Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » जेथे प्रतिमा दहन तेथेच भव्य शक्ती प्रदर्शन ‘हा एक ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी है, ज्यांना कोणाला काही वाटत असेल त्यांना वाटू द्या ‘टायगर अभी जिंदा है’!
राजकारण

जेथे प्रतिमा दहन तेथेच भव्य शक्ती प्रदर्शन ‘हा एक ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी है, ज्यांना कोणाला काही वाटत असेल त्यांना वाटू द्या ‘टायगर अभी जिंदा है’!

जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांचे वक्तव्य
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar08/11/2022No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उत्तर नगर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांचे मंगळवारी संगमनेरमध्ये भव्य स्वागत करत समर्थकांनी शक्ती प्रदर्शन केले. संगमनेरसह अकोले, कोपरगाव, राहता, श्रीरामपूर, नेवासे येथील शिवसेनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

शिवसेना पदाधिकारी निवडीवरून उत्तर नगर जिल्ह्यात शिवसेनेच्या दोन गटात मोठे रणकंदन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर संपर्कप्रमुख बबन घोलप आणि जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या समर्थकांमध्ये दोन गट पडले असून या दोन्ही गटांनी एकमेकांच्या नेत्याविरोधात आंदोलने केली होती. पक्षांतर्गत गटबाजी या निमित्ताने थेट पुणे प्रथमत:च समोर आली.

नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडींना स्थगिती देण्यात आल्याने संगमनेरमध्ये जिल्हाप्रमुख खेवरे यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले होते. त्यामुळे खेवरे समर्थकांनी पोलीस उपाधीक्षकांची भेट देत प्रतिमा दहन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती पोलिसांनी यात स्वतः फिर्यादी होत शिवसेनेच्या 16 जणांविरोधात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा अवमान केल्याचा गुन्हा दाखल केला. तर उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब हासे यांच्या फिर्यादीवरून शिवसेना शहरप्रमुखासह चार जणांविरोधात भादवी कलम 500 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही गटातील वाद पोलीस ठाण्यात पोहोचला.

या पार्श्वभूमीवर शिवसेनेतील दुसऱ्या घटाने ढोल ताशाचा निनादात आणि फटाक्याच्या आतिषबाजीत जोरदार स्वागत करण्यात आले यावेळी खेवरे समर्थकांसह शिवसेनेचे जुने पदाधिकारीही उपस्थित होते. शासकीय विश्रामगृह, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ते बस स्थानक अशी ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. शिवसेना जिंदाबाद, उद्धव ठाकरे साहेबांचा विजय असो, खेवरे नाना तुम आगे बढो अशा घोषणांच्या निनादात परिसर गजबजला होता.

खेवरे यांच्यासह कोपरगावचे जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे, कलविंदर दडियाल, राहत्याचे शहरप्रमुख गणेश सोमवंशी, नेवाशाचे हरीभाऊ शेळके, अकोले तालुकाप्रमुख मच्छिंद्र धुमाळ, श्रीरामपूरचे सचिन बडदे, माजी जिल्हाप्रमुख जयवंत पवार, संगमनेर तालुकाप्रमुख जनार्दन आहेर, शहरप्रमुख प्रसाद पवार, विधानसभा समन्वयक आप्पा केसेकर, माजी तालुकाप्रमुख कैलास वाकचौरे, भैया तांबोळी, युवासेनेचे तालुकाध्यक्ष गुलाब भोसले, अ‍ॅड. दिलीप साळगट, माजी पंचायत समिती सदस्य अशोक सातपुते, रवींद्र कानकाटे यांच्यासह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

जिल्हाप्रमुख खेवरे म्हणाले,

हे सगळे शिवसेनेवर प्रेम करणारे कार्यकर्ते आहेत. ज्या लोकांनी चुकीचे काम येथे केले त्याच ठिकाणी अत्यंत चांगले काम आज आमच्या शिवसैनिकांनी केले आहे. दीपावलीचा झाला नाही एवढा आनंद आज झाला कारण, माझे सगळे जुने सहकारी येथे उपस्थित आहे. एकमुखी एकसंघ सगळे सोबत आहेत. पुतळा वगैरे हा विषय वेगळा आहे. ‘हा एक ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी है, ज्यांना कोणाला काही वाटत असेल त्यांना वाटू द्या ‘टायगर अभी जिंदा है’! ज्यांनी शहरात तालुक्यात शिवसेना वाढवली, छोटसं रोपट होतं ते रोपट आज इतकं मोठं केलं. ते मूळ शिवसैनिक आहेत. अंगावर अनेक केसेस घेतल्या, प्रपंचाची हानी झाली. स्वतःचे नुकसान करून शिवसेना वाढविली. ते सगळे आज माझ्यासोबत आहेत. मला कोणाबद्दल काही बोलायचे नाही. 27 वर्ष झाली मी शिवसेनेत आहे शाखाप्रमुखापासून जिल्हाप्रमुख झालो. गट तट दिसणार नाही सर्वांना सामावून घेतले जाईल. परंतु ज्या काही छोट्या-मोठ्या गोष्टी आहेत त्या पक्षाच्या कानावर घालून दूर कराव्या लागतील. कोणावरही अन्याय होता कामा नये. अनेक लोक शिवसेनेसाठी झिजले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 107
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

By Annant Ppangarkar30/08/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर : खरीप हंगामातील पिकांची वाढती गरज आणि पिण्याच्या…

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026

वाळू तस्करांवर कारवाई, ट्रॅक्टरसह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक तर तिघे फरार

30/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.