Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ठाकरेंना धक्का | शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह निवडणूक आयोगाने गोठविले
राजकारण

ठाकरेंना धक्का | शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह निवडणूक आयोगाने गोठविले

शिवसेना नांवही वापरण्यास ठाकरे-शिंदेंना बंदी
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar08/10/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
शिवसेना फुटीनंतर राज्यात उद्भवलेला खरी शिवसेना कोणाची हा पेच कायम असतांना केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरेंना मोठा धक्का दिला आहे. शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह तात्पुरत्या स्वरुपात गोठविण्यात आले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे या दोघांनाही शिवसेना नांव वापरता येणार नसल्याचा निर्वाळा आयोगाने दिला आहे. पोटनिवडणूकीपुरता हा निर्णय असल्याचे सांगितले जाते.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचीच खरी शिवसेना असल्याचा व धनुष्यबाण चिन्हदेखील त्यांच्याच गटाचे असल्याचा दावा केला होता. यामुळे राज्यात शिवसेनेत दोन गट पडले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे या दोन गटात शिवसेना विभागली गेल्यामुळे शिवसेनेत अभूतपूर्व पेच निर्माण झाला होता. यासंदर्भातील न्यायालयीन लढाई सुरु असतांना चिन्ह व पक्षासंबधी निर्णय घेण्याचे अधिकार न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले होते. त्यामुळे यासंदर्भात निवडणूक आयोगासमोर सुनावणी झाली.निवडणूक आयोगाला शिवसेना कोण याचा फैसला करता आला नसल्याने हा अंतरीम निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे उध्दव ठाकरेंना अंधेरी पोटनिवडणूकीत धनुष्यबाण हे चिन्ह वापरता येणार नाही. हा निर्णय तात्पुरत्या स्वरुपाचा असून आगामी निवडणुकीपुरता मर्यादीत आहे. त्यामुळे ठाकरेना निवडणूकीत दुसरे चिन्ह घ्यावे लागणार असून त्यासाठीचे पर्याय आयोगाने शिवसेनेकडून मागविले आहेत. उध्दव ठाकरे आता कोणते चिन्ह घेवून आगामी अंधेरी निवडणूकीला सामोरे जातात. याकडे लक्ष लागले आहे. शिवसेनेसंदर्भात ठोस निर्णय आयोगाला घेता आला नसल्याने आयोगाने दोन्ही गटाला शिवसेना नांव वापरता येणार नसल्याचे म्हटले आहे. यासंदर्भात पुढील सुनावणी दहा तारखेला होणार आहे.

गेल्या तीन दशकांपासून धनुष्यबाण चिन्ह शिवसेनेची अस्मीता बनले होते. पक्षातील फुटीनंतर आणि निवडणूक आयोगाच्या एका निर्णयानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठविण्यात आल्याने आता हे चिन्ह शिवसेनेच्या हातून निसटले आहे. त्यामुळे पोटनिवडणुकीत ठाकरेंना नवे चिन्हे घ्यावे लागणार आहे. दरम्यान ढाल किंवा गदा यापैकी एक चिन्ह ठाकरे निवडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सोमवारपर्यत नव्या चिन्हासाठी ठाकरेंना तीन पर्याय सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 134
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

By Annant Ppangarkar30/08/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर : खरीप हंगामातील पिकांची वाढती गरज आणि पिण्याच्या…

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026

वाळू तस्करांवर कारवाई, ट्रॅक्टरसह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक तर तिघे फरार

30/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.