Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अकोले नगरपंचायतीला विकास कामांसाठी निधी मिळवून देण्याचे खासदारांचे आश्वासन
राजकारण

अकोले नगरपंचायतीला विकास कामांसाठी निधी मिळवून देण्याचे खासदारांचे आश्वासन

शिंदे गटाच्या प्रवेशानंतर खासदार लोखंडे यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने 'बाळासाहेबांची शिवसेना' पक्षाचे अकोलेत शक्ती प्रदर्शन
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar12/11/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

राज्यात सत्ता बदल होऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आले. त्यामुळे लोकांच्या विकासाच्या अपेक्षा वाढल्या. मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते असल्याने अकोले नगरपंचायतीला विविध विकास कामांसाठी दोन कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे, याशिवाय पुढील काळात भरघोस निधी मिळवून देण्याचे आश्वासन खासदार सदाशिव लोखंडे यांनी दिले.

बाळासाहेबांच्या शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर खासदार लोखंडे आज प्रथमच अकोलेत आले असता त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यांच्या समवेत जिल्हाध्यक्ष कमलाकर कोते, शिर्डी लोकसभा संपर्कप्रमुख बाजीराव दराडे, जिल्हा संघटक विजय काळे, उपजिल्हा प्रमुख एकनाथ यादव, तालुका प्रमुख संजय वाकचौरे, शहराध्यक्ष गणेश कानवडे, संगमनेर तालुकाप्रमुख रमेश काळे, शहराध्यक्ष दिनेश फटांगरे, मनसेचे तालुका प्रमुख दत्ता नवले, माजी जि. प. सदस्य रमेश शेंगाळ, माजी सदस्या सुषमा दराडे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते.

खासदार लोखंडे यांचा अकोले नगरपंचायतीच्यावतीने नगराध्यक्षा सोनाली नाईकवाडी, उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, आरोग्य सभापती शरद नवले, पाणीपुरवठा सभापती हितेश कुंभार बांधकाम सभापती वैष्णवी धुमाळ, महिला बालकल्याण समिती सभापती प्रतिभा मनकर, नगरसेवक नवनाथ शेटे, विजय पवार, सागर चौधरी, नगरसेविका शितल वैद्य, तमन्ना शेख, जनाबाई मोहिते, भाजपचे शहराध्यक्ष सचिन शेटे, परशराम शेळके, अमोल वैद्य, रवींद्र शेणकर, मोसीन शेख, नवनाथ मोहिते आदींनी त्यांचा सत्कार केला. याशिवाय तालुक्यातुन आलेल्या विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी देखील त्यांचा सत्कार केला. त्यांना विविध मागण्यांचे निवेदनही देण्यात आले.

अकोले नगरपंचायत अंतर्गत योग भवनासाठी 80 लाख रुपये, चौक सुशोभीकरनासाठी 80 लाख, रस्त्यांसाठी 40 लाख असा 2 कोटी रुपयांचा निधी खासदार लोखंडे यांचेमार्फत प्राप्त झाला आहे. आगामी काळात नगरपंचायतीने विकास आराखडा बनवून पाठवावा त्यासाठी आपण केंद्र व राज्य शासनाच्या मार्फत जास्तीत जास्त निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही त्यांनी दिली.

आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाला आरक्षण देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. अकोले पर्यंत येतांना रस्त्यात ठीकठिकाणी खासदार लोखंडे यांचे स्वागत करण्यात आले.त्यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने मोठे शक्तीप्रदर्शन केल्याचे दिसून आले.

अकोले नगरपंचायतीच्या प्रभाग 9 च्या नगरसेविका शितल अमोल वैद्य यांनी अकोले नगरपंचायत हद्दीतील महालक्ष्मी कमान ते खंडोबा माळ रस्त्याचे काँक्रीटीकरण करून दुतर्फा मोठ्या गटारी कराव्यात, यासह प्रभाग 9 च्या अनेक विकास कामांसाठी निधीची मागणी एका निवेदनाद्वारे खासदार सदाशिव लोखंडे यांच्याकडे केली. या कामांसाठी विशेषतः रस्त्याच्या कामासाठी निधी मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 132
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- खाजगी बँकेच्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी सतत फोन करून धमकावणे, घरी येऊन…

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.