे निकाली काढणे आणि ग्रामीण भागातील विकासकामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्याचे आदेशही त्यांनी महसूल व पंचायत समिती विभागाला दिले.

दौऱ्याच्या शेवटी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनाने अतिक्रमणमुक्त केलेल्या पांदण रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी केली. यामध्ये ४० वर्षांपासून बंद असलेला घुलेवाडी-मालदाड शीवरस्ता, मंगळापूर फाटा, चिखली, पिंपळगाव कोंझिरा ते कोकणेवाडी आणि घारगाव-बोटा शीवरस्त्याचा समावेश होता. मालदाड येथे त्यांनी स्वतः शेतात जाऊन ॲपद्वारे ई-पीक पाहणीची नोंद करून घेतली. वर्षांनुवर्षे बंद असलेले शेतरस्ते व पांदण रस्ते मोकळे करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिल्याबद्दल जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी प्रांताधिकारी अरुण उंडे, तहसीलदार धीरज मांजरे यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 88
जिल्हाधिकारी आढावा बैठक पंकज आशिया
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये विवाह सोहळ्यांसाठी ‘आचारसंहिता’ लागू; रात्री १० नंतर डीजे बंद

06/08/2026

अतिवृष्टीचा इशारा: अकोले तालुक्यातील शाळांना आज सुट्टी जाहीर, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

07/07/2026

या कारणासाठी संगमनेरच्या ‘हॉटेल रंगीला पंजाब’चा परवाना ३० दिवसांसाठी निलंबित; जिल्हाधिकाऱ्यांची कडक कारवाई

04/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
बैठक

अवैध धंद्यांवर ‘मोक्का’, ‘एमपीडीए’नुसार कठोर कारवाई करा: अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशियांचे संगमनेरात निर्देश

By Annant Ppangarkar05/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर तालुक्यातील अवैध धंदे, वाळू व मुरुमाचे बेकायदेशीर उत्खनन…

आज शनिवार, ०५ सप्टेंबर! जाणून घ्या आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल

05/09/2026

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

04/09/2026

संगमनेर बस स्थानक परिसरात कारवाई; एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या तरुणासह २ लाख ७ हजारांच्या मुद्देमाल पकडला

04/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.