महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते प्रवक्ते व खासदार संजय राऊत पत्राचाळ घोटाळा प्रकरणी तुरुगांतून तब्बल तीन महिन्यानंतर जामीनावर सुटले आहे. शिवसेनेची बुलंद तोफ असलेले राऊत तीन महिन्यानंतर पुन्हा परतले असून ‘टायगर इज बॅक’ अशा घोषणा देत संगमनेरमध्ये त्यांच्या सुटकेचा आनंद फटाके फोडून साजरा करण्यात आला.
बसस्थानक चौकात शहरप्रमुख प्रसाद पवार, माजी जिल्हा प्रमुख जयवंत पवार, माजी तालुकाप्रमुख कैलास वाकचौरे, समीर ओझा, भैय्या तांबोळी, युवासेनेचे जिल्हाप्रमुख अमित चव्हाण, जालिंदर लहामगे, माजी पंचायत समिती सदस्य अशोक सातपुते, जालींदर लहामगे आदींसह शिवसैनिकांनी जल्लोष करत राऊत यांच्या सुटकेचा आनंद व्यक्त करीत त्यांच्या सुटकेचे स्वागत केले.

फटाक्याच्या आतीषबाजीने बसस्थानकाचा परिसर दुमदुमला होता. राऊत यांच्या जामीनावरील मुक्ततेनंतर शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला आहे. गेल्या तीन महिन्यापासून न्यायालयीन कोठडीत कैद असलेले शिवसेना नेते राऊत यांचा विशेष पीएमएलए कोर्टाने जामीन मंजूर केल्यानंतर तसेच संजय आणि प्रवीण राऊत यांची अटक बेकायदेशिर असल्याचे मुंबई हायकोर्टाने म्हटले आहे. इतकेच नव्हे तर कोर्टाने ईडीला फटकारलेदेखील आहे.
संजय राऊत आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटासाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे. राऊत यांच्या सुटकेमुळे संपूर्ण राज्यभरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आनंदाचे वातावरण असून या सुटकेचा जल्लोष करण्यात येत आहे.

