Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

पोलिसांची गुटख्याविरोधात मोठी कारवाई; सिनेस्टाईल पाठलाग करून ५१ लाखांचा मुद्देमाल जप्त

25/08/2026

संगमनेरमध्ये सह्याद्री कॉलेज शेजारील ‘बर्गेज कॅफे’वर पोलिसांची धाड; अश्लील चाळ्यांसाठी जागा पुरवणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल

25/08/2026

निमोण-सोनेवाडीतील तरुणांचा शिवसेनेत प्रवेश, आमदार खताळ यांच्या कामाच्या पद्धतीवर विश्वास

25/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » या कारणासाठी संगमनेरच्या ‘हॉटेल रंगीला पंजाब’चा परवाना ३० दिवसांसाठी निलंबित; जिल्हाधिकाऱ्यांची कडक कारवाई
प्रशासन

या कारणासाठी संगमनेरच्या ‘हॉटेल रंगीला पंजाब’चा परवाना ३० दिवसांसाठी निलंबित; जिल्हाधिकाऱ्यांची कडक कारवाई

याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित हॉटेल चालकाला 'कारणे दाखवा' नोटीस बजावून त्यांचा खुलासा मागवला होता
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar04/07/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन 
संगमनेर:
शासनाने घालून दिलेल्या अटी व शर्तींचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी संगमनेर खुर्दमधील प्रसिद्ध ‘हॉटेल रंगीला पंजाब’वर जिल्हा प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी या हॉटेलचा मद्यविक्रीचा परवाना (एफएल-३ परवाना क्रमांक ११५६) ३० दिवसांसाठी निलंबित करण्याचे आदेश दिले असून, प्रशासनाने हे हॉटेल तातडीने बंद केले आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संगमनेर-१ विभागाच्या दुय्यम निरीक्षकांच्या पथकाने या हॉटेलची अचानक आणि सविस्तर तपासणी केली होती. या तपासणीदरम्यान हॉटेलमध्ये अनेक गंभीर त्रुटी आणि बेकायदेशीर बाबी आढळून आल्या. यामध्ये प्रामुख्याने विहित नमुन्यातील मद्यविक्रीच्या नोंदवह्या वेळेवर अद्ययावत न ठेवणे, हॉटेलमध्ये काम करणाऱ्या नोकरांचे अधिकृत नोकरनामे व माहिती प्रशासनाकडे सादर न करणे, तसेच प्रशासनाने ठरवून दिलेल्या विहित वेळेनंतरही म्हणजेच रात्री पावणे बारा वाजेपर्यंत (२३.४५) हॉटेल सुरू ठेवणे अशा नियमांचे उल्लंघन होत असल्याचे समोर आले.
याशिवाय, सर्वात गंभीर बाब म्हणजे हॉटेलचा मंजूर नकाशा सादर न करता, अधिकृत परवानाधारक क्षेत्राच्या बाहेर असलेल्या लॉन्सवर छुप्या पद्धतीने ग्राहकांना मद्यविक्री करणे आणि विनापरवाना ग्राहकांना दारू पिण्याची सोय उपलब्ध करून देणे, असे प्रकार या तपासणीत निष्पन्न झाले होते.
या सर्व अनियमिततेबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाने हॉटेलचे चालक व मालक विकास शिवाजी खुळे यांच्याकडे चौकशी केली होती. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित हॉटेल चालकाला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावून त्यांचा खुलासा मागवला होता, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनात या प्रकरणी रीतसर सुनावणीही घेण्यात आली. मात्र, हॉटेल चालकाने सादर केलेला खुलासा अत्यंत असमाधानकारक, तथ्यहीन आणि केवळ प्रशासकीय त्रुटींवर पांघरूण घालणारा असल्याचा निष्कर्ष जिल्हा प्रशासनाने काढला.
मुंबई विदेशी दारू नियम १९५३ आणि महाराष्ट्र मद्य निषेध कायदा १९४९ मधील विविध कलमे व अटींचे थेट उल्लंघन सिद्ध झाल्याने, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी हॉटेल रंगीला पंजाबचा व्यवसाय आणि मद्यविक्रीचे सर्व व्यवहार पुढील ३० दिवसांसाठी तात्काळ प्रभावाने निलंबित करण्याचे आदेश दिले. या कारवाईमुळे संगमनेर परिसरातील हॉटेल व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,070
निलंबन कारवाई पंकज आशिया हॉटेल परवाना निलंबन हॉटेल रंगीला पंजाब
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

राज्यात खळबळ..! तहसीलदार निलंबित; ‘ते’ प्रकरण भोवलं

14/08/2026

स्वातंत्र्यदिनी भंडारदरा, कळसूबाई फिरण्याचा प्लॅन आहे? आधी पोलिसांचे ‘हे’ नवीन वाहतूक नियम नक्की वाचा!

12/08/2026

डॉ. मीरा ढास यांनी शिर्डी उप माहिती कार्यालयाच्या माहिती अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला

04/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

पोलिसांची गुटख्याविरोधात मोठी कारवाई; सिनेस्टाईल पाठलाग करून ५१ लाखांचा मुद्देमाल जप्त

By Annant Ppangarkar25/08/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यातील खर्डा पोलिसांनी प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य…

संगमनेरमध्ये सह्याद्री कॉलेज शेजारील ‘बर्गेज कॅफे’वर पोलिसांची धाड; अश्लील चाळ्यांसाठी जागा पुरवणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल

25/08/2026

निमोण-सोनेवाडीतील तरुणांचा शिवसेनेत प्रवेश, आमदार खताळ यांच्या कामाच्या पद्धतीवर विश्वास

25/08/2026

आज मंगळवार, २५ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

25/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.