महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांचा पुतळा जाणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे पोलीस उपाधीक्षकांकडे करण्यात आली आहे.
पोलीस उपाधीक्षकांकडे मागणी करणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आजी-माजी कार्यकर्त्यांमध्ये शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख जयवंत पवार, तालुकाप्रमुख जनार्दन आहेर, उप जिल्हाप्रमुख दिलीप साळगट, शहरप्रमुख प्रसाद पवार, युवा सेनेचे तालुकाप्रमुख गुलाब भोसले, अमोल कवडे, शहर संघटक पप्पू कानकाटे, उपतालुका प्रमुख सोमनाथ काळे, माजी पंचायत समिती सदस्य अशोक सातपुते, संतोष कुटे, समीर ओझा, रवी गिरी, बाळासाहेब घोडके आदींचा समावेश होता.
शिवसेनेच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या संपर्कप्रमुख बबन घोलप यांच्या विरोधात संगमनेर अकोले कोपरगाव या ठिकाणी आंदोलने आणि निषेध करण्यात आला होता.
याची दखल घेत शिवसेनेचे सचिव खासदार विनायक राऊत यांनी या नेत्यांना स्थगिती दिली. याला शिवसेनेचे उपचार नगर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे जबाबदार असल्याचे समजून संगमनेरात काही समाजकंटकांनी खेवरे यांच्या पुतळ्याचे दहन केले. ही बाब निष्ठावान शिवसैनिकांना न रुचल्याने त्यांनी संगमनेरचे पोलीस उपाधीक्षक राहुल मदने यांना निवेदन देत संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे.
शिवसेनेच्या उत्तर नगर जिल्ह्यातील ज्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी झाल्या होत्या त्या संदर्भात कोणत्याही प्रकारची माहिती जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांना नव्हती. ते देवदर्शनासाठी बाहेर होते. पदाधिकाऱ्यांच्या निवडीला वरिष्ठ स्तरावरून स्थगिती देण्यात आली. यामागे खेवरे यांचा कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप नाही. त्यामुळे त्यांचा पुतळा जाळणाऱ्यावर शिवसेनेच्या वरिष्ठ स्तरावरून कारवाई करण्यात यावी.
प्रसाद पवार, शहर प्रमुख.


