Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026

वाळू तस्करांवर कारवाई, ट्रॅक्टरसह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक तर तिघे फरार

30/08/2026

रविवार विशेष — पुणे–नाशिक रेल्वे : २५ दिवस संपले, आता प्रश्न फक्त कमिटीचा नाही… सरकारच्या इच्छाशक्तीचा आहे! एक संगमनेरकर म्हणून काही थेट प्रश्न…

30/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » धक्कादायक घटना! बिलाच्या वादातून हॉटेल चालकाची कोयत्याने वार करून भरदिवसा हत्या, चुलत भाऊ गंभीर जखमी… अहिल्यानगर जिल्ह्यातील घटना
गुन्हेगारी

धक्कादायक घटना! बिलाच्या वादातून हॉटेल चालकाची कोयत्याने वार करून भरदिवसा हत्या, चुलत भाऊ गंभीर जखमी… अहिल्यानगर जिल्ह्यातील घटना

या थरारक हत्याकांडामुळे श्रीरामपूर आणि अहिल्यानगर परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar11/07/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन

श्रीरामपूर:

शहरातील नेवासा रोडवरील हॉटेल लक्ष्मीनारायण येथे हॉटेलच्या बिलाच्या किरकोळ वादावरून एका तरुण हॉटेल चालकाची कोयत्याने वार करून भरदिवसा निर्घृण हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना शनिवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली आहे. या प्राणघातक हल्ल्यात हॉटेलचे तरुण चालक-मालक आकाश शेखर दुबय्या (वेंकटरामन) यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचा चुलत भाऊ कुणाल कैलास दुबय्या हा गंभीर जखमी झाला आहे. 

या प्रकरणी पोलिसांनी आरोपी सुरेश सतीश जाधव (रा. खिलारी वस्ती) याला ताब्यात घेतले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, नेवासा रोडवरील हॉटेल लक्ष्मी नारायण येथे काहीजण जेवणासाठी आले होते. जेवण झाल्यानंतर बिलाच्या रकमेवरून त्यांची हॉटेल कर्मचाऱ्यांशी हुज्जत सुरू झाली. वाद वाढत असल्याचे पाहून हॉटेलचे मालक आकाश दुबय्या तिथे आले आणि त्यांनी बिल पूर्ण देण्यास सांगितले.

याचा राग मनात धरून जेवणासाठी आलेल्यांपैकी एकाने आकाश यांच्या डोक्यावर कोयत्याने भीषण वार केले. आपल्या भावाला वाचवण्यासाठी कुणाल दुबय्या तात्काळ मदतीला धावला, मात्र आरोपींनी त्याच्यावरही कोयत्याने सपासप वार करून त्याला गंभीर जखमी केले.

घटनेनंतर आकाश दुबय्या यांना तातडीने साखर कामगार रुग्णालयात नेण्यात आले, परंतु प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र जगधने यांनी त्यांना मृत घोषित केले. जखमी कुणाल दुबय्या यांच्यावर सध्या कामगार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या संपूर्ण झटापटीत मुख्य आरोपी सुरेश जाधव हा देखील जखमी झाला असून, त्याच्यावर पोलीस संरक्षणात साखर कामगार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आरोपी सुरेश जाधव हा नेवासा रोडला बस स्टँडसमोर चिकन टिक्क्याची गाडी चालवतो. भरदिवसा घडलेल्या या थरारक हत्याकांडामुळे श्रीरामपूर आणि अहिल्यानगर परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 961
गुन्हेगारी हत्या हॉटेल व्यावसायिक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026

वाळू तस्करांवर कारवाई, ट्रॅक्टरसह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक तर तिघे फरार

30/08/2026

स्थानिक गुन्हे शाखेकडून सराईत गुन्हेगाराला बेड्या

29/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

By Annant Ppangarkar30/08/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  अहिल्यानगर: स्थानिक गुन्हे शाखेने अहिल्यानगर, कर्जत आणि राहुरी पोलीस…

वाळू तस्करांवर कारवाई, ट्रॅक्टरसह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक तर तिघे फरार

30/08/2026

रविवार विशेष — पुणे–नाशिक रेल्वे : २५ दिवस संपले, आता प्रश्न फक्त कमिटीचा नाही… सरकारच्या इच्छाशक्तीचा आहे! एक संगमनेरकर म्हणून काही थेट प्रश्न…

30/08/2026

रविवार विशेष लेख: बेसुमार कर्जमाफीची बेशर्मी

30/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.