Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संपर्कप्रमुख घोलप यांच्या विरोधात अश्लाघ्य वर्तन करणाऱ्यांचा शिवसेनेशी (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संबंध नाही
राजकारण

संपर्कप्रमुख घोलप यांच्या विरोधात अश्लाघ्य वर्तन करणाऱ्यांचा शिवसेनेशी (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संबंध नाही

नव्या निवडीना दिली स्थगिती, खासदार विनायक राऊत यांची माहिती.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar04/11/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

(महाराष्ट्र संवाद न्यूज च्या वाचकांसाठी दैनिक सामना मधील बातमी सोबत देत आहोत)

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख बबन घोलप यांच्याबाबत काही समाजकंटकांनी अश्लाघ्य वर्तन केले आहे. असे वर्तन करणाऱ्या समाजकंटकांचा शिवसेनेशी (उद्धव बाळासाहेब ठाकरे) काहीही संबंध नाही. तसेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने नुकत्याच जाहीर केलेल्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती त्यांना स्थगिती देण्यात आली आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनामध्ये या संदर्भात मध्यवर्ती कार्यालयातून सचिव खासदार विनायक राऊत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. त्यामुळे नव्याने केलेल्या नियुक्ती यांना ब्रेक लागला असून आता शिवसेनेचे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील नवे पदाधिकारी कधी जाहीर होतात, याची शिवसैनिकात उत्सुकता आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे पदाधिकारी गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर शिर्डी लोकसभा मतदारसंघात पदाधिकारी निवडीवरून मोठा गहजब करण्यात आला. अकोलेत संपर्कप्रमुख माजी मंत्री बबननाना घोलप यांचा निषेध नोंदवत त्यांच्या प्रतिमेला जोडे मारण्याचे देखील आंदोलन करण्यात आले होते. संगमनेरमध्ये देखील घोलप यांच्या विरोधात बैठक घेत या निवडी आम्हा पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता केल्याचा आरोप करण्यात आला होता. यात शिवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी सामील होते.

याची पक्ष पातळीवर गंभीर दखल घेण्यात आली असून नव्या नियुक्त्यांना तात्पुरता ब्रेक देण्यात आला आहे तर संपर्कप्रमुख घोलप यांच्या विरोधात अश्लाघ्य वर्तन करणाऱ्यांना समाजकंटक संबोधण्यात आले असून त्यांचा शिवसेनेशी (उद्धव बाळासाहेब ठाकरे) काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे घोलप यांच्या विरोधातील आंदोलनात सहभागी असलेल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची चांगलीच अडचण झाली आहे. संगमनेर, अकोले, कोपरगाव मध्ये झालेल्या आंदोलनाचे पडसाद थेट पक्ष पातळीवर उमटले आहेत. त्यामुळे घोलप यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना पुन्हा शिवसेनेमध्ये (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पदे मिळणार का? की त्यांना पक्षाबाहेरचा रस्ता दाखविला जाणार, हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.

 

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 179
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- यावर्षीचा दुष्काळ हा कोरोना संकटाप्रमाणे असून कठीण दुष्काळी संकटातून मार्ग काढत…

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.