Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर आगारात ‘शिवाई’ इलेक्ट्रिक बसेस, आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते लोकार्पण; लोकार्पण कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना उपस्थितांकडून श्रद्धांजली

08/10/2026

दुष्काळग्रस्तांकडून सक्तीची वीज बिल वसुली थांबवा; अन्यथा आंदोलन — शिवसेना ठाकरे शहर प्रमुख अमित चव्हाण

08/10/2026

दुष्काळाची पाहणी करण्यासाठी उद्या केंद्रीय पथक अहिल्यानगर जिल्ह्यात; शेती व पाणी परिस्थितीचा घेणार आढावा

08/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर आगारात ‘शिवाई’ इलेक्ट्रिक बसेस, आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते लोकार्पण; लोकार्पण कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना उपस्थितांकडून श्रद्धांजली
राजकारण

संगमनेर आगारात ‘शिवाई’ इलेक्ट्रिक बसेस, आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते लोकार्पण; लोकार्पण कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना उपस्थितांकडून श्रद्धांजली

बसेसचे आमदार अमोल खताळ व त्यांच्या पत्नी नीलम खताळ यांच्या हस्ते विधिवत पूजन करून लोकार्पण करण्यात आले
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar08/10/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-

राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून आणि आमदार अमोल खताळ यांच्या विशेष पाठपुराव्यातून संगमनेर आगारासाठी एकूण २५ ‘शिवाई’ इलेक्ट्रिक बसेस मंजूर करण्यात आल्या आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात प्राप्त झालेल्या बसेसचे आमदार अमोल खताळ व त्यांच्या पत्नी नीलम खताळ यांच्या हस्ते विधिवत पूजन करून लोकार्पण करण्यात आले.

या नवीन वातानुकूलित इलेक्ट्रिक बसेसमुळे संगमनेरच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला आधुनिक व पर्यावरणपूरक स्वरूप प्राप्त झाले असून प्रवाशांना अधिक आरामदायी प्रवासाची सुविधा उपलब्ध झाली आहे.

लोकार्पण सोहळ्यानंतर आमदार खताळ यांनी स्वतः महायुतीच्या पदाधिकाऱ्यांसह नाशिक रोडच्या दिशेने बसमधून फेरफटका मारला. यावेळी त्यांनी बसमधील नवीन आसन व्यवस्था, वातानुकूलित यंत्रणा व इतर सोयी-सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली.

संगमनेर आगार व्यवस्थापक निलेश बेंडकुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या नवीन बसेसपैकी काही बसेसच्या पुणे मार्गावर दर अर्ध्या तासाच्या अंतराने नियमित फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. या फेऱ्या सातत्याने सुरू राहणार असून उर्वरित बसेस जिल्ह्यातील इतर प्रमुख मार्गांवर धावणार आहेत.

या सोहळ्याला संगमनेर आगार व्यवस्थापक निलेश बेंडकुळे, उत्तम कर्पे, वसंत देशमुख, आबासाहेब थोरात, ज्ञानेश्वर कर्पे, रमेश काळे, आरपीआयचे कैलास कासार आणि नगरसेविका साक्षी सूर्यवंशी यांच्यासह शिवसेना-महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनामुळे उपस्थितांनी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. नाना पाटेकर यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचा वेगळा ठसा उमटवला असून, त्यांच्या स्मृतींना या कार्यक्रमात अभिवादन करण्यात आले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 182
अमोल खताळ एसटी बस
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्याला यश; संगमनेर तालुक्यातील प्रलंबित पाणीपुरवठा योजना नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा: मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश… उपअभियंता सक्तीच्या रजेवर, तर योजनांचे होणार थर्ड पार्टी ऑडिट

07/10/2026

तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात यांचा एक फोन आणि सोयाबीनला ४ हजार रुपयांची मदत; दुष्काळात शेतकऱ्यांना जाणवू लागली अनुभवी नेतृत्वाची उणीव

07/10/2026

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे एस.टी. पास शुल्क पूर्णपणे माफ करा; आमदार अमोल खताळ यांची परिवहन मंत्र्यांकडे मागणी

06/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेर आगारात ‘शिवाई’ इलेक्ट्रिक बसेस, आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते लोकार्पण; लोकार्पण कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना उपस्थितांकडून श्रद्धांजली

By Annant Ppangarkar08/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून आणि आमदार अमोल खताळ…

दुष्काळग्रस्तांकडून सक्तीची वीज बिल वसुली थांबवा; अन्यथा आंदोलन — शिवसेना ठाकरे शहर प्रमुख अमित चव्हाण

08/10/2026

दुष्काळाची पाहणी करण्यासाठी उद्या केंद्रीय पथक अहिल्यानगर जिल्ह्यात; शेती व पाणी परिस्थितीचा घेणार आढावा

08/10/2026

एक सशक्त आणि अष्टपैलू अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला; संगमनेरमधून या नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

08/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.