Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ऐन दीपावलीत संगमनेरातील कत्तलखाने सुरूच; पोलिसांच्या कारवाईत नऊ लाखाचा मुद्देमाल हस्तगत
गुन्हेगारी

ऐन दीपावलीत संगमनेरातील कत्तलखाने सुरूच; पोलिसांच्या कारवाईत नऊ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

शहरालगत समनापुर बायपासवर पोलिसांची कारवाई
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar27/10/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp
  • महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
    शहरालगतच्या समनापुर बायपासवर शहर पोलिसांनी एका संशयास्पद टेम्पोमधून सुमारे दोन लाखाचे गोमांस ताब्यात घेतले आहे. टेम्पो आणि गोमांस असा सुमारे नऊ लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. पोलिसांच्या या कारवाईवरून ऐन दिवाळीतही शहरातील कत्तलखाने सर्रासपणे सुरू असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे संगमनेरातील गोहत्या थांबणार कधी? असा प्रश्न गो प्रेमींनी उपस्थित केला आहे. गोवंश कत्तलीचे संगमनेर हे राज्यातील सर्वाधिक मोठे केंद्र म्हणून समोर येत आहे येथील बेकायदेशीर कत्तलखान्यांमध्ये सर्रासपणे जनावरांचे हत्या करून त्यांचे मांस राज्यासह देशाच्या विविध भागात पाठविले जाते. वारंवार होणाऱ्या पोलिसांच्या कारवाया आणि यातून बऱ्याचदा मोठ्या प्रमाणात हाती लागणारा मुद्देमाल, यामुळे येथील कत्तलखाण्याची महती लक्षात येते. पोलिसांच्या सातत्याने होणाऱ्या कारवायानंतर देखील येथील कत्तलखाने बंद करण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याने संगमनेर येथील गोहत्या कधी बंद होणार असा प्रश्न निर्माण होत आहे. दीपावली पाडव्याच्या दिवशी बुधवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास एका टेम्पोमधून गोवंश जनावराचे मांस वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर शहर पोलिसांच्या पथकाने शहरालगतच्या समनापुर बायपासवर सापळा लावला. या सापळ्यात संशयास्पद टेम्पो अडकल्यानंतर त्याची तपासणी केली असता, त्यात सुमारे दोन लाखाचे गोमांस असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी टेम्पो आणि मांस ताब्यात घेतले असून याप्रकरणी दोघा जणांवर कारवाई केली आहे. पोलीस कर्मचारी एकनाथ खाडे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात शाबान अली हुकूम अली शहा (वय ३८ रा. गोवंडी, मुंबई) आणि तोहिद दोस्त मोहम्मद पठाण (वय ३० रा. आळे, ता. जुन्नर) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.
anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 244
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- खाजगी बँकेच्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी सतत फोन करून धमकावणे, घरी येऊन…

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.