Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » घारगाव पोलिसांची कारवाई: येठेवाडी शिवारात बेकायदेशीर वाळू वाहतूक करणारा डंपर जप्त, १० लाख २० हजारांचा मुद्देमाल हस्तगत
गुन्हेगारी

घारगाव पोलिसांची कारवाई: येठेवाडी शिवारात बेकायदेशीर वाळू वाहतूक करणारा डंपर जप्त, १० लाख २० हजारांचा मुद्देमाल हस्तगत

पोलिसांनी डंपर चालकाला ताब्यात घेतले असून, घारगाव पोलीस ठाण्यात याप्रकरणी बेकायदेशीर वाळू उपसा आणि वाहतुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar14/07/2026Updated:14/07/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
संगमनेर:
घारगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत बेकायदेशीर वाळू वाहतुकीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. येठेवाडी गावाच्या शिवारातून अवैध वाळू घेऊन जाणाऱ्या एका लाल रंगाच्या टाटा डंपरवर पोलिसांनी छापा टाकून चालकाला ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण १० लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १३ जुलै २०२६ रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांना एका गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली. येठेवाडी गावाच्या शिवारातून एक लाल रंगाचा टाटा कंपनीचा डंपर (क्रमांक MH 20 DT 0239) बेकायदेशीररीत्या वाळू भरून १९ मैल मार्गे घारगावच्या दिशेने जाणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती.
या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षकांनी तातडीने पोलीस हेडकॉन्स्टेबल विलास कोकाटे, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर आणि पोलीस कॉन्स्टेबल सुभाष शिवाजी बोडखे यांना कारवाईचे आदेश दिले.
पोलीस पथकाने दोन पंचांना सोबत घेऊन खाजगी वाहनाने जाऊन सापळा रचला. रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास माहिती मिळालेला लाल रंगाचा डंपर येताना दिसला. पोलिसांनी प्राईड हॉटेलजवळ या डंपरला थांबण्याचा इशारा केला. डंपर बाजूला घेऊन चालकाकडे वाळू वाहतुकीच्या परवान्याबाबत विचारणा केली असता, त्याच्याकडे कोणताही वैध परवाना नसल्याचे समोर आले.
पोलिसांनी दोन पंचांसमक्ष डंपर चालकाला नाव आणि पत्ता विचारला असता, त्याने आपले नाव चंद्रकांत यमनाजी रोडे (वय ४२ वर्षे, रा. येठेवाडी, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) असल्याचे सांगितले. डंपरची तपासणी केली असता त्यात अंदाजे २०,००० रुपये किमतीची २ ब्रास बेकायदेशीर वाळू मिळून आली. तसेच १० लाख रुपये किमतीचा लाल रंगाचा टाटा ९१२ डंपर असा एकूण १० लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी पंचांसमक्ष जप्त केला.
याप्रकरणी चालकाकडे अधिक चौकशी केली असता, ही वाळू गोरख उर्फ सचिन रावसाहेब रोडे (रा. येठेवाडी, ता. संगमनेर) याने मुळा नदीपात्रातून भरून आणण्यास सांगितल्याचे चालकाने कबूल केले. पोलिसांनी डंपर चालकाला ताब्यात घेतले असून, घारगाव पोलीस ठाण्यात याप्रकरणी बेकायदेशीर वाळू उपसा आणि वाहतुकीचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास घारगाव पोलीस करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 391
अवैध वाळू वाहतूक कारवाई घारगाव पोलीस
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026

पोलिसाच्या शेतातील बाजरीच्या कणसांवर जादूटोणा; संगमनेर तालुक्यात एकावर गुन्हा दाखल

03/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

By Annant Ppangarkar13/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ उद्या बुधवारी…

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.