Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

स्थानिक गुन्हे शाखेकडून सराईत गुन्हेगाराला बेड्या

29/08/2026

एलसीबीची छापेमारी, २.९९ लाखांचा मुद्देमाल जप्त करत १४ आरोपींवर गुन्हा दाखल

29/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » चारित्र्याच्या संशयावरून विवाहितेची आत्महत्या; पतीसह तिघांवर घारगाव पोलिसांत गुन्हा दाखल
गुन्हेगारी

चारित्र्याच्या संशयावरून विवाहितेची आत्महत्या; पतीसह तिघांवर घारगाव पोलिसांत गुन्हा दाखल

या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar14/07/2026Updated:14/07/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
संगमनेर:
तालुक्यातील जांबुत बुद्रुक येथे चारित्र्याच्या संशयातून होणाऱ्या सततच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून एका २८ वर्षीय विवाहितेने मुळा नदीपात्रात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विठाबाई विकास घुले असे मृत महिलेचे नाव असून, या हृदयद्रावक घटनेमुळे पठार भागात खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी मृत महिलेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून घारगाव पोलिसांनी पतीसह सासरच्या तिघांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विठाबाई या घरच्यांना शेतात जात असल्याचे सांगून निघाल्या होत्या, मात्र त्या दीर्घकाळ परत न आल्याने कुटुंबीयांनी त्यांची शोधमोहीम सुरू केली होती. सुरुवातीला घारगाव पोलीस ठाण्यात त्या हरवल्याची तक्रारही नोंदवण्यात आली होती.
शोध सुरू असताना टेकडवाडी परिसरातील मुळा नदीकाठी त्यांची चप्पल, कपडे व इतर साहित्य आढळून आले. त्यानंतर त्यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना सापडला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी लोणी येथील प्रवरा वैद्यकीय रुग्णालयात पाठवला.
या घटनेनंतर विठाबाई यांच्या माहेरच्या आणि सासरच्या नातेवाईकांमध्ये तीव्र वाद निर्माण झाला होता. परिसरातील परिस्थिती तणावपूर्ण बनल्याने अखेर पोलीस बंदोबस्तात मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत महिलेचे वडील सीताराम साबळे (रा. चिंचाळे, ता. राहुरी) यांनी याप्रकरणी पोलिसांत फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून घारगाव पोलिसांनी पती विकास पहिलवान घुले, नर्मदा पहिलवान घुले आणि हिरामण लक्ष्मण घुले (सर्व रा. जांबुत बुद्रुक, ता. संगमनेर) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 996
आत्महत्या घारगाव पोलीस
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

स्थानिक गुन्हे शाखेकडून सराईत गुन्हेगाराला बेड्या

29/08/2026

एलसीबीची छापेमारी, २.९९ लाखांचा मुद्देमाल जप्त करत १४ आरोपींवर गुन्हा दाखल

29/08/2026

गुन्हे शाखेची धडक कारवाई ५ ठिकाणी छापे, ८९ हजार रुपयांचा गुटखा व मावा जप्त

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

By Annant Ppangarkar29/08/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर : नागरिकांना आपल्या परिसरातील समस्या आणि अडचणी थेट…

स्थानिक गुन्हे शाखेकडून सराईत गुन्हेगाराला बेड्या

29/08/2026

एलसीबीची छापेमारी, २.९९ लाखांचा मुद्देमाल जप्त करत १४ आरोपींवर गुन्हा दाखल

29/08/2026

देशहितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी..; संगमनेरच्या वकिलाचे जगातील सर्वात उंच पोस्ट ऑफिसमधून थेट पत्र!

29/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.