Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमधील भावी पोलीस योद्ध्यांसाठी ‘मिशन खाकी’ ठरतेय आधार; प्रशिक्षण केंद्रांमध्ये जनजागृती मोहीम सुरू

06/10/2026

ज्ञानेशकुमार हे भाजपाचे निवडणूक जिंकण्याचे हत्यार; एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची माजी मंत्री थोरात यांची जोरदार मागणी

06/10/2026

फक्त गतिरोधक नव्हे, अवजड वाहतूक आणि अतिक्रमणावरही ठोस कारवाई करा : इरफानभाई मन्सुरी

06/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ज्ञानेशकुमार हे भाजपाचे निवडणूक जिंकण्याचे हत्यार; एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची माजी मंत्री थोरात यांची जोरदार मागणी
राजकारण

ज्ञानेशकुमार हे भाजपाचे निवडणूक जिंकण्याचे हत्यार; एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची माजी मंत्री थोरात यांची जोरदार मागणी

नाशिक येथून आपल्या न्याय्य मागण्यांसाठी मुंबईकडे निघालेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना दडपशाही करून अटक करण्याच्या घटनेचा त्यांनी तीव्र शब्दांत निषेध केला.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar06/10/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्युज ऑनलाईन-

देशात आणि राज्यात केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांविरोधात तरुणाईमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे. एसआयआरच्या (SIR) मुद्द्यावर काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना निवडणूक आयोग उत्तरे देऊ शकत नाही. निवडणूक आयोग हा पूर्णपणे भाजपचे बाहुले झाला असून ज्ञानेश कुमार हे भाजपाचे निवडणूक जिंकण्याचे प्रमुख हत्यार बनले आहेत, अशी जोरदार टीका काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर येथे बोलताना केली.

राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीवर बोलताना थोरात म्हणाले की, सरकारने पंचनाम्याचा कोणताही फार्स न करता तातडीने शेतकऱ्यांना विनाअट मोठी मदत केली पाहिजे. आपण स्वतः राज्यात कृषी व महसूल मंत्री असताना शेतकऱ्यांना नेहमीच थेट आणि विनाअट मदत दिली जात होती. परंतु, आता दुष्काळी पंचनाम्यांसाठी दोन शेजाऱ्यांची साक्ष मागणारे हे सरकार शेतकऱ्यांची थट्टा करत आहे. पाऊस न पडल्यामुळे पिके जळून गेल्याचे डोळ्यांसमोर दिसत असताना शेजाऱ्यांची साक्ष कशासाठी हवी, असा थेट सवाल करत सरकार शेजाऱ्यांमध्ये भांडणे लावण्याचा हास्यास्पद प्रकार करत असल्याचा घणाघात त्यांनी केला.

ज्ञानेश कुमार यांचा वापर लोकशाहीचा घात करण्यासाठी केला जात असून राहुल गांधींच्या प्रश्नांना निवडणूक आयोगाने उत्तरे देण्याऐवजी भाजपचे नेते का समर्थन करत आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. एसआयआर मुद्द्यावर दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला भाजपने पाठिंबा देण्याऐवजी ते निवडणूक आयोगाचा गैरवापर करत आहेत आणि निवडणुकीत नवनवीन फंडे वापरून सत्तेत राहण्याचा प्रयत्न करत आहेत.

दरम्यान, राज्यातील एमपीएससी परीक्षांच्या गोंधळावर भाष्य करताना त्यांनी अध्यक्षांच्या तातडीच्या राजीनाम्याची मागणी केली. एमपीएससीची तयारी करणारी मुले ही शेतकरी, शेतमजूर आणि बारा बलुतेदारांची आहेत. ही मुले वर्षानुवर्षे अपार कष्ट करून अभ्यास करतात; मात्र धनदांडग्यांची मुले पेपर फोडून पास होतात आणि अभ्यास करणारे निष्पाप विद्यार्थी नापास होतात. त्यामुळे कायद्यापेक्षा नैतिकतेच्या मुद्द्यावर एमपीएससीच्या अध्यक्षांनी तातडीने पदाचा राजीनामा दिला पाहिजे, असे थोरात म्हणाले.

तसेच, नाशिक येथून आपल्या न्याय्य मागण्यांसाठी मुंबईकडे निघालेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना दडपशाही करून अटक करण्याच्या घटनेचा त्यांनी तीव्र शब्दांत निषेध केला. आश्रमशाळा, वसतीगृहांमधील अपुऱ्या सुविधा आणि शिष्यवृत्तीच्या समस्यांमुळे आदिवासी युवक अडचणीत आहेत. सरकारने या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे सहानुभूतीने पाहून त्यांना त्वरित न्याय द्यावा, अशी मागणीही थोरात यांनी केली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 81
बाळासाहेब थोरात
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमधील भावी पोलीस योद्ध्यांसाठी ‘मिशन खाकी’ ठरतेय आधार; प्रशिक्षण केंद्रांमध्ये जनजागृती मोहीम सुरू

06/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या रणधुमाळीत मोठा ट्विस्ट: संगमनेरमधून यांची उमेदवारी फायनल; बाळासाहेब थोरातांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे सर्वांचे लक्ष!

05/10/2026

पुस्तकापुरते मर्यादित न राहता ऑडिओ आणि रील्सच्या माध्यमातून विचार पोहोचवा : बाळासाहेब थोरात

02/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेरमधील भावी पोलीस योद्ध्यांसाठी ‘मिशन खाकी’ ठरतेय आधार; प्रशिक्षण केंद्रांमध्ये जनजागृती मोहीम सुरू

By Annant Ppangarkar06/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहर व परिसरातील गरीब, गरजू आणि होतकरू युवक-युवतींना पोलीस भरतीसाठी…

ज्ञानेशकुमार हे भाजपाचे निवडणूक जिंकण्याचे हत्यार; एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची माजी मंत्री थोरात यांची जोरदार मागणी

06/10/2026

फक्त गतिरोधक नव्हे, अवजड वाहतूक आणि अतिक्रमणावरही ठोस कारवाई करा : इरफानभाई मन्सुरी

06/10/2026

​’माझी फसवणूक झालीये…’; व्हिडिओ बनवून संगमनेरातील बेकरी चालकाच टोकाच पाऊल; शहरात खळबळ

06/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.