Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमधील भावी पोलीस योद्ध्यांसाठी ‘मिशन खाकी’ ठरतेय आधार; प्रशिक्षण केंद्रांमध्ये जनजागृती मोहीम सुरू

06/10/2026

ज्ञानेशकुमार हे भाजपाचे निवडणूक जिंकण्याचे हत्यार; एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची माजी मंत्री थोरात यांची जोरदार मागणी

06/10/2026

फक्त गतिरोधक नव्हे, अवजड वाहतूक आणि अतिक्रमणावरही ठोस कारवाई करा : इरफानभाई मन्सुरी

06/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमधील भावी पोलीस योद्ध्यांसाठी ‘मिशन खाकी’ ठरतेय आधार; प्रशिक्षण केंद्रांमध्ये जनजागृती मोहीम सुरू
राजकारण

संगमनेरमधील भावी पोलीस योद्ध्यांसाठी ‘मिशन खाकी’ ठरतेय आधार; प्रशिक्षण केंद्रांमध्ये जनजागृती मोहीम सुरू

वरिष्ठ पातळीवर लवकरच बैठक होऊन पोलीस भरतीचे वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar06/10/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-

संगमनेर शहर व परिसरातील गरीब, गरजू आणि होतकरू युवक-युवतींना पोलीस भरतीसाठी योग्य मार्गदर्शन व आवश्यक सहाय्य पुरवण्यासाठी ‘मिशन खाकी पोलीस भरती योद्धा सहाय्यता अभियान’ अंतर्गत शहरात व्यापक जनजागृती मोहीम राबवली जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली २ ऑक्टोबर रोजी या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला असून, त्याअनुषंगाने शहरातील विविध पोलीस भरती प्रशिक्षण केंद्रांना भेटी देऊन विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला जात आहे.

पोलीस भरतीची तयारी करताना विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणी, योग्य मार्गदर्शनाचा अभाव, अर्ज प्रक्रियेतील तांत्रिक अडचणी, कागदपत्रांची पूर्तता आणि अभ्यासाचे नियोजन अशा अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर, शिवसेनेचे शहर प्रमुख विनोद सूर्यवंशी यांच्यासह विविध कार्यकर्त्यांनी संगमनेर शहरातील प्रशिक्षण केंद्रांना भेटी देऊन विद्यार्थ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी ‘मिशन खाकी’च्या लिंकवर आपली माहिती भरण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

आर्थिक अडचण किंवा मार्गदर्शनाच्या अभावामुळे कोणत्याही शेतकरी व कष्टकरी कुटुंबातील मुला-मुलीचे खाकी वर्दीचे स्वप्न अपूर्ण राहू नये, असा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मानस आहे. मैदानावर घाम गाळणाऱ्या आणि अभ्यासिकेत अहोरात्र मेहनत करणाऱ्या भावी पोलीस योद्ध्यांच्या पाठीशी ‘मिशन खाकी’चा समन्वय कक्ष खंबीरपणे उभा राहणार असून, सर्व प्रकारची प्रशासकीय व शैक्षणिक मदत पुरवली जाणार असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.

दरम्यान, वरिष्ठ पातळीवर लवकरच बैठक होऊन पोलीस भरतीचे वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे. सर्व रिक्त जागा भरण्याच्या दृष्टीने ही प्रक्रिया राबवली जाणार असल्याने इच्छुक युवक-युवतींनी आपल्या तयारीला गती देऊन या सुवर्णसंधीचे सोने करावे, असे आवाहनही याप्रसंगी करण्यात आले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 123
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

ज्ञानेशकुमार हे भाजपाचे निवडणूक जिंकण्याचे हत्यार; एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची माजी मंत्री थोरात यांची जोरदार मागणी

06/10/2026

मजबुरी का नाम मोदी, मजबुती का नाम महात्मा गांधी!

02/10/2026

आमदार अमोल खताळ शेतकऱ्यांच्या बांधावर; पिकांसंदर्भात अधिकाऱ्यांना या सूचना

01/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेरमधील भावी पोलीस योद्ध्यांसाठी ‘मिशन खाकी’ ठरतेय आधार; प्रशिक्षण केंद्रांमध्ये जनजागृती मोहीम सुरू

By Annant Ppangarkar06/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहर व परिसरातील गरीब, गरजू आणि होतकरू युवक-युवतींना पोलीस भरतीसाठी…

ज्ञानेशकुमार हे भाजपाचे निवडणूक जिंकण्याचे हत्यार; एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची माजी मंत्री थोरात यांची जोरदार मागणी

06/10/2026

फक्त गतिरोधक नव्हे, अवजड वाहतूक आणि अतिक्रमणावरही ठोस कारवाई करा : इरफानभाई मन्सुरी

06/10/2026

​’माझी फसवणूक झालीये…’; व्हिडिओ बनवून संगमनेरातील बेकरी चालकाच टोकाच पाऊल; शहरात खळबळ

06/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.